Chetan kedare がリツイート

नाशिक येथे एका कंपनीमध्ये घडलेल्या अपराधी घटनेला भाजपा आदी मंडळी "कॉर्पोरेट जिहाद" असे नाव देत आहेत. पण त्या कॉर्पोरेट कंपनीला मात्र वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सदर कंपनीचे नाव ही बाहेर येऊ नये याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत मात्र या प्रकरणातील इतर बाबी मात्र माध्यमांत सोडल्या जात आहेत. तपास चालू असताना कंपनीला क्लीन चिट कशी दिली? किती कंपनी अधिकाऱ्यांना याची माहिती होती?
ही घटना आगंतूक आहे, का सांगितले जाते त्याप्रमाणे रॅकेट आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. जर रॅकेट असेल तर या अगोदर किती महिलांचे धर्मांतर झाले, किती लोक यात सामील होते? कोणते मौलवी सामिल होते? Modus Operandi काय? हे समोर यावे. भाजपा शासित राज्यात हे कसं झालं, इतका काळ कसं चालू राहीलं? हे प्रकरण भाजपा - संघाच्या अजेंड्यासाठी न वापरले जाता या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची आवश्यकता आहे. पुन्हा असा प्रकार महाराष्ट्रात होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.

MR



























