Paurav: がリツイート

जेपी असोसिएट्स या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यावर कंपनीची लिलाव प्रक्रिया सुरु झाली.
कर्ज होत ५७१८५ कोटी.
मालकांची बोली १४५३५ कोटीची म्हणजे बँकांना नुकसान ४२६५० कोटी रुपयांचे.
दुसरी बोली होती वेदांता समूहाची १७९२६ कोटीची म्हणजे बँकांचे नुकसान ३९२५९ कोटी रुपयांचे.
जास्तीच्या बोलीचा विचार केला तर मालकांच्या ओटीत कंपनी टाकल्याने बँकांचे नुकसान ३३९१ कोटींनी वाढले.
वेदांता या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली.
सुप्रीम कोर्टाने हा निर्णय एनसीएलटी अर्थात राष्ट्रीय दिवाळखोरी लवादाकडे असल्याने सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे.
बुडणाऱ्या बँकात सरकारचा, संस्थात्मक गुंतवणूकदार आणि सामान्य भागधारक जनतेचा पैसा आहे.
सरकारचा पैसा म्हणजेच जनतेने कररूपाने दिलेला पैसा.
मोजून फक्त तीन प्रकरणात बँका किती रुपयाला बुडालेल्या आहेत याची आकडेवारी सांगतो.
अनिल अं बा नी ची कंपनी ४७२५१ कोटी थकीत कर्ज.विकत घेतली मुकेश अं बा नी ने ४५५.९० कोटी रुपयाला बँकांचा तोटा ४६७९५ कोटी.
व्हिडीओकोन ग्रुप थकीत कर्ज ४६००० कोटी , विकत घेतली ट्वीन स्टार टेक्नोलॉजीने ३००० कोटी रुपयाला , बँकांचा तोटा ४३००० कोटी.
रेडीयस इस्टेट , मुंबई थकीत कर्ज ७४७ कोटी , अ दा नी समूहाने विकत घेतली ७६ कोटी ला म्हणजे ६७१ कोटी बँकांचा तोटा
फक्त एवढी तीनच प्रकरण बघितली तर बँकांचे बुडालेले पैसे आहेत ९०४६६ कोटी रुपये.
तर भारतातल्या करदात्यांना समजत आहे का आपले ९०४६६ कोटी रुपये वाहून गेलेले आहेत.
अर्थात मालकांच्या मालकांसाठी एवढा त्याग केलाच पाहिजे ना ?
एवढ्या पैशात भारतातल्या किती शाळा खोल्या दुरुस्त होतील ?
किती सरकारी दवाखाने सुरळीत चालतील ?
निधी अभावी बंद पडणाऱ्या किती शाळा पुन्हा सुरु होतील ?
निधी अभावी मरायला टेकलेल्या एसटी महामंडळाच्या किती नव्या बसेसची खरेदी होऊ शकेल ?
करदात्यांचे नावाने सतत गळे काढणाऱ्या लोकांना हा हेअरकट चुकलो टक्कल केलेलं दिसत नाहीये ?
कस दिसेल ना ?
धर्मराष्ट्र निर्मिती, डीजे लावून मिरवणुका आणि अब्दुलची कशी ठासली याच धुंदीत असणाऱ्या लोकांना हि दिवसाउजेडी केलेली कायदेशीर लुट कशी दिसेल ना ?
आनंद शितोळे (fb)
MR
































