दिपक राणे - Deepak Rane

21.7K posts

दिपक राणे - Deepak Rane banner
दिपक राणे - Deepak Rane

दिपक राणे - Deepak Rane

@Deerane

Film | Serial. #मराठी चित्रपट । Producer of #Duniyadari #pyarwalilovestory #tuhire #guru #lucky #KhariBiscuit #dildostiduniyadari #duheri #freshar #anjali

MUMBAI, MAHARASHTRA 가입일 Temmuz 2011
959 팔로잉5.8K 팔로워
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा! @SunetraA_Pawar @mcborwankar @varshadesh232
MR
62
180
1.6K
54.8K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
हे भयंकर आहे, सोसायटीच्या निवडणुकीत जर हे लोक असे रडीचे डाव खेळत असतील तर विचार करा विधानसभा/लोकसभा निवडणुकीत काय काय करतील
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
32
150
441
13.2K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि 'लायसन्स राज'शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की 'लायसन्स राज' संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली. स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी 'नॅनो' गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या 'बोटॅनिकल उद्याना'साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला. बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की 'बॉंबे हाऊस' हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या 'टॅंगो' आणि 'टिटो' या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet media
MR
228
2.1K
24.7K
318.7K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Soumitra Pote । सौमित्र पोटे
खाद्यतेल आणि औषध कंपन्यांनी आपल्यावर फार मोठी भीती घातली आहे. तुम्हाला माहिती आहे? Episode Out जरुर बघा. youtu.be/zU46cc8Rn_Q?si…
YouTube video
YouTube
MR
0
1
5
195
दिपक राणे - Deepak Rane
Thank you sirji ❤️
taran adarsh@taran_adarsh

PAN-INDIA FILM 'AFTER OPERATION LONDON CAFE' TEASER OUT NOW... #KaveeshShetty, #MeghaShetty, #ShivaniSurve, #ViratMadake, #BSuresh and #ArjunKapikad star in #AfterOperationLondonCafe... Teaser out now. Directed by Sadagara Raghavendra... Produced by Vijay Kumar Shetty Havaral, Deepak Pandurang Rane, Ramesh Kothari and Vijay Prakash. #AfterOperationLondonCafeis made under the banners of Indian Film Factory and Deepak Rane Films. Will release in #Marathi, #Kannada, #Hindi, #Telugu, #Tamil and #Malayalam... Release date will be announced soon.

HT
1
0
1
100
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Ravi Nair
Ravi Nair@t_d_h_nair·
Ravi Nair tweet media
ZXX
617
3.5K
15K
671.6K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
BCCI
BCCI@BCCI·
वंदे मातरम 🇮🇳
हिन्दी
2.5K
47K
202.4K
6.9M
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Anil Shidore अनिल शिदोरे
जून संपत येताना महाराष्ट्रातील ३५५ पैकी ७८ तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे.. शासनयंत्रणेनी बारीक नियोजन (micro-planning) करायला हवं.. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सगळी राखीव ताकद संपलेली असते. पाणी, पैसा-अडका, चारा, धान्य .. जिद्द.. हीच वेळ असते सोबत उभं रहाण्याची. #दुष्काळ
MR
10
34
195
5.1K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Anil Shidore अनिल शिदोरे
मराठीच्या बाबतीत मराठी माणूस उत्साही नसेल आणि मराठी शाळा काळानुरूप कल्पक बदल करणार नसतील तर असं होणार. १४१ वर्षांची महान परंपरा असलेली #माझीशाळा आज बंद करावी लागते की काय ह्या अवस्थेला आहे.. मराठी शाळेत उत्तम इंग्रजी शिकवलं जाणं हे अनेक उत्तरांपैकी एक उत्तर असू शकतं. #मराठीशाळा
Anil Shidore अनिल शिदोरे tweet mediaAnil Shidore अनिल शिदोरे tweet media
MR
17
62
255
7.9K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
मतदानापासून वंचित कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची लवकरच उच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची दक्ष नागरिकांची तयारी loksatta.com/thane/kalyan-d…
MR
0
2
6
665
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
𝘼𝙢𝙞𝙩
𝘼𝙢𝙞𝙩@AmitYji127·
हुकूमशहा आपली सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? #LabourDay - 1933 मध्ये हिटलरने जर्मन संविधान बदलण्यासाठी स्वतःच्या संसद भवनाला आग लावली. #DhruvRathee - 1999 मध्ये पुतिन यांनी त्यांच्याच नागरिकांवर बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप केला होता ⚠️या निवडणुकीच्या मोसमात, *फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्सपासून सावध रहा!* #CSKvsPBKS #Mission100Crore #MayDay2024
MR
5
109
388
9.1K
दिपक राणे - Deepak Rane
ज्या ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देऊन हा अखंड महाराष्ट्र निर्माण केला त्या सर्व क्रांतिकारकाना महाराष्ट्र दिनी विनम्र अभिवादन.🙏 महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #जय_महाराष्ट् #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDin
MR
0
2
6
170
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳@SilentEyes0106·
हे ऐकून पण तुम्ही महाराष्ट्र द्रोही पक्षाला मतं देत असाल तर तुमच्या पेक्षा हा गुजराती माणूस खरा महाराष्ट्र प्रेमी .......
MR
13
284
870
21.5K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Sameer Vidwans । समीर विद्वांस
माझ्या मनात एक प्रश्न आहे. कमी ज्ञानामुळे असेल पण तरी… जेव्हा एखाद्या ठिकाणी मतदान न होता थेट विजयी घोषित केलं जातं (ताजं उदाहरण सुरत) तेव्हा तिथल्या मतदारांच्या NOTA (None of the Above) निवडण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का?! मला पूर्ण कल्पना आहे की NOTA मोजलं गेलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही (जे ग्राह्य धरलं गेलं पाहिजे हा भाग वेगळा) पण तरीही मतदाराला ‘वरील पैकी कोणीच नाही’ हे निवडता आलंच पाहीजे ना?! काहीही कारणांमुळे जरी एकच उमेदवार शिल्लक राहीलाय तरीही तो उमेदवार विरूद्ध NOTA अशी दुरंगी लढत होऊ देत ना!! निवडून तोच येईल पण मतदानाचा हक्क तर बजावता येईल, आणि त्या उमेदवाराविषयीचं लोकांचं खरं मत तरी कळेल! NOTA नसतंच तर भाग वेगळा पण असतानाही ते राबवलंच गेलं नाही तर त्याला ‘बिनविरोध’ कसं म्हणणार?!
MR
103
164
990
73.2K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री? जगातील अनेक महत्त्वाच्या आणि निर्भीड वृत्तपत्रांप्रमाणे आयर्लंडमधील ‘द आयरिश टाइम्स’ या वर्तमानपत्रासही भारतात माध्यमस्वातंत्र्य आणि लोकशाही संकोच होत असल्याचे आढळले. @girishkuber #Loksatta #Editorial loksatta.com/sampadkiya/edi…
MR
43
39
213
7.6K
दिपक राणे - Deepak Rane 리트윗함
Anil Shidore अनिल शिदोरे
दुबईसारख्या कमी पावसाच्या शहरातही दोन दिवसांपूर्वी पुरानं जो हाहा:कार माजवला त्यातून आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे. हे खरं आहे की दोनच दिवसात तिथे इतका पाऊस पडला की जेव्हढा साधारण दीड वर्षात पडतो. त्यामुळे ही घटना असाधारण तर आहेच. परंतु, असाधारण असली तरी निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं ते आपण समजून घ्यायला पाहिजे. वैज्ञानिक ते करत आहेत, आपल्याला त्यातून शिकता येईल. असा विचार करू की असा पाऊस आपल्या शहरांत पडला तर काय स्थिती होईल? तसा पडणार नाही असं वाटणं स्वाभाविक आहे पण धोरणकर्त्यांच्या दृष्टीनं तसं वाटणं योग्य नाही. आपली शहरं असा पाऊस पेलण्याची क्षमता असलेली आहेत का? आपलं सांडपाणी व्यवस्थापन कसं आहे? नागरिकांची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची प्रथम प्राधान्याची गोष्ट असते. महाराष्ट्रात सुमारे १६-१७ लोकसभा मतदारसंघ स्पष्ट शहरी मतदारसंघ आहेत. तिथल्या निवडणूक उमेदवारांना विचारायला पाहिजे की ही शहरं नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित रहाण्यासाठी ते लोकसभेत काही विधेयक मांडणार आहेत का? त्यांच्या पक्षाचं ह्याबाबतीतलं धोरण काय आहे? उदा. पुण्यात जो “नदी सुधार प्रकल्प” चालू आहे तो काही अभ्यासकांच्या मते अत्यंत धोकादायक आहे आणि २५ वर्षातून एकदा येतो तसा पाऊस आला तर, त्यांच्या मते, पुण्याचा बराचसा भाग पाण्याखाली जाईल. मग ह्यावर काय उपाय? ह्या उमेदवारांचं काय म्हणणं आहे त्यावर? #विचाराप्रश्न #खरेप्रश्न #लोकसभानिवडणूक२०२४ @mohol_murlidhar @DhangekarINC @vasantmore88
MR
14
47
267
14.9K