
‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने मानधन, फरकाचं वेतन, वसतीगृह, डॉक्टरांवर होणारे हल्ले, रिक्त जागा आदी मागण्यांसाठी दोन महिन्यांपूर्वी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन शासनाने देऊनही अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. या मागण्या मान्य करुन आरोग्य व्यवस्थेचा हा कणा मोडकळीस येणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना केली. @mrhasanmushrif















