विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा - बारामती तालुक्यातील सुपा मी आज २८ सप्टेंबर रोजी स्वतः मंडळ कार्यालयाला भेट देऊन सर्व संबंधितांचं कौतुक केलं आणि गावकऱ्यांची संवाद साधला. माझ्यासोबत उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे हे देखील उपस्थित होते.