ZPTHANE

3.5K posts

ZPTHANE banner
ZPTHANE

ZPTHANE

@ceozpthane

Official Account of Zilla Parishad, Thane

Thane, India انضم Mart 2017
41 يتبع1.6K المتابعون
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६-२७ साठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मोठा आधार दिला जात आहे. 📢 इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा. #ThaneZP #KrushiVibhag #FarmerSupport #Kharif2026
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
17
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा संपन्न “खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अधिक माहितीसाठी - facebook.com/share/p/1Eu6NH…
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
9
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
ठाणे जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये नागरिकांना सुरळीत व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येत आहेत. #Thane #WaterSupply #PublicService
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
32
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
📢 जाहीर आवाहन गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी आता महत्त्वाची पायरी! 💉 १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीमुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते. #HPVVaccine #PublicHealth #Maharashtra
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
21
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
आपले सरकार सेवा केंद्र आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर! 📄 शासकीय सेवा आता एका क्लिकवर आणि आपल्या गावातच ⏱️ वेळेत सेवा, पारदर्शक प्रक्रिया आणि विश्वासार्ह सुविधा 🏠 Thane Doorstep Delivery मुळे सेवा आता थेट आपल्या दारात आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या किंवा ऑनलाइन अर्ज करा
MR
0
0
1
35
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
या दौऱ्यात समितीच्या सदस्या सरीता तिरूमला आणि महेश वाकोडे यांनी प्रत्यक्ष भेट देत सध्याच्या प्रणालीचे परीक्षण केले.
MR
0
0
0
13
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
ठाणे जिल्ह्यात भविष्यात लागू होणाऱ्या ॲग्री स्टॅक आयडी प्रणालीच्या अनुषंगाने खत वितरण प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीने दि. २१ एप्रिल, २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पाहणी दौरा केला.
ZPTHANE tweet media
MR
1
0
1
39
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ साठी सोडत (लॉटरी) द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीकरिता देण्यात आलेली मुदत आता वाढविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी- facebook.com/share/p/18T4Tm…
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
30
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
जिल्हा परिषद ठाणेच्या कृषी विभागामार्फत आगामी खरीप हंगामासाठी निविष्ठा नियोजन करण्यात आले असून आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
44
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज, जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ZPTHANE tweet mediaZPTHANE tweet media
MR
0
0
0
32
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MR
0
0
0
27
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कार्यालयप्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
MR
1
0
0
47
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले असून, जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ZPTHANE tweet media
MR
1
0
2
57
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
आरटीई खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ३१ मार्च, २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी तसेच आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
ZPTHANE tweet media
MR
0
0
0
45
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवार, दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
ZPTHANE tweet mediaZPTHANE tweet media
MR
0
0
0
35
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी तालुका अंबरनाथ येथील ग्रामपंचायत रहाटोली येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
ZPTHANE tweet mediaZPTHANE tweet mediaZPTHANE tweet mediaZPTHANE tweet media
MR
0
0
0
32
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MR
0
0
0
24
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
ZPTHANE tweet mediaZPTHANE tweet mediaZPTHANE tweet media
MR
1
1
0
33
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
पालकांना आता ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MR
0
0
0
21
ZPTHANE
ZPTHANE@ceozpthane·
शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता दि. २५ मार्च, २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ZPTHANE tweet media
MR
1
0
0
41