Shivsena - शिवसेना

14.3K posts

Shivsena - शिवसेना banner
Shivsena - शिवसेना

Shivsena - शिवसेना

@Shivsenaofc

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना! | #Shivsena

Mumbai Beigetreten Şubat 2023
16 Folgt20.4K Follower
Shivsena - शिवसेना
📍 #ठाणे | जय जय जयन्ती मंगला, श्रीभद्रकाली कपालिनी। दुर्गा, क्षमा, स्वाहा, शिवा, धात्री स्वधा जग पालिनी॥ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून यानिमित्ताने ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्र मंडळाच्या देवीचे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब आणि विधीप्रमाणे देवीचे पाद्यपूजन करून तिच्यावर पुष्प आणि कुमकुम वाहून तिची प्रथेप्रमाणे पूजा करून भक्तीभावाने आरती केली. देवीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती, भरभराट, आनंद मिळावा तसेच सर्वांच्या दुःखाचे हरण व्हावे अशी मनोकामना तिच्या चरणी लीन होताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, त्यांचा नातू रुद्रांश तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
3
1
4
89
Shivsena - शिवसेना
संकटावर मात करून गुढी उभारू, नवे संकल्प मनात आता धरू, नूतन वर्षाचे स्वागत करताना, माणुसकीचे नाते अधिक घट्ट करू..! गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमाबाहेर प्रथेप्रमाणे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी गुढी उभारून हा सण साजरा केला. यावेळी शिंदे साहेबांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला फुले वाहून त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना गटनेते पवन कदम, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी आणि शिवसेनेचे ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते. #Shivsena #Eknathshinde
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
1
4
7
106
Shivsena - शिवसेना
📍 #ठाणे | गुढी पाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने आज ठाण्यातील सांस्कृतिक परंपरेनुसार कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब पालखीचा भोई होत सहभागी झाले. यानिमित्ताने शहरातील अनेक सामाजिक संस्था, शाळा, बँका, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आपापले चित्ररथ घेऊन मोठ्या उत्साहाने या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षण, अवयवदान, आयुर्वेदाचे महत्त्व, उत्तम आहार, मानसिक आरोग्य याचे महत्त्व सांगणारे चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच मल्लखांब आणि शारीरिक कसरतींची नेत्रदीपक अशी प्रात्यक्षिके या शोभायात्रेत सहभागी झालेल्या लहानग्यांनी दाखवली. यावेळी शिंदे साहेबांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव तसेच शहरातील महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. #Shivsena #Eknathshinde
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
3
1
9
107
Shivsena - शिवसेना
भगवान झुलेलाल जी के जन्मोत्सव चेटीचंड की आप सभीं को बहोत शुभकामनाएं! #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet media
हिन्दी
0
5
17
158
Shivsena - शिवसेना
हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा ! #गुढीपाडवा #शिवसेना
Shivsena - शिवसेना tweet media
MR
2
5
27
264
Shivsena - शिवसेना
📍 #ठाणे | नाद झंकार तू, सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे, आई जगदंबे... वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ठाण्यातील श्री जय अंबे माता चैत्र नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून या उत्सवासाठी आई जगदंबा देवीची आज प्रथेप्रमाणे आगमन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे सहकुटुंब सहभागी होऊन भक्तगणांच्या उत्साहात सहभागी झाले. यावेळी ढोल ताशा पथक, लेझीम पथक, वारकऱ्यांच्या टाळ वीणा, दक्षिण भारतीय वाद्य तसेच वेगवेगळ्या लोककलावंतांची पथके सहभागी झाली होती. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे आणि त्यांच्या सून सौ.वृषाली शिंदे यांच्यासोबत स्वतः एकनाथ शिंदे हे देवीच्या मिरवणुकीत सहभागी झाले आणि त्यांनी ठाणेकर नागरिक व आबालवृद्धांशी संवाद साधला. तसेच आई जगदंबा देवीला ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदान येथे आगमन होताच स्वागत करून मंडपात स्थानापन्न करण्यात आले. उद्या चैत्र गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देवीची विधिवत पूजा करून या नवरात्रोत्सवाला मोठ्या श्रद्धेने सुरुवात होईल. यावेळी ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, हनुमंत जगदाळे, योगेश जानकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, विभागप्रमुख अमित जयस्वाल, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कोटवानी तसेच #शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक ठाणेकर नागरिक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
8
3
11
236