
आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल संदर्भातील अफवांवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश देत काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
या बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#gasshortage #diesel #petrol #guardianminister




MR


















































