Sanjay Rathod

4.3K posts

Sanjay Rathod banner
Sanjay Rathod

Sanjay Rathod

@SanjayDRathods

Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India शामिल हुए Nisan 2020
12 फ़ॉलोइंग15K फ़ॉलोवर्स
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
दारव्हा ते कारंजा महामार्गावरील टोल नाका आणि रस्त्याच्या कामासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन, यवतमाळ येथे आढावा बैठक घेतली. बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून तसेच पूर्ण झालेल्या कामातही काही त्रुटी आढळल्या. यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत व आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि टोल कंपनीला देण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना तसेच संबंधित अधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. #darwha #toll #guardianminister
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
0
0
2
21
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल संदर्भातील अफवांवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश देत काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. #gasshortage #diesel #petrol #guardianminister
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
0
2
4
65
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील महसूल भवन येथे जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी पांदन रस्त्यांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. #yavatmaldevelopment #maharashtradevelopment #maharashtra #guardianminister #yavatmal
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
0
0
4
43
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
रंगभूमी ही संस्कृतीची ओळख… कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या सर्व कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎭✨ #जागतिक_रंगभूमी_दिन #World_Theater_Day
Sanjay Rathod tweet media
MR
0
0
3
26
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
काल रात्री चिचघाट, जि. यवतमाळ येथे चैत्र नवरात्र व राम नवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत जगदंबा माता व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजबांधवांशी संवाद साधत योजनांची माहिती दिली व त्यांच्या समस्या व मागण्या ऐकून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. #रामनवमी #जयश्रीराम #जगदंबा #chaitranavratri #banjarasamaj
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
0
7
57
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
राम नवमीच्या पवित्र दिवशी पोहरादेवी येथे दर्शन घेऊन समाजबांधवांशी संवाद साधला. #रामनवमी #ramnavami #ramnavmi #jayshriram #जयश्रीराम
MR
0
2
4
57
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज दिग्रस येथे क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक व उत्कृष्ट सुविधा मिळणार असून त्यांच्या स्वप्नांना नवी उंची मिळेल. #sports #maharashtrasports #sportsinfrastructure #sportsindia #guardianminister
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
0
10
87
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
“आज आपण बंजारा समाजासाठी जे निर्माण करत आहोत, ते पुढे हजारो वर्ष राहणार आहे.” बंजारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव 📍गुरुद्वारा मैदान, पोहरादेवी #banjarasamaj #banjaraculture #gorbanjara #sevalalmaharaj #gormati
MR
0
4
8
41
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
राम नवमीच्या पावन प्रसंगी पोहरादेवी येथे जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज व बामण लाल महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर भक्तीधाम पोहरादेवी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. #रामनवमी #रामनवमी२०२६ #ramnavmi #ramnavami #jayshriram
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
3
9
95
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
“बंजारा समाजाची भाषा, संस्कृती टिकावी म्हणून गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन होत आहे. ती स्थापन व्हावी म्हणून मी माझे मंत्रिपद धोक्यात घातले होते, याचे अनेक साक्षीदार आहेत.” बंजारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव 📍गुरुद्वारा मैदान, पोहरादेवी #बंजारा_साहित्य_अकादमी #banjarasamaj #banjaraculture #gorbanjara #gormati
MR
0
3
9
87
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
पोहरादेवी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, गोर बंजारा साहित्य अकादमी आणि बणजारा विरासत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “बंजारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव” अंतर्गत भव्य बंजारा भजन महोत्सव उत्साहात सुरू आहे. या भक्तिमय सोहळ्यात विविध भागांतून आलेल्या भजन मंडळांनी सहभाग नोंदवत पारंपरिक बंजारा भजने व भक्तिगीतांनी वातावरण भारावून टाकले. सर्व सहभागी मंडळांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या महोत्सवातून बंजारा समाजाची समृद्ध भक्तीपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा प्रभावी जागर झाला. #banjarabhajan #bhajan #banjarasamaj #gorbanjara #banjaraculture
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
1
6
65