
निषेध महाराष्ट्र सरकारचा..
महिला आरक्षण विधेयकाच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर
पाच महिने पगार नाही पण
आशा कर्मचार्यांवर प्रचाराची सक्ति ..
आशा गट प्रवर्तक , अंगणवाडी सेविका ना आज केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे यासाठी बैठका गावा गावात घेण्यासाठी सांगितले आहे व समर्थनार्थ पंतप्रधान यांना मिस कॉल करा . ही मोहीम राबवली जाणार आहे. शासकीय कर्मचारी गैरवापर महाराष्ट्र सरकार करत आहे. आशा गट प्रवर्तक ना 5 महिने केंद्र सरकार मोबदला नाही. त्यांचे प्रश्न सोडवत नाही. आरोग्य काम सोडून राजकीय कामासाठी महिला यंत्रणेचा गैरवापर सरकार करत आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. संसदेत चर्चा सुरू असताना खासदार ना समजून सांगणे. पक्ष कार्यकर्ते नी वरील काम करणे वेगळे आहे. मात्र मानधन वरील कर्मचारी ना काम लादणे. सक्ती करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. याचा निषेध करत आहोत.
_ कॉम्रेड राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक AITUC!!
MR












