अभिजात मराठी 리트윗함

राज्यसभा खासदार म्हणून डॉ. ज्योती वाघमारेंनी आज शपथ घेतली. यावेळी नाकात नथ, डोक्यावर पदर अन् काठ पदर असलेली निळी साडी नेसलेल्या वाघमारेंच्या पेहरावाची चर्चा झालीच.
शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी मराठमोळ्या वेशभूषेत हातात संविधान हाती घेत राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. मात्र ही शपथ घेताना वाघमारे यांना अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवल्याचे समोर आले.
राज्यसभेत ज्योती वाघमारे या शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती. यावेळी वाघमारे यांनी शपथ वाचताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबमुनी महाराज, जिजाऊ, सावित्री, रमाई, माता अहिल्या यांना मानाचा मुजरा करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ईश्वर साक्षीने शपथ घेण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी राज्यसभेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि त्यांना पुन्हा एकदा शपथ वाचायला सांगितली. त्यानंतर वाघमारे यांनी पुन्हा संसदेने लिहून दिलेली शपथ वाचून दाखवली.

MR














