PRO Bhandup Mahavitaran

1.3K posts

PRO Bhandup Mahavitaran

PRO Bhandup Mahavitaran

@BhandupMSEDCL

Katılım Haziran 2012
34 Takip Edilen952 Takipçiler
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणच्या ऊर्जा क्षेत्रातल्या कामगिरीला महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले! गोरेगाव (मुंबई) येथील बॉम्बे एक्जिबिशन सेंटरमध्ये आयोजित ECAMEX 26 या विद्युत उपकरणे, साहित्य व विद्युत सुरक्षा विषयक प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रदर्शनाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, सुरक्षितता आणि नवकल्पनांना चालना मिळत आहे. #MSEDCL #ECAMEX26 #EnergyExhibition #ElectricalSafety #PowerSector
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
5
11
2.7K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
अहिंसा, सत्य आणि करुणा या त्रिसूत्रीचा अवलंब करून शांतता आणि सद्भावना निर्माण करूया. भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #MSEDCL #Mahavitaran #MahavirJayanti #Electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
4
4
12
1.7K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ऊर्जा परिवर्तनाद्वारे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्त व शाश्वत विजेकडे वाटचाल सुरु झाली आहे. या कामगिरीचा सन्मान म्हणून नवी दिल्ली येथे स्कोच समूहाच्या वतीने महावितरणला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारासमवेत राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक आणि संचालक सर्वश्री सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प),अनुदीप दिघे (वित्त),राजेंद्र पवार (मानव संसाधन) तसेच नवी दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #Award
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
2
2
10
1.7K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
प्रशासकीय पारदर्शकता आणि ई-गव्हर्नन्सचा गौरव! महाराष्ट्र शासनाच्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत अग्रगण्य शासकीय कंपन्या/मंडळांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र (भा.प्र.से.) यांना मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिष शेलार, मुख्य सचिव मा. श्री. राजेश अग्रवाल उपस्थित होते. महावितरणकडून वीज ग्राहक सेवा सुलभता, डिजिटल सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्द्यांवर सर्वोत्तम शासकीय कंपनीचा मान मिळवला. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #Award
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
10
4
11
2.4K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
राष्ट्रीयस्तरावर महावितरणची दमदार कामगिरी! अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने कोटा, राजस्थान येथे आयोजित ४७व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महावितरणच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत शरीरसौष्ठव प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकावले! या यशाबद्दल मुख्यालयात झालेल्या कौतुक सोहळ्यात संचालक (वित्त) श्री. अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललित गायकवाड, संघ व्यवस्थापक श्री. प्रमोद राजेभोसले आणि प्रशिक्षक श्री. गोपाल कुलकर्णी उपस्थित होते. महावितरणच्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! #MSEDCL #SportsAchievement #TeamMSEDCL #Mahavitaran
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
5
4
11
1.9K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीराम यांचे आदर्श, न्यायप्रियता आणि लोककल्याणाची शिकवण आपल्या सर्वांना प्रगतीपथावर नेण्यास प्रेरणा देवो. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #RamNavami
MR
5
4
13
2.4K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ला ‘ISGF Innovation Award 2026’ पुरस्कार! नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम स्मार्ट ग्रिड प्रकल्पाचा मान. महावितरणने स्मार्ट ग्रीड अंतर्गत विकसित केलेल्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ला ‘ISGF Innovation Award 2026’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कार्यकारी संचालक श्री. दत्तात्रेय पडळकर आणि मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. अविनाश हावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम'द्वारे राज्यातील ३,२०० पेक्षा अधिक उपकेंद्रे मुंबईतील कमांड अँड कंट्रोल सेंटरशी डिजिटल पद्धतीने जोडली गेली असून त्यामुळे वीजपुरवठ्याचे रिअल-टाइम नियंत्रण आणि अचूक मागणीचे पूर्वनियोजन शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज पुरवठा करण्यासाठी २,७०० पेक्षा अधिक सौर कृषिवाहिन्यांचा या सिस्टममधे समावेश आहे. विजेच्या मागणीचे अचूक पूर्वानुमान होत असल्याने वीज खरेदीमध्ये सुमारे ₹१,१०० कोटींची बचत साध्य झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! #MSEDCL #SmartGrid #EnergyInnovation #EnergyLeadership
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet mediaMaharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
3
2
3
1K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
नवी दिल्लीतील यशोभूमी (IICC) संकुलात आयोजित भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ मध्ये ऊर्जा राज्यमंत्री मा. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वीज क्षेत्रातील आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या महावितरणच्या दालनाला भेट दिली. या भेटीदरम्यान महावितरणचे संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी, कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंडारे आणि मुख्य महाव्यवस्थापक (नाशिक प्रशिक्षण केंद्र) श्री. अरविंद भादीकर उपस्थित होते. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet mediaMaharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
8
2
6
1.2K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
A proud moment for MSEDCL at Bharat Electricity Summit 2026. Hon’ble Secretary, Ministry of Power, Shri Pankaj Agarwal, visited the Mahavitaran stall and appreciated MSEDCL’s successful implementation of MSKVY 2.0. Executive Director Bhujang Khandare welcomed him on behalf of the team. Moments like these reaffirm our larger vision, to take solar power to the heart of agriculture and build a more sustainable, farmer-first energy future. #MSEDCL #Mahavitaran #CleanEnergy #MSKVY2.0
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
English
6
2
8
1.4K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
ऊर्जा क्षेत्रातील नव्या विचारांना मिळाला राष्ट्रीय मंच! नवी दिल्ली मधील ‘यशोभूमी’ (IICC) येथे होणाऱ्या ‘भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६’ मध्ये केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते महावितरणच्या दालनाचे दिमाखात उद्घाटन झाले. देशातील ऊर्जा क्षेत्रातील नवकल्पना आणि तांत्रिक प्रगती सादर करणाऱ्या या व्यासपीठावर महावितरणच्या उपक्रमांना विशेष दखल मिळाली. या भेटीतून अधिक सक्षम आणि शाश्वत वीज वितरणाच्या दिशेने सुरू असलेल्या महावितरणच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली. #MSEDCL #IndiaElectricitySummit #EnergyInnovation #SustainableEnergy #NewDelhi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet mediaMaharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
3
2
7
924
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
नवीन वर्षारंभाच्या या मंगल प्रसंगी सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या नव्या वर्षाची सुरुवात नव्या उमेदीनं आणि नव्या संकल्पांसह होवो! #GudiPadwa #NewYear #Mahavitaran #MSEDCL #NewBeginnings
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
4
19
1.3K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
विद्युत क्षेत्राचा प्रकाश तेजोमय करणाऱ्या सर्व महिला अधिकारी, अभियंता, कर्मचारी आणि लाइनवूमन यांना हार्दिक शुभेच्छा!! लोकेश चंद्र (भा.प्र.से.) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण कंपनी #MSEDCL #Mahavitaran #Electricity #InternationalWomensDay
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
2
4
15
1.1K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
सृजनाच्या शक्तीचा उगम म्हणजे ती संस्कारांच्या प्रकाशाची ज्योत म्हणजे ती जिद्दीने भविष्य घडवणारी प्रेरणा म्हणजे ती अशा प्रत्येक तेजस्वी 'ती'ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #InternationalWomensDay #MSEDCL #Mahavitaran #Electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
2
3
12
1.4K
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या वतीने राष्ट्रीय लाइनमन दिनाचे दि. ७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्युत सुरक्षेबाबत लावलेल्या महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक आणि प्राधीकरणाचे अध्यक्ष मा. श्री. घनश्याम प्रसाद यांनी भेट दिली. यावेळी महावितरणचे २०२५ मधील विक्रमी लोकसहभागाचे विद्युत सुरक्षा अभियान, दर सोमवारी विद्युत सुरक्षा शपथ उपक्रम आदींची माहिती देण्यात आली. या उपक्रमांचे मा. श्री. नाईक यांनी विशेष कौतुक केले. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
3
2
6
931
PRO Bhandup Mahavitaran retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या वतीने राष्ट्रीय लाइनमन दिनाचे दि. ७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महावितरण विद्युत सुरक्षा अभियानाचे समन्वयक डाॅ. संतोष पाटणी, श्री. मुकुंद कुलकर्णी तसेच प्रातिनिधिक लाइनमन म्हणून दिपाली खोब्रागडे (जि. नागपूर),अशोक आव्हाड (जि. अहिल्यानगर), आदिनाथ पवार (जि. सांगली) व मनोज भोटकर (जि. छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले. #MSEDCL #Mahavitaran #Power #Electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
1
2
5
966