Sharad Pawar

10.3K posts

Sharad Pawar banner
Sharad Pawar

Sharad Pawar

@PawarSpeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Katılım Ekim 2013
10 Takip Edilen2.9M Takipçiler
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
ईद मुबारक. बकरी ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Sharad Pawar tweet media
हिन्दी
30
44
668
5.3K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
अत्यंत दारिद्र्य आणि कठीण परिस्थितीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण व समाजपरिवर्तनाच्या प्रवासात खंबीर साथ देत त्याग, संयम आणि संघर्षाचा जिवंत आदर्श घालून देणाऱ्या रमाई भीमराव आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळे उभी राहिलेली चळवळ वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारी ठरली. समाजपरिवर्तनाच्या विचारांना खंबीर आधार देणाऱ्या रमाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन.
Sharad Pawar tweet media
MR
6
22
185
3.5K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
दूरदृष्टी, विचार आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श ठेवणारे आधुनिक भारताचे प्रथम पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांना बळ देत आधुनिक राष्ट्राची पायाभरणी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीला नवी दिशा दिली. औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी भारताला आधुनिकतेकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
Sharad Pawar tweet media
MR
10
37
293
4K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत सौजन्य, समन्वय आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची छाप उमटवणारे स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राज्यकारभाराला नवी दिशा दिली. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना पायाभूत सुविधा, उद्योगवाढ आणि ग्रामीण विकास यांना चालना देत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान दिले. राजकीय संस्कृतीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
14
73
1.1K
11.6K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
भारतातील संघटित कामगार चळवळीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) च्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ‘Gandhi vs Lenin’ या लेखनातून त्यांनी सामाजिक-आर्थिक विचारांना नवी दिशा दिली, तर गिरणी कामगारांच्या चळवळीत सक्रिय नेतृत्व करत त्यांनी श्रमिकांच्या हक्कांसाठी प्रभावी लढा उभारला. श्रमिक चळवळीचे पितामह कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
5
12
124
5.5K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
सामाजिक सुधारणा, स्त्रीशिक्षण आणि विवेकनिष्ठ विचारांचा पुरस्कार करत समाजातील कुप्रथांविरुद्ध कठोर भूमिका घेणारे राजा राममोहन रॉय यांनी भारतीय समाजाला नव्या विचारांची दिशा दिली. सुधारणावादी विचारसरणीला बळ देत समाजप्रबोधनाची नवी वाट दाखवणारे कुप्रथांचे कठोर भाष्यकार राजा राममोहन रॉय यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
5
11
144
4.1K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आधुनिक भारताच्या उभारणीत तंत्रज्ञान, शिक्षण आणि युवक सक्षमीकरणाला प्राधान्य देत नव्या युगाची दिशा देणारे स्व. राजीव गांधी यांनी दूरसंचार, संगणकीकरण आणि पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. देशाच्या प्रगतीत युवा शक्तीचा सहभाग वाढवण्याचा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन आजही मार्गदर्शक ठरतो. युवा भारताचा समग्र विचार जोपासणारे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
4
29
177
3.7K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
विश्वाच्या रहस्यांचा शोध घेत भारतीय खगोलशास्त्राला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणारे डॉ. जयंत नारळीकर यांनी संशोधनासोबतच विज्ञानलेखनातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण केली. ‘The Structure of the Universe’, ‘Seven Wonders of the Cosmos’ तसेच ‘आकाशाशी जडले नाते’ यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने पोहोचवले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
10
10
136
4.8K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
रणांगणातील शौर्य, दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वाच्या बळावर राजे मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाने आणि प्रजाहितदक्ष कारभाराने इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. माळव्याच्या भूमीत सुदृढ प्रशासन उभारून त्यांनी राज्यकारभाराला नवी दिशा दिली. राष्ट्रनिष्ठेचे शौर्यवान प्रतीक श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
8
20
166
3.5K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आज मुंबईत 'लक्ष्मणराव गुट्टे रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे' द्वारा आयोजित 'माजी प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी' ह्यांचा कृतज्ञता आणि स्नेह मेळाव्यात (Get Together) सहभागी झालो आणि गेली अनेक दशकं युवक आणि अन्य संघटनांच्या माध्यमातून राज्याच्या, देशाच्या राजकारणात योगदान देणाऱ्या आणि आजमितीला विविधं पक्षांमध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांशी संवाद साधला आणि ह्या सामूदायिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ---   इथं यायच्या आधी मला सांगण्यात आलं मी महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलं. युवक काँग्रेसचा अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी अशा सगळ्यांचं आज इथे संमेलन आहे. "आम्ही सगळे भेटणार आहोत आणि एकमेकांच्या संबंधीच्या आठवणी सांगणार आहोत. आणि तुम्ही या" पण इथे आल्याच्या नंतर तुम्ही माझा सत्कार करताय आणि तुमच्या आठवणीच विसरून गेले आहात. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ युवक काँग्रेसच्या संघटनेला दिला. अनेक वर्ष काम केलं. आज कुणी कोणत्या पक्षात असेल-नसेल पण सामान्य लोकांच्यात आहात, आणि लोकांची बांधिलकी ही जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवलेली आहे. सर्वांचं ऐकल्यानंतर मलाही माझे तेव्हाचे दिवस आठवले. १९५८ साली, वयाच्या १८ व्या वर्षी मी बारामतीतून पुण्यामध्ये शिकायला आलो. बारामतीला तेव्हा कॉलेज नव्हतं. आणि आल्यानंतर युवक चळवळीमध्ये सहभागी झालो, ४ वर्षांनी पुणे शहर युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. त्यानंतर ५ वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. आणि देशाच्या युवक संघटनेत सहभागी झालो. त्यावेळची स्थिती वेगळी होती. जी राष्ट्रीय लोकांची संघटना होती त्याच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. आणि आम्ही सगळे त्यात सहभागी होतो. मला आठवतंय की, एकेदिवशी इंदिराजींना आम्ही विनंती केली की, आम्हाला जवाहरलाल नेहरूंना भेटायचं आहे. पंडितजी होते तेव्हा. इंदिराजींनी एक मिटिंग ठेवली, युवकांच्या अध्यक्षांची आणि त्या मीटिंगला पंडित जवाहरलाल नेहरू येतील असं सांगितलं आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळेजण विचार करायला लागलो की आपल्या आयुष्यात ही फार मोठी संधी आहे. आपण काही प्रश्न पंडितजींच्या समोर मांडू. मग ते शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील, त्रिमूर्ती हे नेहरूंचं दिल्लीचं निवासस्थान होतं. तिथं ही बैठक होती. आम्ही सगळे बैठकीला गेलो. सगळ्यांनी ठरवलं होतं, मी काय बोलायचं ? दुसरं कुणी काय बोलायचं? आणि त्याप्रमाणे आम्ही तयारीने गेलो. पंडितजी आले आणि आम्ही काय बोलायचो हेच विसरून गेलो. कारण त्यांची पर्सनॅलिटी एवढी मोठी होती की, आम्हाला बाकी काही सुचलंचं नाही. अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. आनंदाची गोष्ट अशी की, त्या काळात इंदिरा गांधी ह्या युवक संघटनेच्या प्रमुख होत्या. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. इंदिराजी या देशाचं नेतृत्व करत होत्या तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला ऐकायला मिळाली. इंदिरा गांधी Prime Minister होत्या. आणि त्यांची एक Visit रशियाला होती. रशियाला इंदर कुमार गुजराल हे राजदूत होते. साधारणतः एखाद्या देशाचा प्रधानमंत्री तुमच्याकडे आल्यानंतर त्या लेव्हलच्या पदाधिकाऱ्याने त्यांचं स्वागत करायचं असतं. इंदिरा गांधी मॉस्कोला उतरल्या. त्यांचं स्वागत करायला रशियाचा वरिष्ठ नेता आला नव्हता, काही अधिकारी आले होते. खुद्द गुजराल ह्यांच्याकडून ही गोष्ट मी ऐकलेली आहे. गुजरात राजदूत होते, त्यांनी इंदिरा गांधींचं स्वागत केलं. इंदिरा अस्वस्थ दिसल्या. कारण त्यांचं स्वागत त्यांच्या levelच्या पदाधिकाऱ्याने केलं नव्हतं. त्यांनी गुजरालना सांगितलं की, जिथे इंडियन एम्बसी (भारतीय दूतावास) आहे तिथं मला जायचंय. रशियातील इंडियन एम्बसी मोठी आहे. तिथं भारतीय अधिकारी राहतात. इंदिरा तिथं गेल्या, तयार झाल्या आणि त्यानंतर गुजरालना सांगितलं इथं जी कुटुंबं राहतात त्यांच्यात जी लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना बोलवा. ९-१० मुलं होती, आणि इंदिरा गांधी तिथं त्या मुलांबरोबर खेळायला लागल्या. रशियाचे राष्ट्रप्रमुख हे स्वागतासाठी एका ठिकाणी उभे होते. त्यांनी इंदिरा गांधींना रिसिव्ह केलं नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, इंदिरा गांधी राष्ट्र प्रमुखांच्या घरी येण्याऐवजी एम्बसीला गेल्या आहेत. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं देशाच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधींचा आपण सन्मान केला नाही. त्यांना आपण यथोचित पद्धतीनं रिसिव्ह केलं नाही. मग ते स्वतः आणि इंडियन एम्बसीत गेले, आणि इंदिरा गांधींची माफी त्यांनी मागितली. इंदिरा गांधींनी सांगितलं. हा आपल्या माफीचा प्रश्न नाही. ४० कोटी लोकांचं प्रतिनिधित्व मी करते आणि त्या ४० कोटी लोकांची प्रतिष्ठा जर राखली जात नसेल तर हे मी कधीही मान्य करणार नाही.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
7
27
247
7.6K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
गोविंदबाग, शारदानगर (बारामती) येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेल्या ऊस आणि केळी पिकांची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, सदाशिव बापू सातव, मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तसेच मराठी भाषा-संस्कृतीचे अभ्यासक प्रा. डॉ. दिपक पवार आणि युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
12
29
599
24.8K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
दौंड तालुक्याच्या माजी आमदार तसेच विद्यमान पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या मातोश्री उषादेवी कृष्णराव जगदाळे (पाटील) यांचे काल दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
1
14
292
10.8K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. समाजातील मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून संवेदनशीलतेने माणसांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Sharad Pawar tweet media
MR
2
30
327
18.1K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
शिरूरचे माजी आमदार व पक्षातील माझे सहकारी ॲड. अशोक (बापू) पवार ह्यांचे चिरंजीव ऋषिराज व चि. सौ. का. सिमरन ह्यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो आणि नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
5
36
855
48.9K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवली. औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपली.तेजस्वी बुद्धिमत्ता, अपराजित रणनिती सह्याद्रीचा लढवय्या धुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!
Sharad Pawar tweet media
MR
11
52
336
7.6K