Pratap Baburao Sarnaik

7.1K posts

Pratap Baburao Sarnaik banner
Pratap Baburao Sarnaik

Pratap Baburao Sarnaik

@PratapSarnaik

Transport Minister, Maharashtra State | Guardian Minister, Dharashiv District | MLA, Ovala Majiwada Vidhan Sabha

Thane Katılım Nisan 2011
236 Takip Edilen35.7K Takipçiler
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनसेवेत रूजू... मुंबई - पुणे मिसिंग लिंक प्रकल्प आजपासून जनतेसाठी खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अथक परिश्रमाने साकार झालेला हा प्रकल्प आता मिसिंग लिंक नसून महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिंग लिंक आहे. या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहीला आहे. #MissingLink #MissingLinkProject #EknathShinde #ShivsenaOfficial #Mumbaipune
MR
2
0
0
97
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
सुरक्षित धाराशिवकडे एक ठोस पाऊल! धाराशिव पोलीस दलात अद्ययावत वाहनांचा समावेश आता प्रतिसाद अधिक वेगवान, कारवाई अधिक प्रभावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव सज्ज. #PratapSarnaik #GuardianMinister #Dharashiv #PoliceUpgrade #SafeCity
MR
0
1
8
204
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ १ मे २०२६ | 📍 धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेतून धाराशिव पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या अद्ययावत वाहनांचे आज दिमाखात अनावरण केले. वाढता विस्तार आणि सुरक्षिततेची गरज लक्षात घेता, या नव्या वाहनांमुळे पोलिसांसाठी अधिक प्रभावी आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांना अधिक सोयीचे ठरेल. धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांचे जीवनमान सक्षम पोलिस व्यवस्थेच्या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. @Infodharashiv #PratapSarnaik #GuardianMinister #Dharashiv #NewPoliceVehicles #inauguration
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
1
1
4
155
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ १ मे २०२६ | 📍 धाराशिव महाराष्ट्र दिनाच्या पावन व गौरवशाली प्रसंगी आज धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध विकासकामांचे माझ्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून शुभारंभ व उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. “आरोग्य हीच खरी संपत्ती” ही केवळ घोषणा नसून, ती आपल्या विकासाची पायाभूत अट आहे. निरोगी नागरिकांमुळेच समाज आणि राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकते. याच दृष्टीने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२६ पासून “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” हे व्यापक अभियान सुरू केले आहे. हे केवळ आरोग्य कार्यक्रम नसून, गावागावांत स्वच्छ, निरोगी आणि सक्षम समाज निर्माण करण्याचा एक सामूहिक संकल्प आहे. या अभियानांतर्गत क्षयरोग, कुष्ठरोग, हिवताप, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविणे, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान व उपचार यावर विशेष भर दिला जात आहे. त्याचबरोबर गर्भवती मातांची काळजी, बालकांचे संपूर्ण लसीकरण, कुपोषण निर्मूलन आणि व्यापक जनजागृती यावरही प्राधान्याने काम केले जाणार आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने २ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४ उपकेंद्रांचे उद्घाटन ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. या नव्या आरोग्य सुविधा केंद्रांमुळे प्राथमिक उपचार, तपासणी, लसीकरण, आपत्कालीन आरोग्यसेवा तसेच विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल. यासोबतच, धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवीन रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे, धाराशिव जिल्ह्यातील तलाठी कार्यालये व मंडळ कार्यालयांच्या इमारतींचे ऑनलाइन भूमिपूजन केले. या सर्व विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा, जलद सेवा आणि गुणवत्तापूर्ण प्रशासन मिळेल, असा मला विश्वास आहे. या कामांसाठी प्रयत्न करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, महसूल विभाग तसेच संबंधित सर्व यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! #PratapSarnaik #GuardianMinister #Dharashiv #DevelopmentalWorks #publicservice
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
1
0
2
79
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
१०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला आपला महाराष्ट्र… संस्कृती, शौर्य आणि प्रगतीचा अभिमान असलेला दिवस असून माय मराठीच्या सन्मानासाठी सदैव कटिबद्ध! महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩 #PratapSarnaik #GuardianMinister #Dharashiv #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
MR
0
1
9
175
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ १ मे २०२६ l📍धाराशिव बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। १०६ हुतात्माच्या बलिदानाने आणि मराठी माणसाच्या संघर्षाने आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १ मे हा आपल्यासाठी हा संस्कृती, शौर्य, प्रगती आणि एकतेचा प्रतीक असलेला विशेष दिवस! आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नाही, तर ही आमची ओळख आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मार्गदर्शनापर्यंत आपला इतिहास प्रेरणादायी आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचे अतुलनीय योगदान राहिले आहे. ही वैभवशाली परंपरा जपत महाराष्ट्राला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगतीपथावर नेण्याचा व माय मराठीचा सन्मान राखण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनी करूया. जनतेच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #PratapSarnaik #Transportminister #GuardianMinister #Dharashiv #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
4
1
16
314
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
अखंड मानवजातीला सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन! सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #BuddhaPurnima #BuddhaJayanti #GautamBuddha #बुद्धपौर्णिमा
Pratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
0
2
124
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
हुतात्म्यांच्या त्यागातून आणि असंख्य मराठी माणसांच्या अथक संघर्षातून घडलेला आपला महाराष्ट्र… ही केवळ भूमी नाही, तर परिश्रम, स्वाभिमान आणि प्रगतीची ओळख आहे. या मातीतल्या कष्टकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला विकास, आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा यामुळेच महाराष्ट्र आज देशाच्या प्रगतीत अग्रस्थानी आहे. या वैभवशाली परंपरेचा वारसा जपत, महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाऊया. सर्व महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #जयमहाराष्ट्र #MaharashtraDay
MR
2
0
6
143
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ ३० एप्रिल २०२६ | 📍 इंदापूर धाराशिव दौऱ्यावर जात असताना इंदापूर येथील एसटी महामंडळाच्या बस स्थानकाला अचानक भेट देत तेथील एकूणच व्यवस्था व प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची सविस्तर पाहणी केली. स्थानक परिसरातील स्वच्छता, प्रतीक्षालय, तिकीट व्यवस्था यासोबतच विशेषतः खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या भेटीदरम्यान प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळावी, तसेच त्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि विश्वासार्ह व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि राहू. #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #Indapur #Inspection #PublicService @msrtcofficial
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
6
0
3
254
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ ३० एप्रिल २०२६ | 📍 पुणे आज धाराशिव दौऱ्यावर जात असतांना एसटी महामंडळाच्या बसेस महामार्गावर अल्प विश्रांतीसाठी थांबतात अशा हॉटेलांना भेट देत दिली. याठिकाणी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली व खाद्य पदार्थांच्या दर्जाची तपासणी केली. यावेळी प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. संवादादरम्यान बहुतेक सर्व प्रवाशांनी या उपहारगृहांमध्ये मिळत असलेल्या सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. एसटी महामंडळाच्या प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळाव्या आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #inspection #FoodCourt
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
0
5
315
Pratap Baburao Sarnaik retweetledi
Shivsena - शिवसेना
१ मे पासून महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनतेच्या सेवेत.... मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकाऱ्याने आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 'मिसिंग लिंक' जनतेच्या सेवेत दाखल होत असून मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. #EknathShinde #Shivsena #MissingLink #MumbaiPuneExpressway
MR
3
31
28
803
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ ३० एप्रिल २०२६ l 📍 पुणे पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी तसेच घरगुती सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश दिले. चालक-वाहक हा एसटीचा कणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून तो दररोज राज्यातील सुमारे ५० ते ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील. बसस्थानकाची पाहणी करून अनेक वर्षे बंद असलेले व्यापारी गाळे महिला बचत गटांना व होतकरू उद्योजक तरुणांना अत्यल्प भाड्यात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढेल तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. १ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली. या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते. #Pratapsarnaik #Transportminister #Vallabhnagar #STdepot #pune @msrtcofficial
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
3
1
5
171
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓️ ३० एप्रिल २०२६ | 📍 लोणावळा नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे! आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बस डेपो कर्मचारी आणि प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला. त्याचप्रमाणे, संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना देखील दिल्या. दरम्यान, लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या बसस्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली. या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानुसार, कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाला दिले. या पाहणीदरम्यान बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. @msrtcofficial #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #LonavlaBusDepot #inspection
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
6
1
12
445