
प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या "राजा शिवाजी" या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले @Riteishd - @MeDeshmukh, सून @geneliad आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩 @AmitV_Deshmukh @Prateek_J_Patil












