Rajesh Tope

10.2K posts

Rajesh Tope

Rajesh Tope

@rajeshtope11

Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks

เข้าร่วม Ağustos 2010
102 กำลังติดตาม589.8K ผู้ติดตาม
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
आज मौजे दुनगांव (दर्गा) ता.अंबड येथील नियामत खान समशेरखाँ पठाण यांच्या मुलाच्या रिसेप्शन (वलीमा) या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखा, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...!
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
2
331
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
श्री.विलास शहादेव गायके रा.सिरनेर ता.अंबड यांच्या मुलाचे व श्री.सुरेश देवराव मंडलीक रा.दुनगाव ता.अंबड यांच्या मुलीच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखा, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...!
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
7
299
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
आज जालना येथे राजुरी स्टील आणि क्रेडाई जालना प्रॉपर्टी एक्स्पो चे उ‌द्घाटन करण्यात आले.एक्स्पोचे दिनांक 10, 11 व 12 एप्रिल 2026 पर्यंत गॅलेक्सी हॉटेल,जालना येथे आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शहर आणि परिसरातील आघाडीच्या विकासकांचे फ्लॅट्स,रो-हाऊस, प्लॉट्स आणि व्यावसायिक जागा एकाच छताखाली उपलब्ध करून देते,जे गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी एक उत्तम सुवर्णसंधी आहे. यावेळी श्री.प्रफुल्लजी तावरे,अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र,श्रीमती वंदनाताई मगरे महापौर, महानगरपालिका जालना,श्री.कौस्तुभ लोया संचालक,राजुरी स्टील,श्री.राजेश राऊत,उपमहापौर,महानगरपालिका जालना.,श्री.अमित मुंदडा संचालक,राजुरी स्टील आदी उपस्थित होते.
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
3
245
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा मौजे घनसावंगी येथे भक्तिमय वातावरणात श्री.गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून धार्मिक विधिवत पूजा करून आरती केली. गणपती बाप्पा मोरया ! #ganpatibappamorya
MR
0
0
3
212
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
मौजे घनसावंगी येथील सय्यद मुतालिक गणि यांच्या आईचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली..!
Rajesh Tope tweet media
MR
0
0
7
270
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
अंबड तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालय,जामखेड येथील विद्यार्थिनी कु.आदिती राजू खवाटे व जि.प.प्रा.शाळा,जामखेड येथील विद्यार्थिनी कु.शर्वरी शिवाजीराव जाधव यांची जवाहर नवोदय विद्यालय, परतूर येथे निवड झाल्याबद्दल जालना येथील अजिंक्य निवासस्थानी सत्कार करून अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
6
414
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि भारताचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Rajesh Tope tweet media
MR
0
0
2
147
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार बदनापूर शहराच्या वतीने शहरात रमजान ईदच्या निमित्ताने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ईद मिलन कार्यक्रमात बदनापूर शहरातील सर्व धर्मीय मान्यवर उपस्थित होते. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खा.डॉ.कल्याण काळे, माजी आ.संतोष सांबरे, जिल्हाध्यक्ष डॉ.निसारजी देशमुख, नगरसेवक फेरोज खान यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
9
272
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
शौर्य दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलातील सर्व जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.! ९ एप्रिल १९६५ रोजी कच्छच्या रणात सीआरपीएफच्या केवळ एका तुकडीने सरदार पोस्टवर पाकिस्तानी ब्रिगेडचा हल्ला परतवून लावत आपले शौर्य दाखवून दिले होते. सीआरपीएफच्या शूर जवानांच्या या अतुलनीय पराक्रम आणि बलिदानास आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रहितासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या दलाचा प्रत्येक भारतीयाला केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांचा सार्थ अभिमान आहे. #CRPF #शौर्यदिन
Rajesh Tope tweet media
MR
0
0
7
388
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
आज संत ज्ञानपीठ, पैठण येथे जायकवाडी कालवा सल्लागार समिती बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे होऊ घातलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मी उपस्थित असतो.यावर्षीही आपल्या भागाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून मी उपस्थित राहून प्रकर्षाने म्हणणे मांडले. आपल्या डाव्या कालव्याला येथूनपुढे किमान पावसाळा सुरू होईपर्यंत मार्च,एप्रिल,मे व जून पर्यंत पाणी पाळ्या मिळत राहाव्यात अशी अपेक्षा केली.ती मा.मंत्री महोदयांनी मान्य देखील केली. आपण गोदावरी नदीवर निर्माण केलेल्या बॅरेजेसमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी संपते ते धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडण्याबाबत आपण आकस्मित पाण्यासाठी आरक्षित करून हक्काचे पाणी म्हणून सोडावे. कारण या पाण्याची आवश्यकता म्हणजे पिण्याचे पाणी,जनावरांचे पाणी आणि रब्बीच पाणी अशासाठी उपयुक्तता असते त्याला मान्यता देण्यात आली. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाते.यामध्ये खासकरून उजव्या कालव्यातून पाण्याचा अपव्य खूप होतो.ते पाणी डाव्या कालव्यातून सोडावे अशी कडा विभागाला विनंती केली. डाव्या कालव्याला पूर्ण लाइनिंग करून,सुस्थितीत करून पाण्याची वनक्षमत क्षमता चांगली राहील त्याबाबत लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली.ती देखील मान्य करण्यात आली. उजव्या व डाव्या कालव्यावरील चाऱ्या,मायनर,सब मायनर व सर्विस रोड मोठ्या प्रमाणात दुरुस्त करणे गरजेचे आहे,यामुळे टेलपर्यंत पाणी मिळेल याबाबत अग्रही भूमिका मांडल्यानंतर याबाबतीत आपण पाईपलाईनने पाणी देण्याची व्यवस्था करू असे मंत्री महोदयांनी सांगितले.तो पर्यंत दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले. तसेच उजव्या व डाव्या कालव्यावरील सर्व चाऱ्यावर पाणी वापर सहकारी संस्था निर्माण व्हाव्यात त्यातून हक्काचे पाणी संबंधित चाऱ्यांना मिळावे. जायकवाडी लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी विक्री होत असते यामध्ये अनकमांड भागातील संबंधित शेतकऱ्यांना अनकमांड प्रमाणपत्र कडा विभागाने देण्यात यावेत. जायकवाडी धरणात बाष्पीभवनातून जे साडेतीनशे दशलक्ष घनमिटर पाणी वाया जाते यासाठी पूर्वी धरणात तरंगणारे सोलरचे पॅनल टाकून वीज निर्मिती करण्याचा जो प्रकल्प आहे तो झाल्यास बाष्पीभवन थांबेल व वीज निर्मितीचे काम देखील होईल याबाबत लक्ष घालावे,आदी विविध प्रलंबित विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खा.डॉ.कल्याण काळे,खा.श्री.रामराव वड‌कुते,मा. आ.श्री.अमरसिंह पंडीत,मा.आ.श्री रमेश बोरनारे,मा.श्री.विलास बापू भूमरे,आ.श्री.विजयसिंह पंडीत यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
15
507
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
जय सेवालाल...!! आपली समृद्ध परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि निसर्गाशी घट्ट नाळ जपणारा बंजारा समाज हा राज्याच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. विश्व बंजारा दिनानिमित्त सर्व बंजारा बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #विश्वबंजारादिन #बंजारा_समाज
Rajesh Tope tweet media
MR
0
1
10
280
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य क्रांतिकारक, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक 'मंगल पांडे' यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Rajesh Tope tweet media
MR
0
0
3
225
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
श्री.केतन संदिपान मुंजाळ रा.मार्डी ता.अंबड यांची अकोला पोलिस व श्री.नितीन दादाराव झणझणे रा.कौवडगाव ता.अंबड यांची वर्धा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल आज जालना येथील अजिंक्य निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.केतन व नितीन यांनी पोलीस सेवेत असताना सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
Rajesh Tope tweet media
MR
0
0
11
640
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत. आरोग्याबाबत जागरूकता, संतुलित जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचा अवलंब करूनच आपण निरोगी समाज घडवू शकतो. जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा! #WorldHealthDay
Rajesh Tope tweet media
MR
0
0
7
290
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
मौजे लखमापुरी ता.अंबड येथील श्री मच्छिंद्र काळे यांच्या वडील चे निधन झाले.तसेच मौजे सुखापूरी येथील श्री. संभाजी राखुंडे यांच्या आईचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली..!
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
9
825
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाची पावन स्मृती जागवणारा हा दिवस नव्या सुरुवातीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विश्वास, सहिष्णुता आणि आनंद नांदो, तसेच समाजात एकोप्याची भावना अधिक बळकट होवो, हीच प्रार्थना. सर्व ख्रिस्ती बांधवांना इस्टर संडेच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyEaster #Easter
Rajesh Tope tweet media
MR
1
1
8
352
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
आज यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान व अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रैभाषिक कविसंमेलनाचे उदघाटन करुन उपस्थित साहित्यिक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त राजेंद्र गायकवाड, मसापचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तौर, प्राचार्य दादासाहेब गजहंस, संजिवनी तडेगावकर, रेखा बैजल, शायर लियाकत अली खान यांच्यासह मराठवाड्यातील नामवंत कवी, शायर, साहित्यिक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Rajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet mediaRajesh Tope tweet media
MR
0
0
8
367
Rajesh Tope
Rajesh Tope@rajeshtope11·
नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना..! मृत्यू झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!
MR
1
0
8
524