Post

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
संपन्नतेची, समृद्धीची... गुढी उभारूया सर्वांगीण विकासाची!🚩 गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! गुढीपाडवा हा प्रत्येकासाठी नव्या सुरुवातीचा दिवस असून, याच दिवसापासून नवे संकल्प आकार घेतात. यानिमित्त आज नागपूर येथे ‘भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण’ कार्यक्रमात सहभागी होत नववर्षाचे स्वागत केले. उत्साह, परंपरा आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भव्य शोभायात्रेत नागपूरकर बंधू-भगिनींसोबत नवचैतन्याचा आनंद अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताची गुढी अशीच उंचावत राहो, हाच विश्वास मनी बाळगून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार अधिक बळकट केला. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @SandipJoshiNGP #Maharashtra #Nagpur #GudiPadwa
CMO Maharashtra@CMOMaharashtra

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित 'भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 CM Devendra Fadnavis at the 'Grand Shobha Yatra and Ram Raksha Pathan' organized on the occasion of Gudi Padwa and the Marathi New Year. MLC Sandip Joshi, actor Sai Tamhankar and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी गुढी पाड़वा और मराठी नव वर्ष के अवसर पे आयोजित 'भव्य शोभायात्रा एवं रामरक्षा पठण' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। विधायक संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30am | 19-3-2026📍Nagpur | स. ७.३० वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @SandipJoshiNGP #Maharashtra #DevendraFadnavis #GudiPadwa

MR
120
402
543
5.8K
共有