महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आपली पुढची पिढी हीच महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आहे. त्यांना पारंपारिक शिक्षण पद्धतीसोबतच अत्याधुनिक पद्धतीने ई-लर्निंग पद्धतीचा लाभ घेता यावा यासाठी आपलं भाजपा महायुती सरकार विविध उपक्रम राबवत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळत आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या ई-लर्निंग उपक्रमांविषयी जाणून घेऊया.
#MaharashtraDin#ChhatrShakti#BrightFututeInAI
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
महाराष्ट्र दिनानिमित्त कल्याण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून या प्रदर्शनाचे उद् घाटन केले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, प्राचीन वास्तुकला, लोकसंस्कृती तसेच गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडले. हे प्रदर्शन निश्चितच स्तुत्य आणि प्रेरणादायी असून समाजात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करणारे आहे.
यावेळी प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सह पोलीस आयुक्त अनिल वनमाळी, पोलीस उपयुक्त अतुल झेंडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#MaharashtraDay#MaharashtraDin#JaiMaharashtra #गर्जा_महाराष्ट्र
संथाली भाषा की ओल चिकी लिपि के जनक पंडित रघुनाथ मुर्मु की जयंती पर मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित करती हूँ।
उन्होंने अपनी दूरदर्शिता और सृजनशीलता के द्वारा संथाली भाषा को नई पहचान दी। ओल चिकी लिपि के माध्यम से संथाली भाषा में शिक्षा, साहित्य और अभिव्यक्ति को बढ़ावा मिला तथा संथाल समुदाय के समग्र विकास को गति मिली।
आइए, उनके आदर्श से प्रेरणा लेकर हम सब राष्ट्र की सांस्कृतिक विरासत के संरक्षण एवं संवर्धन हेतु निरंतर प्रयत्नशील रहने का संकल्प लें और विकसित तथा समावेशी भारत के निर्माण में सक्रिय योगदान दें।
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे...
महाराष्ट्र में रहने वाले प्रत्येक व्यक्ति को मराठी भाषा सीखनी ही चाहिए…
(मुंबई | 1-5-2026)
#Maharashtra#MaharashtraDay#Marathi
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना के लोकार्पण के बाद मुंबई–पुणे मार्ग पर ट्रैफिक जाम कम हो जाएगा।
(मुंबई | 1-5-2026)
#MaharashtraDay#MahaInfra#MumbaiPuneMissingLink
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
नारी शक्ती हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे! आजच्या आधुनिक युगात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हीच नारी शक्ती अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सशक्त व्हावी यासाठी आपलं भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध आहे. महिलांच्या कौशल्याला AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, हाच आपल्या सरकारचा निर्धार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांच्या आधुनिकीकरणाचा प्रवास जाणून घेऊया!
#MaharashtraDin#NariShakti#WomenEmpowerment#WomenInTech
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणाईने जगभरात नाव गाजवावे, यासाठी आपले भाजपा-महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी उभं आहे. काळाची पावले ओळखून AI आणि AVGC-XR सारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि करिअरच्या नव्या वाटा आपण खुल्या केल्या आहेत. राज्यातील टेकसॅव्ही तरुणाईला 'हाय-टेक' बळ देऊन त्यांना प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त तंत्रज्ञानाच्या साथीने युवाशक्तीच्या स्वप्नांना पंख देण्याचा हा प्रवास जाणून घेऊया !
#MaharashtraDin#YuvaShakti#AVGC#InnovationinAl
अत्त दीपो भव
बौद्ध पौर्णिमा निमित्त मुंबईतील पावन चैत्यभूमी येथे वैशाख दीपोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळची काही क्षणचित्रे!
#VaishakhDeepotsav#BuddhaJayanti#Chaityabhoomi
खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो.
#महाराष्ट्रदिन
इन्फ्रामॅन देवाभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वात साकारलेल्या मुंबई- पुणे मिसिंग लिंक टनेलची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र दिनाच्या गौरवशाली दिवशी मिळालेला हा मान महाराष्ट्रासह देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
#InfraManDevaBhau#MumbaiPuneExpressway#MissingLinkProject#DevendraFadnavis