Bhalchandra Alandkar

3.2K posts

Bhalchandra Alandkar

Bhalchandra Alandkar

@BAlandkar

Education Activist,Teacher,politically active.

@परभणी, भारत from Latur Katılım Kasım 2014
1.2K Takip Edilen482 Takipçiler
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
सिनिअर सिटीझन्स पालकांचे एकाकीपण ७० रिच्या दशकात बहुतांश कुटुंबांनी फॅमिली प्लॅनिंगचा स्वीकार केला. परिणामी सर्रास बहुतांश कुटुंबे ही चौकोनी म्हणजे आई वडील मुलगा मुलगी अशा स्वरूपातली आहेत. पण त्याचे वेगळेच सामाजिक परिणाम आता दिसू लागलेले आहेत. अशा चौकोनी कुटुंबातील मुले एकतर कॉस्मोपॉलिटन किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित होऊन स्थायिक झालेली आहेत. मुली लग्न होऊन किंवा नोकरी निमित्त किंवा दोन्ही मुळे इतर शहरांमध्ये स्थायिक झालेले आहेत. आता मूळ गावांमध्ये साठी पार केलेले आई-वडील असे दोघेच शिल्लक आहेत. मुला-मुलींच्या शहरांमध्ये त्यांचे फारसे मन रमत नाही कारण एक तर त्यांची इकोसिस्टीम, सोशल वॉटरिंग होल्स, मित्रमंडळी, नातेवाईक हे सर्व लहान शहरे अथवा गावांमध्ये आहेत आणि मुले स्थायिक झालेल्या शहरांमध्ये त्यांच्या ओळखी पाळखिचे कोणी नसल्यामुळे ते आणखीनच जास्त एकटे पडतात किंवा निव्वळ घरात कोंडून पडतात म्हणून ते जास्त काळ त्या अनोळख्या ठिकाणी राहू शकत नाहीत. पण यातून एक मोठी समस्या निर्माण होते. या आई-वडिलां जवळ किंवा त्यांच्या सोबत राहायला कोणीही अपत्य नाही. गाव खेड्यात राहणाऱ्या अशा वयोवृद्ध पालकांची अवस्था तरी जरा बरी आहे कारण गाव खेड्यामध्ये एकमेकांशी संपर्क व स्नेहबंध थोडा अधिक घट्ट असतो. तसेच तुलनेत अतिशय जवळचे नातेवाईकच किंवा भाऊबंद आजूबाजूला राहत असतात त्यामुळे अगदी टोकाचा एकाकीपणा नसतो. पण टू थ्री टायर शहरांमध्ये नोकरी करून निवृत्त झालेल्या किंवा तिथे स्थायिक असलेल्या वयोवृद्ध पालकांच्या बाबतीत मात्र हा एकाकीपणा अतिशय जास्त आहे, टोकाचा आहे. मित्रमंडळी किंवा संबंधित जरी त्या गावांमध्ये असले शहरांमध्ये असले तरी घरात व कुटुंबात असलेले सदस्य व त्यांच्याशी इंटरॅक्शन, भावविश्व यांचे वेगळे मूल्य आहे. त्यामुळे बाहेर कितीही परिचित लोक असले तरी घरी आल्यावर फक्त नवरा-बायको दोघेच असणे हे भयानक मानसिक तणाव निर्माण करणारे असते. आणि तसेही दिवसाच्या उपलब्ध वेळापेकी बाहेर व्यतीत होणारा वेळ कमी असतो त्या तुलनेने दिवसाचा बहुतांश भाग हा घरातच जातो. एकाकीकपणाची भावना निराशा, असमाधान निर्माण करते. बहुतांश वेळ घरातच जात असल्यामुळे त्याचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जातो. जुनी माणसे सोशिक व समजदार असल्यामुळे तसे दिसू देत नाहीत किंवा जाणवू देत नाहीत. पण त्यांना त्या गोष्टीचा भयानक त्रास होत असतो. कारण कितीही योग्य असले तरी आपली लाडाकोडाची सख्या रक्ताची माणसे आपल्या सोबत नाहीत ही भावना जाचक असते. एकेकाळी नांदती गोकुळे पाहिलेल्या नजरेला ते अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसातून दहा वेळा केलेले फोन अथवा व्हिडिओ कॉल ती कमतरता भरून काढू शकत नाहीत. या समस्येवर कसे समाधान शोधावे हा खरोखर गहन गंभीर प्रश्न आहे. मला माझ्या घरात सुद्धा अशीच परिस्थिती निदर्शनास आली. या दिवाळीत आमच्या घरी बहीण मेव्हणे भाचे मी माझी सहचरणी दोन्ही मुले यासह आलो. दिवाळीचे चार-पाच दिवस अगदी गजबजलेले, उत्सव, आनंदाचे वातावरण होते. दिवसभर खाणे पिणे खेळ एकत्रित चित्रपट पाहणे हास्यविनोद असा भरगच्च कार्यक्रम होता. पण शुक्रवारपासून हळूहळू प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघून गेला. मी उद्या निघून जाईल. पण मी काल परवापासून आई वडिलांच्या चेहऱ्यावर त्या भावना त्या एकाकीपणाच्या छटा स्पष्ट वाचू शकतो. मी म्हणालो की चला आमच्याबरोबर मुंबईला काही दिवस राहून परत या. तर ते आमच्या नात्यात या महिन्यात एक लग्न आहे ते आटोपून आम्ही नातवाच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील वाढदिवसाला येतो म्हणून आत्ता नको असे म्हणत आहेत. पण हे सुद्धा तात्पुरते समाधान आहे. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ते आल्यानंतर पंधरा-वीस दिवस फार फार तर महिना आमच्याकडे राहतील. पण परत त्यांना तिथेही फारसे करमत नाही. पंधरा दिवसानंतर त्यांना गावाकडे परत येण्याची ओढ लागते. पण इकडे आल्यावर परत तोच एकाकीपणा निर्माण होतो. हळूहळू ही मोठी समस्या निर्माण होणार आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. आपणही वरील प्रमाणे कुटुंब व्यवस्थेचा भाग असाल तर बारकाईने पाहिल्यास आपल्याही कुटुंबात ही समस्या आपल्या लक्षात येईल. डॉ प्रशांत भामरे.
MR
28
32
261
14.1K
Bhalchandra Alandkar retweetledi
धीरज ढवळे
धीरज ढवळे@DhirajDhawaleDD·
सिद्धेश लोकरे — महाराष्ट्रातील 30 जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करण्याच्या मिशनवर! 3 कोटींपैकी 80 लाख बाकी आहेत. ही फक्त शाळा नाही, भविष्य घडवण्याची लढाई आहे! ❤️📚 #SiddheshLokare #Maharashtra #EducationForAll @RajThackeray @mnsadhikrut
MR
28
317
1.7K
32K
Bhalchandra Alandkar retweetledi
Swati Chaturvedi
Swati Chaturvedi@bainjal·
Gyanesh (all gas) Kumar must resign & be prosecuted for stealing the vote. It’s a betrayal of each & every Indian
English
161
715
3.1K
51.9K
Bhalchandra Alandkar retweetledi
Rohini Singh
Rohini Singh@rohini_sgh·
Ok. Gyanesh Kumar needs to resign. Immediately.
English
823
2.2K
12.2K
294.1K
Bhalchandra Alandkar retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
राहुल गांधी यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मी म्हटलं होतं ही प्राथमिक माहिती आहे, येत्या काळात आणखी माहिती समोर येईल. आजची पत्रकार परिषद हा investigation चा पुढचा टप्पा आहे. आज कार्यपद्धती नेमकी काय हे समोर आलं आहे. पुढच्या टप्प्यात हे करणारी लोकं कोण यापर्यंत पोहोचणारी माहिती येईल. दरम्यानच्या काळात दगाफटका होण्याची गंभीर शक्यता मला दिसतेय. देशातील एजन्सींनी या प्रोजेक्ट मधल्या सर्वांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे.
MR
24
150
749
18.5K
Bhalchandra Alandkar retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
AI gemini फोटो टाकून डोकं उठवणाऱ्यांसाठी- सतत gemini AI generated फोटो तुम्ही केवळ मज्जा म्हणून जरी टाकत असाल तरी हे तुमच्या काही अपूर्ण इच्छा किंवा स्वप्न दर्शवतं. तुम्हाला कसं एक्सप्रेस व्हायचं याबद्दलच सेल्फ एक्सप्रेशन हे फोटो दर्शवतात. या रुपात तुम्ही कॉन्फिडेंट आहात हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे स्टेमेन्ट त्यात असत. त्यात तुमच्या fantasy चे रिफ्लेक्शन असतात. स्वतःला अधिक attractive portray करण्याचा हा प्रयत्न आहे. हे बघून तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटू शकतं. पण दुसऱ्यांच्या दृष्टीने आपल्या सौंदर्याबाबत आणि शरीराबद्दल वेगळा perspective देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा सतत अश्या प्रतिमांमध्ये गुरफटल्याने तुमच्या मूळ रुपाबद्दल तुम्हाला न्यूनगंड वाटू शकतो. स्वतःबद्दल काही कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता तुमच्या अतृप्त इच्छा काय आहेत याचा अंदाज यावरून AI बांधत. त्याचा एक वेगळा डेटा बेस तयार सुद्धा होत असेल. स्वतःला ब्युटीफाय जेव्हा करता तेव्हा सौन्दर्यच्या मापदांडनुसार तुम्ही सुंदर नाही किंवा तुम्हाला अपग्रेड होण्यासंदर्भात अपूर्ण इच्छा असते हे प्रतिबिंबित होतं. असे फोटो सतत टाकून एक सोशल व्हॅलीडेशन मिळवण्याचा हा प्रयत्न असतो. तसच सगळे करतायत मग फोमोतून आपण सुद्धा करतो. त्यावरच्या प्रतिक्रिया लाईक आणखी डोपामाईन रिलीज करत.. मग आणखी छान वाटू लागतं. जगात सौंदर्याची अशी एक व्याख्या किंवा मापदंड नाही. अप्राप्त सौंदर्य अश्या माध्यमातून पोर्ट्रे करून मिळवलं जाऊ शकत नाही. त्याची काही गरजही नाही. पण काही काळाने या गोष्टी स्वतःबद्दल नकारात्मकता देतील. स्वतःच्या AI version च्या तुलनेत तुमच्या मूळ रुपातले loopholes जाणवायला लागतील..आपण AI photo इतके भारी नाही त्या तुलनेत मी सावळा आहे, पतला आहे, जाड आहे, शरीराची, चेहऱ्याची सेमेट्री तशी नाही या भावना स्वतःबद्दल तयार होऊ शकतात. स्वतःला स्वतःच आधी आहे तस स्वीकारा मग जगाने तुम्हाला आहे तसं स्वीकारावं ही अपेक्षा ठेवा... स्वतःच राहणीमान, शरीर, आरोग्य, हायजीन, दिसणं यावर काम करा. आपोआप तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतील. एका बथ्थड ट्रेंड साठी स्वतःच शरीर चेहरा AI ला वापरू देऊ नका.. आपल्याला दिलेला मेंदू वापरा.. आजचं फुकट ज्ञान इथेच संपलं. धन्यवाद - सौरभ कोरटकर #geminimanchallenge #geminiseason #geminitrend #GeminiGoogle #Gemini #GeminiAI #geminitrending
Saurabh Koratkar tweet media
MR
5
34
236
22.4K
Bhalchandra Alandkar retweetledi
Shyam Meera Singh
Shyam Meera Singh@ShyamMeeraSingh·
जिस मेटाडेटा टाइमज़ोन के आधार पर भाजपाई @RahulGandhi को म्यांमार से जोड़ रहे थे। वही मेटाडेटा भाजपा और PM की ऑफिसियल वेबसाइट्स के टाइमज़ोन- बांग्लादेश और पाकिस्तान दिखा रहा है। इसके बाद भी ये अधपढ़े बेशर्मी से क्लेरिफिकेशन दे रहे हैं। आज इनकी नंगई और मूर्खता सामने आ चुकी है। 🤣
हिन्दी
315
2.9K
10.4K
235.8K
Bhalchandra Alandkar retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
प्रिय रोहित जी, ..महाराष्ट्र केडर मिळालेल्या IPS अंजना कृष्णा यांना सापत्न वागणूक मिळणार नाही. त्यांना मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची हमी हवी. अजित पवारांना प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच क्लिन चिट देत आले आहेत; आतादेखील भाषेचा बेनिफिट ॲाफ डाऊट घेऊन चुकांवर पांघरून घातलं जाईल. वास्तविक पाहता, मुख्यमंत्री असोत की वैधानिक पद नसलेले उपमुख्यमंत्री किंवा मंत्री-राज्यमंत्री असोत; कुणालाही आयएएस/आयपीएस तसंच राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना फोनवरून आदेश देता येत नाहीत, फोनवरून दरडावणं-धमकावणं तर नाहीच. त्यामुळे समोरच्या अधिकाऱ्यांच्या सेवा नियमावलीचाही विसर पडता कामा नये. कुर्डू प्रकरणाच्या दोन्ही एफआयआर आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन बघितलं, तर IPS अंजना कृष्णा यांना स्वतःच्या बचावात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो त्या राखून ठेवू शकतात किंवा वापरू शकतात, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल. यापूर्वी राज्यात राजकीय हस्तक्षेप आणि द्वेषातून अनेक चांगल्या अधिकाऱ्यांवर बदल्या, बढत्या, नियुक्त्यांच्या वादात अन्याय झालाय. खरंतर यादी मोठी आहे, पण सोलापूरचा विषय आहे, तेव्हा उदाहरण म्हणून सोलापूरच घेऊया… सोलापूरच्या जिल्हाधिकारी असताना रोहयो घोटाळा काढला म्हणून IAS मनिषा वर्मा (माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा रोष), सोलापूरचे पहिले पोलीस आयुक्त हरिश बैजल(माजी उपमुख्यमंत्री व सध्या मंत्री यांचा रोष म्हणून ११-१२ वर्षे IPS conferred व्हायला लागली) आणि आता सोलापूरमध्येच प्रशिक्षणार्थी IPS असलेल्या अंजना कृष्णा यांनाच चुकीचं ठरवण्याचा आटापीटा. असं सर्व बघितल्यामुळे रिप्लाय देण्याचा खटाटोप केला, बाकी काही नाही. धन्यवाद! 🙏 ता.क. : तुम्ही काकांचा बचाव जरूर करा. पण कृपया काकांना त्यांच्या काकांचं प्रशासकीय काळातलं वागणं-बोलणं-संवाद याचा वस्तुपाठ गिरवायला सांगा. नाही तर किमान एकदा राज्यशकट हाकताना सत्ताधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधल्या व्यवहार-आदेश-निर्देशाबाबतची सर्व्हिस रूल्स ॲंड रेग्युलेशनची पुस्तिका वाचायला सांगा.
Rohit Pawar@RRPSpeaks

कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की ! मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील! राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात "चहापेक्षा किटली गरम असणारे" एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल. #MediaTrial | #AjitdadaPawar |

MR
24
98
768
82.3K
Bhalchandra Alandkar retweetledi
Yogendra Yadav
Yogendra Yadav@_YogendraYadav·
आख़िरकार दो महीने की कानूनी लड़ाई के बाद सुप्रीम कोर्ट ने वोटबंदी की साज़िश (SIR) पर विराम लगाया। आज के आदेश में स्पष्ट कहा गया—SIR में आधार को अब 12वाँ वैध दस्तावेज़ मानना होगा। इस एक फ़ैसले ने बिहार ही नहीं, पूरे देश में करोड़ों लोगों का मताधिकार बचाया है। #RightToVote #SupremeCourt
हिन्दी
703
6.6K
24.7K
435.8K
Bhalchandra Alandkar retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
घरावर सोलर..माझा अनुभव..👇 #PMSuryaGhar योजना १) घरचे एकूण बिल वर्षाला ३०-४० हजार येत असेल तर.. घरावर ३kw चा सोलर प्लांट ज्याचा एकूण खर्च ~ २ लाख येतो बसवणे फायद्याचे पडू शकते..! २) ह्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ७८ हजार सरकारकडून सबसिडी कोणालाही चिरीमिरी न देता थेट खात्यात मिळते..! फक्त ती यायला वेळ लागू शकतो हे खरे..मला almost एक वर्ष लागलं सबसिडी यायला..😬 ३) म्हणजे २ लाख आपण गुंतवणूक करणार..आपले बिल जवळपास शून्य येणार..आणि जर सबसिडी मिळाली तर ३ वर्षात आपण ते पैसे वसूल करणार..म्हणजे ROI पाहिला तर ~ २५% येतो..🤯 आणि समजा सबसिडी आली नाहीच तरी ५ एक वर्षात पैसे वसूल झाले तरी ROI ~ १५% येतो. याचा अर्थ अगदी ६- ७% देणारी FD तोडून जरी आपण सोलर बसवले तरी परवडू शकते..🤑 ४) सबसिडी ही फक्त ongrid सोलार साठी मिळते..म्हणजे आपल्या छतावरचा प्रकल्प म्हणजे सरकार व आपली भागीदारीतून झालेला प्रकल्प PPP आहे..आणि ongrid प्रकार असल्याने..घरी सोलर आले तरी सगळ्यांची जेव्हा वीज जाणार तेव्हा आपली पण जाणार..थोडक्यात ह्या प्रकल्पाचा फायदा फक्त आणि फक्त वीजबिल कमी करणे हा आहे. ५) आता वीजबिल कमी करायची तर वीज ही चांगली तयार व्हायला पाहिजे..त्यासाठी आपण छतावर जिथे सोलर लावणार ती बाजू मुख्यत्वे दक्षिण दिशेला असावी आणि त्यावर आजूबाजूची सावली येणार नाही असे असावे..नाहीतर सोलर लावूनही पुरेसे वीजबिल कमी होणार नाही. ६) सोलर लावताना शक्यतो आपल्या आजूबाजूला जी कंपनी सोलर लावतीये त्या कंपनीला बोलवावे म्हणजे सोलारचे नवीन मीटर बसवणे इ साठी आपल्याला वीज कार्यालयाचे तोंड बघावे लागणार नाही. ७) आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे..३kw पेक्षा कमी ताकदीचा पण सोलर बसवता येते..पण..त्याची किंमत तुलनेने जास्त कमी नसल्याने.. परताव्याचे गणित कसे बसते हे पाहूनच आणि सबसिडी मिळाली नाही तरी ५ वर्षात रक्कम फिटून जावं ह्या हिशोबाने विचार करून निर्णय घ्यावा. ८) शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही कंपनी फायनल करताना..तिच्याकडून quotation, कोणत्या कंपनीचे मटेरियल वापरणार ते , कोणती कामे ते लोक करणार आणि कोणती कामे आपण करणार ह्या किमान ४ गोष्टी लिहून घ्याव्या. ९) मटेरियल लावतानाही सांगतले ते मटेरियल लावतोय का नाही ते बघणे गरजेचे आहे..कारण उत्तम पॅनल , उत्तम केबल आणि उत्तम इन्व्हर्टर असेल तरच वीज चांगली तयार होईल आणि आपले परतावा मिळायचे गणित कामी येईल..✌️
Ajay tweet media
MR
84
229
1.2K
74.5K
Bhalchandra Alandkar retweetledi
Tejas Joshi
Tejas Joshi@tej_as_f·
"You are a Brahmin. How come you are talking in favour of the Marathas?" Well it's not entirely about the Marathas. I come from a tribal district of Nandurbar. Tomorrow, if my Adivasi brethren come to Mumbai to voice their issues, I will stand with them. So will I stand with my Brahmin brethren if they ever take to the streets for their demands. Democracy works in tandem. People raise their voice. Govts are forced to identify the issue and find solutions. And things go back to normal. Hope people understand that castes, religions, political ideologies are all just labels. Citizens are all in it together. The politicians don't care. So doesn't the system which feeds on their corrupt money.
English
34
91
705
24.2K
Bhalchandra Alandkar retweetledi
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
फडणवीस सरकार की ओर से मराठा समाज के मुद्दों को स्वीकार करने के बाद से जो एंकर अबतक ट्रैफिक की बात कर रहे थे, वो अब अचानक से बता रहे हैं कैसे अगर आंदोलन किया जाए तो मांगें मानी जाती हैं.. यही वो लोग हैं जो एक दिन अमेरिका को भारत का दोस्त बताते हैं और दूसरे दिन चीन को! हिपोक्रेसी की भी सीमा होती है! #MarathaInMumbai
हिन्दी
27
389
1.8K
29.3K
Bhalchandra Alandkar retweetledi
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
जबतक किसान को अपने खेत में परेशानी हो रही है, वो आत्महत्या कर रहा है, सबकुछ ठीक है.. बस वो मुंबई ना आ जाए अपने अधिकारों के लिए.. सिग्नल में आधा घंटा रुकने पर मुंबई के लोग नाराज़ हो जाते हैं.. किसानों की परेशानी, बढ़ती आत्महत्या, गिरते इमारत, लिंच होते मुसलमानों से लेना देना नहीं.. कॉरपोरेट मजदूर को परेशानी नहीं होनी चाहिए, बाकी तुम मरो, लेकिन अपने खेत में, मुंबई में नहीं!
Mid Day@mid_day

A heartbreaking video from Latur shows 70-year-old farmer Motiram Maruti Ghuge in tears as heavy rains submerged his entire crop. Crying out, “Ab main kya karoon? Sab kuch khatam ho gaya!”, he had to be stopped by villagers from risking his life to save his field. VC: X #Latur #FarmerCrisis #HeavyRains #Maharashtra

हिन्दी
38
575
1.6K
38.2K
Bhalchandra Alandkar retweetledi
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
इथेच बरेच सुशिक्षित पांढरपेशी उच्चभ्रू शहरी लोक आमचे शेतकरी मराठा आंदोलक रोडवर अंघोळ करताय, स्वयंपाक करताय, ATM मध्ये झोपताय वैगरे, स्टेशनवर नाचताय, म्हणून त्यांचा सिव्हीक सेन्स काढताय. तुमचा काय सिव्हिक सेन्स आहे ? तुम्ही इतके शिकुन सवरून, जेंटलमेन असून रस्त्यावर कचरा टाकतात, इतकं शिकून ओला कचरा सुका कचरा फरक कळत नाही, वाहतुकीचे नियम सरार्स तोडतात. बेसुमार पाणी वाया घालवतात, मोलकरीणीला दोन दिवसाच शिळ जेवण देतात. गेटवरच्या वाचमनला बापाचा नोकर समजतात. घरी पाहुणे आले म्हणजे याना संकट आल्यासारखे वाटत. भाजीवाल्याकडून 20 रुपयांची मेथी 10 रुपयाला मागताना हूज्जत घालतात, अन सिनेमा टॉकीज मधे कॉफीचे 250 - 300 रूपये सहज देतात, वेगवेगळ्या क्लब पब मध्ये दारू पिऊन लोळतात, पाश्चात्य चंगळवाद पोसता, ड्रग्ज घेऊन स्वत ला अन तरूणाईला नासवतात. मातृभाषेतून बोलणं हीन अन इंग्रजीतून बोलणं कुल समजता. सोसायटीत फळांची झाड लावू शकत नाही, का तर फळ कोण खाईल यावरून भांडण होतील. सोसायटीत इतक्या क्षुल्लक कारणावरून भांडण करतात. शहरी सर मॅडम लोकानो हे तुमचे सिव्हीक सेन्स आहेत. अस चुका काढायला गेले तर खूप काही आहे, तुम्ही गावात गेला तर शेतकरी कधी तोलून मापून बोलत नाही. कप बशी भरून चहा देतो. पाहुणे आले की त्याला आनंद होतो.. शेतकरी शेतातल्या पीक, ऊस , काकडी टमाटे गाजर, आंबे, घेऊन जा म्हणतो. अनोळखी माणसालाही आपुलकीने विचारतात. गावात अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. उरलसुरल तर खत करतात. मातृभाषा जपली ती याच खेडवळ माणसानी. निसर्ग जपला तो याच खेडवळ लोकांनी. शहरी वागणे सिव्हीलाईझ आणि खेड्यातल वागणं रानटी असभ्य कसे? कोणी काढले हे नियम, कोणी ठरवले हे स्टँडर्ड? हेच रानटी लोक मरमर दिवसरात्र राबतात तुम्हाला अन्नधान्य देतात. तेही कवडीमोल भावाने. आपल्या अन्नदात्या बद्दल सुप्त उघड घृणा बाळगत असाल तर तुमचा सिव्हीक सेन्स पण तपासला पाहिजे.. शेवटी शहरी असो की ग्रामीण, सर्व माणसे आहेत. आपापली संस्कृती प्रमाणे , ऐपतीप्रमाणे जगतात. इतक्या तितक्या कारणावरून कुणाचा सिव्हीक सेन्स काढणे इतकं समजलं तरी ठीक आहे. बाकी यात कुणा शहरीला दुखावण्याचा हेतू नाही. 🙏 #शेतकरी #मराठा_आरक्षण #मुंबई
MR
18
148
602
16.3K
Bhalchandra Alandkar retweetledi
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
मॅडम मी तुमची माहिती घेतली तुमच्या सोबतच्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की तुम्हाला मराठा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा द्वेष आहे आपल्या सोबत शिकलेल्या लोकांनी सांगितलं आणि व्यक्तिगत मी तुमच्या सर्व ट्विट पहिल्याने माझा त्यावर विश्वास बसला...मी तुम्हाला कॉल करून विचारणा केली पण तुम्ही मराठा द्वेष मध्ये पूर्ण आंधळे झाल्याने..मला आमच्या लोकांना तुम्ही कशा वागता हे दाखवून देण्यासाठी तुमच्या बद्दल ट्विट करावे लागले.. आता तुम्ही कितीही मराठा द्वेष नाही मनाला तरी उपयोग नाही.. तुम्ही आमच्या जातीचा द्वेष करा आम्हाला फरक पडणार नाही..
Richa Pinto@richapintoi

माझे वृत्तांकन कधीही कोणत्याही समाजाविरुद्ध नव्हते, त्यामुळे मी इतर कोणत्याही समाजाविरुद्ध बातमी केली असा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला शुभेच्छा. सद्बुद्धीने वागावे हीच अपेक्षा.

MR
41
209
1.2K
36.9K
Bhalchandra Alandkar retweetledi
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
मुंबई को महाराष्ट्र में जोड़ने के लिए 106 लोगों ने बलिदान दिया.. इसके बाद मुंबई में मराठा किसान से लेकर गरीब हर किसी को अधिकार है, यहां आएं, मरीन ड्राइव पर जाएं, किसी एसी स्टोर में जाएं, आंदोलन करें, अगर परेशानी होती है, तो जिम्मेदार यह आंदोलन करने वाले नहीं, सरकार है.. इसलिए सवाल पूछना है तो सरकार से पूछिए.. बाकी मराठी माणुस मुंबई में नहीं आएगा तो कौन आएगा? #MarathaInMumbai
हिन्दी
55
592
2.7K
56.9K
Bhalchandra Alandkar
Bhalchandra Alandkar@BAlandkar·
@MumbaiPolice मुंबई ही मराठ्यांची, कुनब्यांची,दिन - दलितांची आहे.होय मुंबई आमच्या बापाची आहे.तुमचे x हॅण्डल सांभाळणारे मात्र राज्याच्या बाहेरचे असल्याने त्यांना ही माहिती दिसत नाही.
MR
0
0
1
141
मुंबई पोलीस Mumbai Police
मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सध्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक आणि वाहने बाहेरून आल्याने दक्षिण मुंबईकडे होणारी वाहतूक विस्कळीत झाली. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला.
MR
773
177
2.2K
270.1K
Bhalchandra Alandkar retweetledi
Vaibhav Chhaya
Vaibhav Chhaya@vaibhav_chhaya·
मराठे मुंबईत येतील नाहीतर मुंबईत येऊन आंदोलन करतील. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. महारांचा आहे. अठरापगड जातींचा आहे. या महाराष्ट्राचा सातबारा या मराठी लोकांनी आपल्या रक्ताच्या बलिदानानं कमावलेलाय. परप्रांतीयांची थोडीच आहे मुंबई. आपल्या हक्काच्या जागेवर येण्यास मराठ्यांना विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्रोही आहेत. आंदोलन यशस्वी झालेच पाहीजे.
MR
29
153
1K
24.7K
Ajay
Ajay@amhiraigadkar·
#हेल्थ_इन्शुरन्स #आरोग्य_विमा #माझा_अनुभव #Health_Insurance अशात दोन उदाहरणे पहिली - १) ५ लाखांच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी ७० हजार प्रीमियम वय वर्ष ६८..😱🤯 २) ३ लाखांच्या हेल्थ इन्शुरन्स साठी एका ६० च्या आतल्या जोडप्याला ४६ हजार प्रीमियम..😱🤯 दोन्ही जुने बँक कर्मचारी म्हणून त्यांनी हेल्थ इन्शुरन्स घेतलेला..नाहीतर ह्या वयाच्या लोकांत हेल्थ इन्शुरन्स आधीपासून असण्याचे प्रमाण फार कमी आहे. ह्या दोन्ही मध्ये प्रॉब्लेम तोच आहे..प्रीमियम भरमसाठ असूनही विमा कव्हर फारच कमी आहे..😑 म्हणून आपण जेव्हा २५- ३० वर्षांनी रिटायर होऊ तेव्हा आपली परिस्थिती अशी न व्हावी म्हणून अशातच माझी ५ लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ~ २० हजार प्रीमियम (तिघांसाठी) वरून ~३० हजार प्रीमियम (तिघांसाठी) किमान १ कोटींचे हेल्थ इन्शुरन्सवर शिफ्ट झालो. हे मी का केले ? आरोग्य उपचारांत महागाई ही सर्वात वेगाने वाढते आहे. म्हणून पुढच्या काही वर्षांतच ५ लाखाची पॉलिसी नगण्य वाटू लागेल..आणि म्हणून मग तेव्हा गरज पडल्यास आपली गुंतवणूक विकूनच पैसे भरायची वेळ येऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य क्षेत्रातील महागाई जितक्या वेगाने वाढते..तितक्याच वेगाने हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम ही वाढतात म्हणून पुढील काही वर्षात लाख दीड लाखाचे प्रीमियम व ५ लाखाची पॉलिसी अशी वेळ नाही आली म्हणजे नवल अशी परिस्थिती आहे. आता , ह्यावर उपाय म्हणून २ गोष्टी करता येतात १) असा विमा शोधायचा ,ज्यात Unlimited No claim bonus हा रायडर आहे. म्हणजे ज्या ज्या वर्षी आपण आरोग्य विमा वापरत नाही म्हणजे कोणता क्लेम घेत नाही..त्या त्या वर्षी एकूण विमा छत्र वाढत जाते. (उदा. मी सध्या घेतली त्या पॉलिसी मध्ये दरवर्षी २०% ने एकूण विमाछत्र वाढत जाते..म्हणजे १० लाखाची पॉलिसी असेल तर ज्या वर्षी मी क्लेम घेणार नाही..त्या त्या वर्षी विमाछत्र २ लाखाने वाढेल.म्हणजे पुढच्या २५ वर्षात १० वर्ष जरी मी क्लेम दिला नाही तरी विमाछत्र १० लाखाचा ३० पर्यंत गेलेले असेल.) २) सुपर टॉप अप पॉलिसी - ही पॉलिसी म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचाच एक प्रकार आहे. ह्या पॉलिसी मध्ये आपण वर्षात सुरवातीची काही रक्कम भरणार असे सांगतो व त्यापेक्षा जास्त खर्च आला तर मात्र तो खर्च विमा कंपनीने भरायचा. (उदा. मी असे म्हणणार की कोणत्याही वर्षी १० लाखांपर्यंतचा खर्च करायला मी तयार आहे..पण जर काही मोठा झाला..आणि खर्च समजा ५० लाख आला तर मात्र वरचे ४० लाख विमा कंपनी भरणार.) आता इतका खर्च काही येत नसतो..पण.. पुढचे ३० वर्ष इतका विचार केला तर इतका खर्च येत नसतो असे म्हणता येत नाही..😑 चांगली गोष्ट इतकीच की , अशा पॉलिसीचे प्रीमियम फार कमी असते. व अशी पॉलिसी आता नेहमीच्या हेल्थ इन्शुरन्सला add on म्हणून घेता येते. (उदा. मी अशी सुपर टॉप अप पॉलिसी घेतली की ज्यात मी आधीचे १० लाख भरणार आणि त्यावरचा १ कोटीपर्यंतचा खर्च विमा कंपनी भरणार असे आहे.. व ह्या पॉलिसीचे प्रीमियम आहे..तिघांसाठी ४ हजार..! ह्यात , हे आधीचे १० लाख पण मी भरणार म्हणजे माझी रेग्युलर पॉलिसी भरणार..म्हणून सुपर टॉप अपला add on म्हणू शकतो. पण..फक्त सुपर टॉप अप पॉलिसी पण घेऊ शकतो.ज्याने साहजिकच एकूण प्रीमियम कमी येते.) आणि हा इतका विचार आणि इतके प्रीमियम आणि इतक्या पॉलिसी का घ्यायच्या..त्यापेक्षा फिटनेस चांगला ठेवायचा ना..असं जर कोणी विचारत असेल तर माझं ठरलेलं उत्तर असतं - " आपल्या जीवनात फक्त २ च गोष्टी अशा आहेत की ज्यावर आपला काहीच कंट्रोल नाही..आणि म्हणून मग जर अवेळी आल्या तर सगळं विस्कळीत होऊ नये म्हणून प्रीमियम भरायचे. आणि त्या गोष्टी आहेत - १) मरण - त्यासाठी टर्म इन्शुरन्स घ्यायचा. २) आजारपण - त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा. " बाकी सर्व गोष्टींसाठी , कॉलेजमध्ये म्हणायचो तसं आपला " जिगरा " कधीही आणि काहीही झालं तरी पुरून उरू शकतोच..💪❤️‍🔥 बाकी , आरोग्य विमा बद्दल बहुतेक सर्व कव्हर करणारी आरोग्य विमा थ्रेड मालिका लिहिली होती तिचा व टर्म इन्शुरन्स बद्दलचा थ्रेड ह्यांची लिंक पुढील ट्विटमध्ये जोडतोय..सुटी आहे ,शक्य असल्यास वाचा..👇
Ajay tweet media
MR
36
76
327
27.6K