Bala Joshi retweetledi
Bala Joshi
2.3K posts

Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi

कर्जतमध्ये 'साई ट्रेडिंग कंपनी'चे भाऊसाहेब विठ्ठल नलवडे आणि 'अद्वैत फार्मा'चे स्वप्निल पिसे यांनी आमदार रोहितदादा पवार यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#MLARohitPawar | #RohitdadaPawar |




MR
Bala Joshi retweetledi

खाद्य, खरेदी, हस्तकला याचं प्रदर्शन व विक्री असलेली #भिमथडी_जत्रा पुण्यात सुरू झाली असून आज इथं भेट दिली.
#भिमथडी_जत्रेचं यंदा १८ वं वर्ष असून महिला सबलीकरणाचं हे देशातील अनोखं असं एकमेव मॉडेल आहे.
येत्या २५ तारखेपर्यंत पुण्यात सिंचननगर येथील कृषि महाविद्यालयाच्या मैदानात ही #भिमथडी_जत्रा सुरू आहे. जत्रेला भेट देण्यासाठी उद्या आदरणीय पवार साहेब हेही येत आहेत, तर तुम्हीही या जत्रेला भेट देण्याची संधी दवडू नका.
#भिमथडीजत्रा | #Pune | #AapliBhimthadi | #BhimthadiJatra2024 | #PuneEvent |



MR
Bala Joshi retweetledi

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट आज सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थितांशी संवादही साधला.
या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा प्रकारचं आहे.
ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांचा पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम ज्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल.
लोकसभेचं अधिवेशन काल संपलं. गेले दोन-चार दिवस आम्ही बघतो आहोत, तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे, निलेश लंके असतील आणि जे कोणी खासदार तिथे महाराष्ट्राचे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न मांडून इथे न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचे भाषण ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहाचा सदस्य नाहीये पण ऐकत होतो. सबंध सभागृह, ते जे काही सांगत होते ते ऐकल्यानंतर स्थगित झालं. या देशातील राज्यात काय चाललंय? अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले.
हे दुखणं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सतत सांगितली की सूत्रधार याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि यांचे सुसंवाद कोणाकोणाशी झाले. फक्त टेलिफोन वर असेल किंवा इतर कशावर. या सगळ्यांची जी माहिती आहे ही काढली पाहिजे. त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तूस्थिती सगळ्यांच्या समोर येईल हा आग्रह बजरंग सोनवणे आणि बाकीच्या सगळ्या सहकार्य देशाच्या पार्लमेंटमध्ये केला. आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये बीडचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही की ती कोणत्या समाजाचे आहेत. अन्याय होतोय, अन्याय झालाय अन त्या अन्याय झाल्याला जे कोणी जबाबदार असेल त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला.
मी स्वतः थोडीबहुत माहिती घेतली. त्याच्यामध्ये सोळंके आणि इतर काही लोक बोलले. एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे.. कुटुंबाला त्याची मदत होईल. पण तुम्ही कितीही मदत दिली तरी गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचा हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्याच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत त्याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याचा मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही.
मला आनंद आहे आणि एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळींनी लेखी निवेदन वेतन दिलं. जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत. तुम्हाला त्यांचीही साथ या ठिकाणी होती. आणि म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे, आणि कुटुंबीयांच्या मागे आहेत.


MR
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi

आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सुमारे दोन दशकांपासून महिला सक्षमीकरणाचं काम माझ्या आईकडून (सौ. @sunanda_pawar ) होतं. त्याचाच परिपाक म्हणजे #भिमथडी_जत्रा.. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात या भिमथडी जत्रेचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघासह इतरही ठिकाणच्या महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. इथं राज्यातील विविध जिल्ह्यांतील खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. वेगवेगळ्या भागातल्या आणि वेगवेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांची टेस्ट घेण्यासाठी दरवर्षीच पुणेकरांची झुंबड उडत असते. विशेष म्हणजे इथं मिळणाऱ्या सर्वच उत्पादनांचा दर्जामध्ये कोणतीही तडजोड केलेली नसते. त्यामुळं चोखंदळ पुणेकर, खवय्ये पुणेकर आवर्जून या भिमथडी जत्रेला भेट देत असतात. यातून महिला बचत गटांच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि महिलांच्या सक्षमीकरणालाही एकप्रकारे हातभार लागतो.
आज आदरणीय पवार साहेबांनी वेळ काढून भिमथडी जत्रेला भेट दिली आणि विविध स्टॉलची पाहणी करुन महिला भगिनींशी संवाद साधला. बुधवार दि. २५ डिसेंबरपर्यंत पुण्यात सिंचननगर येथील कृषि महाविद्यालयाच्या मैदानावर ही भिमथडी जत्रा तुमची वाट पाहतेय… तिथं अवश्य भेट द्या आणि खाद्य-खरेदीसह राज्याच्या विविध भागातील ग्रामीण संस्कृती अनुभवण्याचाही आनंद घ्या..
#भिमथडीजत्रा | #Pune | #AapliBhimthadi | #BhimthadiJatra2024 | #PuneEvent |
#साहेब | #भिमथडी_जत्रा |




MR
Bala Joshi retweetledi

पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना 'युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम'तर्फे (यूएनईपी) देण्यात येणारा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! एका मराठी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर होणं, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.

MR
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi

संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान रेल्वे मंत्रालयाविषयी प्रश्न उपस्थित केला. रेल्वेमध्ये सध्या स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन केले. पण त्याचबरोबर माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दाैंड, निरा, जेजुरी स्थानकांवर रेल्वे थांबे कमी झाले असल्याचे सांगितले. दाैंड स्थानकावर अगोदर ८० रेल्वे थांबत होत्या, पण आता फक्त ४० रेल्वे थांबत आहेत. कार्यक्षमता वाढवण्यासाठी थांबे कमी केल्याचे रेल्वे मंत्रालय सांगत आहे. पण त्यामुळे या भागातील अर्थकारण अडचणीत आले आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी थांबे कमी करण्यापेक्षा इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
MR
Bala Joshi retweetledi

महाराष्ट्रातल्या राजकारणातला सह्याद्री आ. खा. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#pawarsaheb
#sharadpawarsaheb
MR
Bala Joshi retweetledi

महाराष्ट्राचा अभेद्य #सह्याद्री आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!
#आधारवड
#साहेब
#sharadpawar
MR
Bala Joshi retweetledi

Bala Joshi retweetledi

आमदार रोहितदादा पवार यांच्या निवडणुकीतील यशासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मोठी मेहनत घेतली तर अनेकांनी या मेहनतीसोबत वेगवेगळ्या प्रकारचं व्रतही धरलं होतं. यापैकी एक आहेत तिखी (ता.कर्जत) गावचे निलेश दळवी. त्यांनी जोपर्यंत आमदार रोहितदादा पवार निवडून येत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता.. आज आमदार रोहितदादांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व त्यांचं व्रत सोडलं तसेच मिरजगाव येथील भगवानबाबा घोडके यांनी आमदार रोहितदादा पवार यांच्या विजयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत दाढी न करण्याचा निश्चय केला होता. आमदार रोहितदादा यांनी त्यांचीही भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि त्यांचा संकल्प पूर्ण केला.




MR
Bala Joshi retweetledi

प्रचार सांगता सभा...
प्रमुख मार्गदर्शक - मा. शरदचंद्रजी पवार साहेब
सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ | दुपारी २.०० वाजता
स्थळ : लेंडी पट्टी, जुना मोरगाव रोड, बारामती.
#baramati #aaplibaramati

MR
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi
Bala Joshi retweetledi

📍 केज विधानसभा | बीड |
केज विधानसभा मतदारसंघातील #मविआचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केलं. कोणत्याही आमिषाला, खोट्या आश्वासनांना न भुलता पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचं आवाहन केलं. यावेळी खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह मविआचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
#रामकृष्णहरि
#वाजवातुतारी
#MaharashtraAssemblyElection | #MVAforMaharashtra | #Election2024 |




MR















