Balwant Baswant Wankhade

558 posts

Balwant Baswant Wankhade

Balwant Baswant Wankhade

@BalwantINC

Congress Worker. Member Of Parliament Amravati Loksabha

Daryapur, Amravati Katılım Mart 2024
149 Takip Edilen3.3K Takipçiler
Balwant Baswant Wankhade
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री. मल्लिकार्जुन खरगे साहेब, देशाचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आदरणीय श्री. राहूलजी गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव माननीय श्री. के.सी. वेणुगोपालजी यांच्या मान्यतेने महाराष्ट्रातील आमच्या अनेक सहकाऱ्यांची काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वप्रथम या सर्व नवनियुक्त शहराध्यक्षांचे व जिल्हाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन #congress #maharashtracongress
Balwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet media
MR
0
4
46
2.8K
Balwant Baswant Wankhade retweetledi
Congress
Congress@INCIndia·
'भारत रत्न' राजीव गांधी जी को नमन 🙏
हिन्दी
137
1.3K
4.3K
39.9K
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
समता व शांततेचा मार्ग प्रस्थापित करणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. समता, करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवत मानवतेला नवी दिशा देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांतून जगाला शांती, सहिष्णुता आणि संयमाचा संदेश मिळाला. त्यांच्या शिकवणी आजही समाजाला संतुलन आणि सहअस्तित्वाचा मार्ग दाखवते.
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
1
0
3
65
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
छत्रपतींच्या पराक्रमातून प्रेरणा, विचारवंतांच्या विचारांतून दिशा, समतेच्या तत्त्वांतून संस्कार आणि न्यायाच्या लढ्यातून घडलेला आपला महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची परंपरा, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची ज्योत, राजर्षी शाहू महाराज यांची समतेची वाटचाल, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्यायनीतीचा वारसा यांनी घडवलेली ही आपली प्रगत महाराष्ट्रभूमी श्रमिकांच्या घामातून, शेतकऱ्यांच्या कष्टातून उभी राहिलेली ही भूमी केवळ राज्य नाही, तर स्वाभिमान, संघर्ष आणि प्रगतीची ओळख आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या मातीतला प्रत्येक कण आजही प्रेरणा देतो, शौर्य, संस्कार आणि सहकार यांचा संगम असलेल्या महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
1
0
1
64
Balwant Baswant Wankhade retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
The Congress-DMK alliance has a proud history of social justice in Tamil Nadu. We are committed to carrying it forward. My message to the people of Tamil Nadu: Protect your identity, your language, your rights. Vote for the INDIA alliance. Vote for Congress.
English
2.5K
8K
27K
557.2K
Balwant Baswant Wankhade retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
बाबासाहेब डॉ. भीमराव अंबेडकर ने हमें सिर्फ़ संविधान नहीं, न्याय, समानता और सम्मान पर आधारित एक सशक्त भारत का सपना दिया। लेकिन आज कुछ ताकतें सुनियोजित तरीके से बाबासाहेब की इस विरासत और हमारे संविधान को कमजोर करने में लगी हैं - लोकतांत्रिक संस्थाओं को खोखला किया जा रहा है, अधिकारों को कुचला जा रहा है, और समता की सोच पर हमला हो रहा है। यह देश बाबासाहेब के विचारों पर बना है - मैं पूरी शक्ति के साथ, आखिरी दम तक इनकी रक्षा के लिए लड़ता रहूंगा। हम सब मिल कर बाबा साहेब के सपनों के भारत को फिर से साकार करेंगे। आप सभी को अंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
Rahul Gandhi tweet media
हिन्दी
1.2K
7.2K
28.1K
250K
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा! समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा संदेश अधिक दृढ करण्याचा हा प्रेरणादायी दिवस. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे महान विचारवंत आणि युगप्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन! आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! . . . #AmbedkarJayanti #babasahebambedkar #equalityforall #IndianConstitution #jaybhimpublic
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
0
0
1
34
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन म्हणजे केवळ एका कलाकाराचाच नव्हे, तर एका युगाचा अंत आहे. त्यांच्या आवाजाने पिढ्यानपिढ्यांची हृदये भावपूर्णतेने भरून टाकली आणि त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे अजरामर केले. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या प्रियजनांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
0
0
1
47
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
*अमरावतीत एमडी ड्रग्सचा वाढता विळखा; खा. बळवंत वानखडे यांची लोकसभेत कठोर कारवाईची मागणी* (Box) अमरावती, प्रतिनिधी – शहरात एमडी (MD) ड्रग्सचा वाढता प्रभाव अत्यंत चिंताजनक स्वरूप धारण करत असून, तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या विळख्यात अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. अलीकडे पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, वारंवार मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणात गुजरात आणि राजस्थानशी संबंधित कनेक्शन समोर येत असल्याने, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. अमरावती हे एमडी ड्रग्सचे मोठे केंद्र (हब) बनत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडील कारवायांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रकद्वारे ड्रग्स अमरावतीत येत असून, येथून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे वितरण होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या वाहतुकीचा संपूर्ण मागोवा घेऊन ड्रग्स पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. यासंदर्भात विशेष पथक नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या ड्रग्स प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. #amravati
MR
0
2
7
210
Balwant Baswant Wankhade retweetledi
LOK SABHA
LOK SABHA@LokSabhaSectt·
The 406th, 407th, 408th, 409th, 410th and 411th Reports of the Standing Committee on Science and Technology, Environment, Forests and Climate Change were laid in #LokSabha today by Shri @BalwantINC, MP. @moefcc @sansad_tv
English
1
4
4
319
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
मानवता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा. 🌙✨
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
0
0
3
54
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
🚆 शकुंतला रेल्वे पुनरुज्जीवनाची मागणी — जनतेच्या जीवनवाहिनीला नवा श्वास द्या. केंद्रीय बजेट (2026-27) मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या चर्चेदरम्यान, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शकुंतला रेल्वे पुनरुज्जीवनाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. मूर्तीजापूर ते अचलपूर ही रेल्वे लाईन केवळ प्रवासाचा मार्ग नाही, तर हजारो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली ही रेल्वे, ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी DPR सुद्धा तयार आहे. 👉 आता गरज आहे ती त्वरित अंमलबजावणीची! मी माननीय रेल्वेमंत्री महोदयांना विनंती केली आहे की, या बजेटमध्ये आवश्यक तरतूद करून: ✔️ मूर्तीजापूर–अचलपूर रेल्वे मार्ग तातडीने सुरू करावा ✔️ विदर्भातील जनतेला दिलासा द्यावा ✔️ स्थानिक विकास आणि रोजगाराला चालना द्यावी शकुंतला रेल्वे पुन्हा धावली पाहिजे — हीच जनतेची अपेक्षा!
MR
0
2
10
231
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
महाराष्ट्रराज्याचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #YashwantraoChavhan
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
1
0
2
62
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
ज्ञानज्योती, स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्त्री सक्षमीकरणाचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली... #SavitribaiPhule #KrantiJyoti #WomenEducation
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
0
0
2
43
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
काँग्रेस प्रवक्ते मा. हणमंत पवार यांना भाजपा गुंडांनी केलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध...!
Balwant Baswant Wankhade tweet media
MR
3
38
333
2.8K
Balwant Baswant Wankhade retweetledi
Congress
Congress@INCIndia·
मोदी जी, आप अपने मित्रों अनिल अंबानी, अडानी और अपने लिए जो उचित समझें, वो कीजिए। मैं और कांग्रेस पार्टी के बब्बर शेर देश की रक्षा करते रहेंगे - एक इंच पीछे नहीं हटेंगे। : नेता विपक्ष श्री @RahulGandhi
हिन्दी
418
2.9K
10.2K
84.2K
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
⏩मेळघाटात इशारा ! ४० हजार आदिवासी मजुरांच्या अस्तित्वासाठी रणांगणात केंद्राच्या मजूरविरोधी धोरणांविरुद्ध ‘मनरेगा बचाव यात्रा’चा एल्गार; हजारो मजुरांचा उसळता जनसागर रस्त्यावर! चिखलदरा : “केंद्र सरकार जाणीवपूर्वक मनरेगा कायदा कमकुवत करून तो इतर योजनांमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण व आदिवासी मजुरांच्या हक्काची कायदेशीर हमी काढून घेण्याचा हा डाव असून मेळघाटातील ४० हजार मजुरांचे आयुष्य या योजनेवर उभे आहे. मजुरांच्या हक्कावर कुठलाही घाला घातला, तर रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारू,” असा थेट इशारा दिला. • दुर्गम भागात झंझावाती दौरा; मजुरांच्या वेदनांना थेट स्पर्श काजलडोह येथून प्रारंभ झालेली यात्रा डोमा, बामादेही, काटकुंभ, बगदरी, गांगरखेडा, कोरडा आणि काला पांढरी, कामिदा या अतिदुर्गम गावांमधून मार्गक्रमण करत गेली. ठिकठिकाणी हजारो मजुरांनी उत्स्फूर्त स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या. मजुरांच्या रांगेत बसून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संसदेपासून रस्त्यापर्यंत लढण्याची ठाम ग्वाही दिली. • ४० हजार कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न; भीषण संकटाची चाहूल सभेला संबोधित करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “मेळघाटातील जवळपास ४० हजार मजूर कुटुंबे केवळ मनरेगाच्या उत्पन्नावर जगत आहेत. जर हा कायदा कमकुवत केला किंवा इतर योजनांमध्ये समाविष्ट करून त्याची स्वतंत्र ओळख संपवली, तर हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर वाढेल आणि आर्थिक विवंचना तीव्र होईल.” त्यांनी पुढे ठाम मागणी केली की मनरेगा मजुरी किमान ४०० रुपये प्रतिदिन करण्यात यावी आणि १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी प्रभावीपणे कायम ठेवावी. केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक बोजा टाकून योजना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.यात्रेतील ठोस मागण्या १. मनरेगा मजुरी दर प्रतिदिन किमान ४०० रुपये करण्यात यावा. २. १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी कायम ठेवून बळकट करावी. ३. मनरेगा कायद्याची स्वतंत्र ओळख कायम ठेवावी व तो इतर योजनांमध्ये विलीन करू नये. ४. मजुरीची १००% देयके केंद्र सरकारने वेळेवर आणि थेट अदा करावीत. या यात्रेचे नियोजन तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले, पीयूष मालवीय आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी विक्की राठोड, राजेश सेमलकर, किशोर झाडखंडे, राकेश झाडखंडे, सोनाजी सावलकर, सज्जू कासदेकर, ललिता बेठेकर, रामलाल काळे, विनायक कवडे, अंकुश कवडे, सुखदेवराव कवडे, महिपतसिंग उईके, शेख नौशाद, संदीप अलोकार, सुनील उईके, अमित बेलकर, हेमू आठोले, धनराज आठोले, वर्मासिंग सलामे, चितराम बेठेकर, संदीप मुंडे, मिलिंद सेमलकर, संजू जामुनकर, जय झाडखंडे, पतिराम चिमोटे, राजकुमार बेलकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनरेगामध्ये कार्यरत रोजगार सेवक व मजूरवर्ग उपस्थित होता. या यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मेळघाटातील आदिवासी मजुरांमध्ये नव्या लढ्याची ऊर्जा निर्माण झाली असून, पुढील काळात हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Balwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet mediaBalwant Baswant Wankhade tweet media
MR
0
0
4
126
Balwant Baswant Wankhade
Balwant Baswant Wankhade@BalwantINC·
⏩मेळघाट मनरेगा बचाओ अभियान | जि. अमरावती ( महाराष्ट्र )
MR
0
0
3
78