
🔹आपणास दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून व स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओला द्यावी व पोच घेऊन एक प्रत स्वतः जवळ ठेवावी. 🔹आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा आणि भारत निवडणूक आयोग मान्य ११ पैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. 🔹अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर 'KNOW YOUR BLO' किंवा ECINET अॅपवर 'BOOK A CALL WITH BLO' वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करा #MyBMCUpdates #SIR #SpecialIntensiveRevision
























