Chetan Vitthal Tupe

6.1K posts

Chetan Vitthal Tupe banner
Chetan Vitthal Tupe

Chetan Vitthal Tupe

@ChetanVTupe

Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.

Pune, India Katılım Ocak 2014
59 Takip Edilen10.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
अखेर इतिहास घडला. जनता झाली आमदार. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली यासाठी सर्वप्रथम जनतेचे मनापासून आभार मानतो. माझे सहकारी आमदार योगेश अण्णा टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे, महायुती चे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. या सर्वांनी दिलेली साथ आणि विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे. हडपसर चा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा शब्द आहे. #जनतेचा_आमदार #इतिहास_घडला #हडपसर_विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे #महायुती
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
23
10
77
4.5K
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याबाबत आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. करोडो लिटर पाणी वाया गेले. आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्याचे आपल्यापुढे आव्हान असतानाच अशा प्रकारच्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत कुठे हलगर्जीपणा झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुरुस्तीचे काम अधिकारी युद्धपातळीवर करत आहेत यात दुमत नाही मात्र यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने भरपाई द्यावी. #हडपसर #जलसंपदा #मुठा_उजवा_कालवा #पाणी #विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
MR
0
2
9
243
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच मी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आढावा घेतला. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. साचलेले पाणी वाहून जाण्यास काही तास लागतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी साडेबारा वाजता पुन्हा आढावा घेतला असता कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णतः बंद करण्यात आलेला असून फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे समजले. कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून वाहतूक वळविण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या असून परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मनपा हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. खंदारे, मनपा उपायुक्त श्री. माळी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. सोनवणे तसेच ईशान तुपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कीर्तने बाग परिसरात पाणी साचले होते, ते जेट मशीन व पंपांच्या साहाय्याने काढण्यात आले असून स्वच्छतेचे काम सुरू आहे. बाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Chetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet media
MR
0
1
9
335
Chetan Vitthal Tupe retweetledi
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन ll उपमुख्यमंत्री #अजित_पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका असून याचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे असं आमदार @ChetanVTupe म्हणाले.‌ मात्र प्रशासन आणि पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप त्यांनी केला. #MahaBudget2026
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई tweet media
MR
0
2
1
67
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऊर्जावान आणि तरुण नेतृत्व, खासदार मा. श्री. पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अजितदादांनी जपलेला दृष्टिकोन आणि विचार आपण पुढे नेत आहात, ही अभिमानाची बाब आहे. आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो आणि समाजासाठी आपण अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावे, हीच शुभेच्छा. आपल्याला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. @parthajitpawar
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
0
2
5
82
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
विधानसभेत बोलताना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी या नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावाच्या विकासासाठी विशेष निधीची ठाम मागणी केली. मांजरी हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून येथील लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक त्या मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या भागातील अनेक गल्ल्या १ किलोमीटरपर्यंत लांब असून, मोठ्या व सुसज्ज रस्त्यांची नितांत गरज आहे. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनची उभारणी, वीज सुविधेची सुधारणा आणि इतर पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक आहे. या सर्व विकासकामांसाठी पुरेसा आणि स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठोस मागणी शासनाकडे केली. मांजरी परिसराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन! #मांजरी #हडपसर #पुणे_मनपा #विकासकामे #विधानसभा #जनतेचा_आवाज #उत्कृष्ट_संसदपटू #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
MR
0
1
3
150
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
काल संध्याकाळी सिंचन विभागाकडून अचानक कालव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, गोपाळपट्टी आणि घुले वस्ती परिसरात पाणी घरांमध्ये शिरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंच अण्णा दारवटकर तसेच अजित घुले यांनी तात्काळ कळवले आणि संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सध्या बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन शाळांमध्ये करण्यात आले आहे. मात्र, या सर्व कुटुंबांचे लवकरात लवकर कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, यासाठी आज विधानसभेत विशेष सूचनेद्वारे अध्यक्षांकडे माझी ठाम मागणी मांडली आहे. आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे त्यांना न्याय मिळावा हीच माझी आग्रही मागणी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, ही अपेक्षा. #मांजरी #कॅनॉल #पुनर्वसन
MR
0
1
7
209
Chetan Vitthal Tupe retweetledi
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी जलसंपदा विभागाने कॅनोलमध्ये पाणी सोडल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघाील नागरिकांचे नुकसान झाल्याचे सांगत, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करा, अशी मागणी सभागृहात केली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
3
6
9
163
Chetan Vitthal Tupe retweetledi
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी पुण्यातील कचराप्रश्नी मंत्र्यांचे नेतृत्व, तसेच आमदारांचा सहभाग असलेले भरारी पथक नेमण्याची गरज असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
8
7
10
160
Chetan Vitthal Tupe retweetledi
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी साैरऊर्जा धोरणात अधिक स्पष्टता आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
1
7
11
159
Chetan Vitthal Tupe retweetledi
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी पुण्यातील कचराप्रश्नी मंत्र्यांचे नेतृत्व, तसेच आमदारांचा सहभाग असलेले भरारी पथक नेमण्याची गरज असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
8
7
11
152
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. अदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपण करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वातून समाजहिताचे अनेक उपक्रम पुढे येत राहोत. आपणास उत्तम आरोग्य, यश आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. @iAditiTatkare
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
2
0
3
84
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेत मी सहभाग घेतला. या चर्चेदरम्यान पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. आमचे नेतृत्व, दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा शब्द दिला होता. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या आवश्यक सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही गावे पुणे मनपात समाविष्ट करण्यात आली. मात्र वास्तव परिस्थिती अशी आहे की, गावे समाविष्ट होऊन बराच काळ लोटला असतानाही आजही या भागात अपेक्षित सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी विकासाच्या योजनादेखील प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. उलट या भागातील नागरिकांना पूर्वीपेक्षा जवळपास सातपट कर भरावा लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. माझ्या मतदारसंघातील साडेसतरा नळी, केशवनगर आणि मांजरी या समाविष्ट गावांमधील नागरिकांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मूलभूत सुविधा न देता वाढीव कर आकारणे हे अन्यायकारक आहे. तो कर सातपट न ठेवता दुप्पट असावा, म्हणूनच विधानसभेत मी स्पष्टपणे मागणी केली की, ज्या वेळी या भागांना पुणे शहरासारख्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, त्या वेळीच वाढीव कर लागू करण्यात यावा. तसेच स्व.अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना दिलेला शब्द शासनाने पूर्ण करावा आणि जनतेच्या भावनांची दखल घ्यावी. नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहणे हीच आपली जबाबदारी आहे, आणि यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन. #समाविष्ट_गावे #पुणे_मनपा #विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे #हडपसर_विधानसभा
MR
0
2
10
199
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या, अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध धैर्याने उभं राहणाऱ्या परिवर्तनाच्या तेजस्वी प्रतीक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #सावित्रीबाई_फुले_स्मृतिदिन
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
0
2
10
62
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
अहमदाबाद येथे झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि संघभावनेच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय संपादन केला. या दिमाखदार कामगिरीमुळे संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचे मनःपूर्वक अभिनंदन! भारतीय क्रिकेटचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकत राहो, हीच शुभेच्छा. 🇮🇳🏏 #TeamIndia #T20WorldCup #Champions #INDvsNZ #proudmoment
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
0
1
8
93
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
आज विधानभवनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना बांबू शेतकरी आणि पारंपरिक कारागीरांच्या संबंधित महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. भारतीय पारंपरिक व्यवसायांमध्ये बांबूपासून विविध घरगुती, शेतीसाठी तसेच दैनंदिन वापरातील अनेक वस्तू तयार केल्या जातात. महाराष्ट्रातील बुरुड समाज दीर्घकाळ या व्यवसायावर आपली उपजीविका करत आला आहे. पर्यावरणपूरक आणि उपयुक्त अशा या व्यवसायाला प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मोठा फटका बसत असल्याकडे यावेळी लक्ष वेधले. शासनाने अटल बांबू समृद्धी योजना तसेच राष्ट्रीय बांबू मिशन यांच्या माध्यमातून बांबू लागवडीस प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले आहे. या योजनांमुळे राज्यात बांबू लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र परंपरागतपणे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थितीही यावेळी मांडली. कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या वस्तू तसेच प्लास्टिकच्या वस्तूंच्या वाढत्या वापरामुळे हाताने बनविलेल्या बांबू वस्तूंची मागणी घटत आहे. त्यामुळे बांबू कारागीर व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर बांबूपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी शासन स्वतंत्र धोरण आणणार का, संशोधन व विकासासाठी विशेष योजना राबविणार का, तसेच बांबू कारागिरांना शासन विशिष्ट दर्जा देणार का, असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. याशिवाय कारागिरांना बांबू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत तसेच बांबू पुरवठा सुलभ करण्यासाठी शासन काही उपाययोजना करणार का, याबाबतही सरकारकडे विचारणा करण्यात आली. या विषयावर मंत्री मा. गणेश नाईक यांनी सभागृहात सविस्तर व समाधानकारक उत्तर दिले. #विधानसभा #लक्षवेधी #बांबू_शेतकरी #बुरुड_समाज #अटल_बांबू_समृद्धी_योजना
MR
0
0
1
72
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत, पुढे येत आहेत, ही आश्वासक बाब आहे. संधी मिळाली की त्या खडतर आव्हानांना सामोरे जात यशस्वी होतात हे जगाने पाहिले आहे. महिला सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने समानतेचं पर्व सुरु होईल. त्यांच्या पंखांना बळ देऊया. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. #InternationalWomensDay
Chetan Vitthal Tupe tweet media
MR
1
3
12
98
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
दिगवंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा (वहिनी) अजितदादा पवार यांचे चिरंजीव, पक्षाचे युवा नेतृत्व खासदार श्री. पार्थ अजित पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा नेतृत्व, नव्या विचारांची दिशा आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे आशेने पाहिले जात आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी @parthajitpawar आणि श्री.जय अजितदादा पवार यांच्यासह भेट झाली.
Chetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet media
MR
1
1
9
139
Chetan Vitthal Tupe retweetledi
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्री. चेतन तुपे यांनी परंपरागत बांबू कारागीरांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सभागृहाचे लक्ष वेधत, बांबूपासून तयार करता येणाऱ्या नवीन उत्पादनांच्या प्रोत्साहनासाठी सरकार धोरण आणणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
4
8
10
208
Chetan Vitthal Tupe
Chetan Vitthal Tupe@ChetanVTupe·
आपले लाडके नेते, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर ज्या भूमीत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या पवित्र जागी जाऊन आज स्वर्गीय दादांच्या प्रतिमेला फुल वाहून दादांना अभिवादन केले. दादा, या बारामतीच्या मातीतून तुम्ही आपली कारकिर्द सुरू केली आणि एका उच्च शिखरावर नेऊन ठेवली. बारामती मध्ये आपण केलेल्या विकास कामांच्या अनेक खुणा सतत दिसत राहतात, त्यामुळे पावलोपावली आपले स्मरण होत राहते. दादा, लोकांचे प्रश्न सोडवत असताना, लोकांसाठी काम करत असताना तुमचा आदर्श कायम डोळ्यासमोर असतो. तुम्ही आमच्या स्मरणात कायमस्वरूपी असाल. तुमचाच, चेतन
Chetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet mediaChetan Vitthal Tupe tweet media
MR
0
4
90
1.9K