DARK

3.9K posts

DARK banner
DARK

DARK

@DARK_5757

ऐश्वर्याला,मोहित स्वप्नांना दिलेली तिलांजली.निसटल्याचा आभास,निराशेची मळभ,तुटता आत्मविश्वास.देखणेपणाच्या सुखी ऐश्वर्याची आस उरी बाळगलेला एक कुरूप जोकर.🤡 🖤

Katılım Ocak 2024
35 Takip Edilen901 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
DARK
DARK@DARK_5757·
बाप... गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.👇
DARK tweet media
MR
24
44
480
42.5K
DARK
DARK@DARK_5757·
कधीच न मिळालेलं प्रेम हृदयाच्या अस्पर्श कोपऱ्यात चिरतरुण ठेवणाऱ्या एका पिढीचे हल्ली हलकेसे केस पांढरे होताना दिसतायेत...मन कदाचित पुढे नसेल ही सरकल पण वेळ.. पण ही वेळ केसांच्या बदलत्या रंगांनी कूस बदलू पहातेय... #genrationY #DARK🖤
MR
0
7
24
481
Hemant Dhome । हेमंत ढोमे
कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते… एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाही साठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या सारख्या अनेक मंडळींनी करायलाच हवं! या आंदोलनाचं पुढे काय होईल हा भाग वेगळा कारण आपल्याकडे बहुतांशी राजकीय आंदोलने पुढे कोणत्या वळणावर गेली हे आपण सगळेच जाणतोच! पण लोकशाहीत पर्याय महत्वाचा आहे! आणि या मंडळींकडून प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं! अभिजीत दिपके आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक! आपल्याकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत, आपण जबाबदारीने त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न कराल ही प्रांजळ अपेक्षा! @abhijeet_dipke @CJP_2029
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
127
244
1.8K
38.2K
DARK
DARK@DARK_5757·
आत्मविश्वास ढासळेल या विचाराने मागे सरकतो, पण खरं म्हणजे अपयश हा शेवट नसतो, तो पुढे जाण्यासाठीचा जिवंत धडा असतो, जिंकतात तेच जे पडूनही पुन्हा उठतात, कारण अपयशाला सामोरं जाण्यातच खरी ताकद दडलेली असते. #शब्द_सूची #DARK🖤
MR
0
2
5
182
DARK
DARK@DARK_5757·
आपण अपयशाला खूप घाबरतो.. कारण आपल्या ला वाटतं स्वप्नं तुटली तर मनही तुटेल, लोकं काय म्हणतील ही भीती आपल्या पावलांना बांधून ठेवते, चुका झाली तर मजाक होईल अशी शंका खात बसते, पडले तर पुन्हा उभं राहता येईल का हा प्रश्न सतत थांबवत , मेहनत वाया जाईल या भीतीने आपण प्रयत्न अर्धवट सोडतो,
MR
1
10
46
1.4K
DARK
DARK@DARK_5757·
नातेसंबंध ही एक अंतरयात्रा: नातेसंबंधांचे खरे सौंदर्य हे एकमेकांना त्यांच्या गुण-दोषांसह स्वीकारण्यात दडलेले असते. आपण माणसांना वर्षानुवर्षे ओळखतो, बालपणापासून वार्धक्यापर्यंत सोबत असतो; पण संवादात थोडा जरी विसंवाद झाला की लगेच पाठ फिरवतो. खरं तर, चांगल्या माणसांसोबत तर जग 👇
MR
2
10
52
1.9K
DARK
DARK@DARK_5757·
पण ते निस्वार्थीपणे जपणे आणि शेवटपर्यंत निभावून नेणे यासाठी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिकावे लागते. आणि विशेष म्हणजे, हे शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही बाह्य वर्गाची गरज नसते; हे तत्वज्ञान आपल्या स्वतःच्या मनात, एकांतात शांत बसूनच आत्मसात करता येते. #शब्द_सुची #DARK🖤
MR
0
0
6
221
DARK
DARK@DARK_5757·
तसेच नात्यातही स्वार्थाची सुई टोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. माणसे मुळात स्वार्थी नसतात, केवळ काही प्रसंग त्यांना तसे बनवतात. परंतु, प्रत्येक माणूस कधी ना कधी अंतर्मुख होतोच आणि पुन्हा चांगुलपणाकडे वळतो, हा विश्वास बाळगणे महत्त्वाचे आहे. नाते तोडणे ही क्षणाची गोष्ट आहे, 👇
MR
1
0
6
299
DARK
DARK@DARK_5757·
@ruchika5j वैखरी...?
हिन्दी
0
0
0
49
Ruchika Jadhav
Ruchika Jadhav@ruchika5j·
माणसाने आपली वैखरी खूप जपून वापरावी… कारण शब्दांना धारही असते आणि आधारही. आपण रागात, अहंकारात किंवा नकळत जे बोलून जातो, ते समोरच्याच्या मनात आयुष्यभर घर करून बसतं. विधिलिखितात एक गोष्ट मात्र नक्की असते — जे आपण दुसऱ्यांना देतो, तेच कधी ना कधी परत आपल्या वाट्याला येतं.
MR
2
0
1
82
DARK
DARK@DARK_5757·
गर्द भावनांचा बाजार भरतो ही रात्र जशी डोळ्यांना दिसू लागते.आपले पणाच्या हुंदक्यातून सावराव तर परक सुख भावत,हवंहवंसं वाटत..चूक बरोबर ची गणित मांडता मांडता रात्र टळावी तशी स्वतःला दोषी ठरवून फाशीला टांगून नेतो... #DARK🖤
MR
0
1
12
249
DARK
DARK@DARK_5757·
वागण्यात खरेपणा सापडला नाही की आमच्या सारखी भावनिक माणसं डोळ्यांत खरेपणा शोधतात...डोळेही खोटे बोलू लागले की मग होतो तो आमचा भ्रमनिरास आणि हा भ्रमनिरास होणं कधी कधी खूप गरजेचा असतो... #DARK🖤
MR
0
3
41
777
DARK retweetledi
DARK
DARK@DARK_5757·
आई च्या मायेला कौतुकाच्या सोहळ्याची आस नसावी कदाचित.देवाचं अबाधित सोंदर्य वाखनण्याची दृष्टी परमेश्वराशिवाय कोणाला नसावी कदाचित.पण तु जगवलेल्या या मोठ्या केलेल्या जीवाच्या कडवट मुखातून तुझ्यासाठी दोन शब्द मायेचं निघावेत हे दान,हे पुण्य पदरी थोडस पडावं ही भगवंताकडे प्रार्थना...
MR
1
6
24
1.1K
DARK retweetledi
DARK
DARK@DARK_5757·
आईचा पदर पकडून गर्दीत रस्ता शोधला जायचा लहान असताना मी.गर्दीत फक्त घट्ट पकडलेला आईचा पदर अन नजर तिच्या पावलांवर.कधी गर्दी संपायची कळायचंच नाही.मोठा झालो आणि ती पदराची काठ सोडवली गेली.आईची पावलंच दिसेना झालीय आता रस्ता कुठे शोधु... #आई #DARK🖤
DARK tweet media
MR
2
12
56
2.1K
DARK retweetledi
DARK
DARK@DARK_5757·
आई कुठे काय करते....😊
MR
1
18
216
8.6K
DARK retweetledi
DARK
DARK@DARK_5757·
आई... तसा नेहमीचाच अबोला आमच्या दोघांत कधी घरी नसणं,वेळेवर न येणं, वेळेवर न खाणं या अशा असंख्य गोष्टींवर शब्दाला शब्द लागून अबोला येऊ लागला.काल रात्रभर ताप अन खोकल्याने डोळा लागला नाही तर बिचारी तीही जागी राहिली.सकाळ office चा phn सुरू झाले तर मला बोलता ही येईना.
MR
1
2
10
525
DARK
DARK@DARK_5757·
पुढच्या जन्मी माझी आई माझ्या पोटी माझी मुलगी म्हणून जन्माला आली तरी मी एवढं तिला देऊ शकणार नाही तेवढं अडाणी आईनं या जन्मात दिलं... या मातृत्वाच्या प्रेमाच्या परतफेडीसाठी एक जन्म भगवंतांला उधार मागावा म्हणतो.... मातृत्वाचा दिवस आज... #mother #DARK🖤
MR
0
3
36
824
DARK
DARK@DARK_5757·
@Mr_innocent_16 नाही असं काही नाही...😄
MR
0
0
0
24
DARK
DARK@DARK_5757·
अधिकाराला शब्दांची नजर लागली की त्याला टोमणा समजला जातो.... #DARK🖤
MR
1
0
21
317