Dr Bhausaheb Dangade, IAS
159 posts

Dr Bhausaheb Dangade, IAS
@DangadeDr
Navi Mumbai, India Katılım Şubat 2014
685 Takip Edilen513 Takipçiler

bit.ly/4rfM8Bj #Iran was warming up so far. Didn’t start pounding #Israel in true earnest until now. Having blinded the US radars in ME, Bibi’s dog, Trump, is no longer able to warn and/or guide #TelAviv’s air-defence tools. The IOF already told no early-warning sirens.
English
Dr Bhausaheb Dangade, IAS retweetledi

@dr_prashantsb Happy marriage anniversary Prashant!
English

आज आमच्या लग्नाला 19 वर्षे पूर्ण झाली. 19 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी उत्तर महाराष्ट्रात अभूतपूर्व पाऊस पडला होता. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले होते. लग्न शिरपूर येथे होते आणि आम्ही धुळ्याहून लग्नासाठी सकाळी निघणार होतो. धुळे आणि शिरपूरच्या दरम्यान तापी नदी लागते. तापी नदी दुथडी भरून वाहत होती. तापीचा जलस्तर आणखी वाढला असता तर पुलावरून पाणी जाण्याची शक्यता होती. पाऊस थांबला नाही तर पूल बंद केला जाईल अशी चर्चा होती. कदाचित तसा प्रसंग आला असता तर स्वतःच्याच लग्नाला पोचू न शकलेला नवरदेव अशी माझी अवस्था झाली असती. पण सुदैवाने पाऊस थांबला आणि आम्ही वऱ्हाड घेऊन शिरपूरला पोहोचलो, लग्न लागले. त्या गोष्टीला पाहता पाहता 19 वर्ष होऊन गेली. आमचे लग्न जमण्यापासून ते लग्न पार पडेपर्यंत अनेक गमतीजमती घडल्या त्याबद्दल नंतर लिहिणारच आहे. या गोष्टी नशिबाच्या असतात की काय मला माहिती नाही पण एका जवळपास अनोळखी असलेल्या कुटुंबातील अनोळखी मुलीला आपण पहायला जातो आणि अतिशय जुजबी डेटावर विसंबून आपल्या व्यवस्थेत आपण एकमेकांना आयुष्यभराचे जोडीदार म्हणुन निवडतो, सर्व रामभरोसे कारभार ! माझ्या बाबतीत मात्र वैशाली परफेक्ट मॅच ठरली !

MR

@dr_prashantsb Prashant, you have narrated it so aptly… Great 👍
English

विनोद कांबळी व सचिन तेंडुलकर :
दोघांनी एकाच वेळेस क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. दोघांचे प्रशिक्षक एकच होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचे पदार्पण आधी झाले आणि कांबळी नंतर आला तरीसुद्धा त्याचा खेळ सचिनच्या तोडीस तोड होता. विशेषत्वाने त्याचा ऑफ ड्राईव्ह व स्क्वेअर ड्राईव अतिशय सुंदर. सर्वच डावखुऱ्या फलंदाजांचे स्क्वेअर ड्राईव्ह पाहत रहावे असेच असतात पण लारा आणि कांबळी यांचा मात्र अतिशय स्टायलिश आणि प्रेमात पडावा असा होता.
त्याकाळी क्रिकेट समीक्षक विनोद कांबळी हा क्रिकेट विश्वावर सचिनप्रमाणे मोठी छाप सोडून जाईल असा विश्वास व्यक्त करायचे. आमची पिढी तेव्हा कॉलेज विश्वात होती आणि स्वाभाविकच त्यामुळे क्रिकेट फार बारकाईने पाहिले जायचे.
आमच्या डोळ्यासमोर अचानक कांबळीचे करियर एका क्षणी कोसळाला सुरुवात झाली आणि बघता बघता तो नामशेष होऊन गेला. एकाच गुरुने संस्कार घडवलेल्या या दोन खेळाडूंच्या आयुष्याचे ग्राफ मात्र परस्परविरोधी दिशेला गेले.
गुणवत्ता, संधी व प्रशिक्षण सर्व समान पातळीवर मिळालेले असताना दोघांमध्ये 360° चा पडलेला फरक हा फक्त त्या दोघांनी निवडलेल्या विचारावर आधारित आहे.
त्यामुळे माझे ठाम मत आहे की आपण आपल्या मनावर सुद्धा प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. आपले चेतन मन विचार निर्माण करणे व त्यापैकी विचार निवडणे या दोन महत्त्वाच्या भूमिका पार पाडते.
आपले अवचेतन मन निवडलेला विचार तंतोतंत कृतीत आणण्याची भूमिका पार पाडते. आणि आपण तंतोतंत अमलात आणलेल्या कृती आपल्या आयुष्याला आकार देतात. त्या पलीकडे काहीही नाही.
आज स्वर्गीय श्री रमाकांत आचरेकर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे जे फुटेज आले आहेत ते पाहून विनोद कांबळी बद्दल फार वाईट वाटले.
पण हा आपल्या सर्वांसाठी एक जिवंत धडा आहे. मनावर सातत्याने काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी मेडिटेशन, माईंड फुलनेस, विपश्यना, वाचन, लिखाण, जर्नलिंग यासारखी सर्व तंत्र कायम वापरली पाहिजेत. त्यासाठी दिवसातला काही वेळ राखीव ठेवला पाहिजे, मग दररोज अगदी दहा मिनिटे का असेना......
विनोदने त्याकाळी त्याच्या अल्प क्रिकेट कारकिर्दीत सुंदर खेळ करून जे आनंदाचे क्षण आमच्या पिढीच्या आयुष्यात निर्माण केले त्याबद्दल त्याचे आम्ही कायमच फॅन राहू!
डॉ प्रशांत भामरे
MR

@Dr_of_Lifestyle Ma’am, may I ask you to check your DM please?
English

“मला वेळ मिळत नाही” हे व्यायाम न करण्यासाठी दिलं जाणारं खूप कॉमन कारण आहे. वेळ हा कधीच मिळत नसतो. तो काढावा लागतो. आणि तो तेव्हाच काढला जाईल जेव्हा वर्कआऊट करणं ही तुमची “प्रायोरिटी” असेल. ९-५ जॉब टाइमिंग आहे ना? असुदे. ९-५ च्या आधी ५-९ प्लॅन करा. उठा लवकर. !
सगळ्या गोष्टींना मग कसा वेळ मिळतो हे कळेलच मग. 😊
MR

@dr_prashantsb What is your prediction, Prashant😀😀😀
English

विविध मतदारसंघातील मतदानाचे आणि विजय पराजयाचे अनुमान/ गणितं/ ठोकताळे मांडणाऱ्यानी उबग आणला आहे. व्हाट्स अप, फेसबुक, ट्विटर एव्हढंच काय प्रत्यक्ष भेटलं तरी लोकं लगेच चालु पडत आहेत, अगदी डोकं उठलं आहे ! जमावबंदी लागु करायला जसं 144 कलम लावतात तसं अशी चर्चा थांबविण्यासाठी एखादं कलम शोधुन लागु केलं पाहिजे तात्काळ !
😂😂😂
MR

@dr_prashantsb Very well written! Keep it up Prashant 👍
English

आणि मग लुज बॉल मिळाल्यावर कसलेला फलंदाज त्याला जसा पुरेपुर धावा वसुल करण्यासाठी वापरतो त्याच धर्तीवर या संधीचा सुयोग्य वापर करत घरच्यांनी हाताचा, तोंडाचा यथेच्य आणि परिणामकारक वापर आमच्यावर पुढील किमान अर्धाएक तासतारी केला. आमची लक्षणं ठीक नसुन सुधारणा न झाल्यास आम्ही भविष्यकाळात पशुपालनाशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रात काहीही योगदान देऊ शकणार नसल्याचे आमच्यावर ठसविण्यात आले. दरम्यान आमच्या मार्गदर्शक मंडळाने विश्वामित्री पवित्रा घेत या प्रकरणाशी त्यांचा बादरायण संबंध नसल्याचे खुबीने भासविल्याने आम्हास कोणताही आधार राहिला नाही. शेवटी ज्या गावच्या शिवारात हा प्रसंग घडला त्याच गावचा दूधवाला आमच्या कॉलोनीत दुध घालत असल्याने व ते शेतकरी त्याच्या परिचितांपैकी निघाल्याने त्याने मध्यस्थी करून ती कुर्हाड परत मिळवून दिली आणि प्रकरण एकदाचे मिटले. पण बालपण त्या होळीत जळून दुनियादारीच्या व्यावहारिक जगाशी पहिली ओळख त्या प्रसंगातुन आम्हाला झाली ती अश्याप्रकारे !
डॉ प्रशांत भामरे.
2/2
MR

स्मरणातील होळीने शिकविलेला धडा -:
बहुतेक 1988 सालातील गोष्ट आहे. मी तेव्हा इयत्ता आठवीत होतो. बालपण संपुन तरुणपण अद्याप यायचं बाकी आहे असा तो मधला काळ असतो. सार्वजनिक आयुष्यातल्या परंपरा कॉलोनीतल्या अकरावी बारावी वगैरेत असलेल्या मुलांकडुन शिकण्याचा कार्यक्रम सुरु झाला होता. कारण त्यांच्या नंतर गणपती बसवणे, कोजागिरी, 31 डिसेम्बरचे कार्यक्रम, होळी, रंगपंचमीचे हे सर्व सार्वजनिक कार्यक्रम भविष्यकाळात आयोजित करण्यासाठी मागच्या पिढीला शिकवून तयार करण्याची गुरुशिष्य परंपरा अव्याहत सुरूच असते. घराबाहेरील दुनियादारीचा पहिले खरेखुरे धडेसुद्धा या शाळेतच मिळतात.
तर त्यावर्षी आम्हाला होळीची व्यवस्था कशी करावी याबाबतचं प्रशिक्षण आमच्या वरिष्ठांकडून सुरु होते. त्याकाळी होळी म्हणजे आमच्या धुळ्याततरी काही फिक्सड नॉर्म होत्या. सर्वात मोठी होळी कोणाची याची स्पर्धा असे आणि कोणती होळी जास्त दिवस पेटलेली राहिली याचीसुद्धा चर्चा असायची नव्हे तो प्रतिष्ठेचा विषय असायचा. मग अशी मोठी होळी करणे ती अधिकाधिक दिवस धगधगत ठेवणे यासाठी तिच्यात अर्पण करायला लाकुडफ़ाटा नामक समिधा गोळा करावा लागायचा.
त्याचे दोन मार्ग होते. पहिला म्हणजे वर्गणीत लाकुड अथवा पैसे मिळवणे आणि त्यातुन विकत घेणे. दुसरा होता रात्रीअपरात्री जागुन जाळण्यायोग्य लाकुड ( कोणत्याही स्वरुपात असेल तसे ) मालकांच्या अपरोक्ष उचलुन आणणे. थोडक्यात काही काळासाठी शर्विलक होणे. रात्री उशिरा सर्व झोपी गेल्यावर आमची टोळी निघायची, रात्रीच्या अंधारातसुद्धा आपल्याला जे हवं आहे ते कुठे दिसतंय का याचा वेध घेत राहणे, ते आढळुन आल्यास गेटचा आवाज न करता गेट उघडणे, अतिशय कौशल्यपूर्वकरीत्या आवाज होऊ न देता ते उचलणे, आपल्या कुंपनाबाहेरील सवंगड्यांकडे हस्तांतरित करणे वगैरे. अश्याप्रकारे मिळालेली लाकडे ठेवण्यासाठी खास जागा केलेली असायची आणि तिथपर्यंत ती वस्तु नेण्यासाठी वेगळी टीम असायची. जुन्या मोडलेल्या लाकडी खुर्च्या अथवा फर्निचर, बांबु, क्वचित कधीकाळी कामाला येईल म्हणुन जपुन ठेवलेले लाकुड अश्या फुटकळ आणि बऱ्याचदा निरुपयोगी असलेल्या त्या वस्तु असायच्या. मुळ मालकांना ते दुसऱ्या दिवशी लक्षात येत असे. पण मग ते होळीमातेला दान झालं असं समजुन कोणी फारसं मनावर घेत नसे.
एके संध्याकाळी आमच्यावर असलेल्या वरिष्ठ थिंक टॅंकच असं ठरलं कि शहरालगत असलेल्या शेतशिवारातल्या झाडांच्या सुकलेल्या फांद्या वगैरे मिळाल्या तर फार मजा येईल. मग ती जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली. आता त्यासाठी लागणारी टॉर्च जिला त्याकाळी बॅट्रीक म्हणायचे होती फक्त कुर्हाड मात्र शहरी भाग असल्याने कोणाकडे मिळेना. मग कॉलनीतच एका घराचे बांधकाम चालु होते तिथे एक म्हातारबोवा वॉचमन होते त्यांच्याकडे कुर्हाड असल्याचे समजले. त्यांच्या मिनातवाऱ्या करून काही तासांपुरती ती घेण्यात आली.
मग रात्री अंधार पडल्यावर आमची 8-9 जणांची टोळी कामगिरीवर निघाली. एका शेतातलं एक मोठं झाड आणि त्याची एक वाळकी फांदीसुद्धा सापडली. आता ती तोडावी कशी याबाबत विचारविनिमय सुरु असताना अचानक कसा कोण जाणे त्या शेताचा मालकच मागुन येऊन हजर झाला. आमच्या हातातली कुर्हाड आणि होळीचे दिवस यामुळे आमच्या नेक इराद्यांबद्दल अनुमान लावायला त्याला क्षणही लागला नाही. मग त्याने आधी आम्हाला काठीने फाटकवायला सुरुवात केली आणि ते करून मन भरल्यावर आमची कुर्हाड काढुन घेतली आणि आम्हाला हाकलुन लावलं. गुपचुप रात्री हातपाय चोळत आणि उद्या काय वाढुन ठेवलंय याची चिंता करत घरोघरी जाउन झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघाचौघांकडे चौकशी करूनही कुर्हाडीचा मेळ लागत नाही हे पाहुन म्हातारबोवानी बोंब ठोकली. बोभाटा टाळावा यासाठी मग मार्गदर्शक मंडळातील वरिष्ठाना ( इयत्ता 11 वि 12 वि ) घेऊन आम्ही म्हातारबोवांशी चर्चा सुरु केली. कुर्हाडीचे असे झाल्याचे कळताच त्यांनी ग म भ न वरून सुरु होणाऱ्या शिव्यांचा जो खजिना पुढच्या 15 मिनिटात रिता केला तो आम्हाला पुढे कॉलेजजीवनात अनेक वादांच्या प्रसंगी हुकुमी कामाला आला ! प्रकरण चिघळुन रात्री बसलेल्या फटक्यांपेक्षा संख्येने व तीव्रतेने अधिकचे फटके घरी बसण्याची शक्यता लक्षात येताच आम्ही कुर्हाड भरून देण्याची तयारी दाखवली. पण सर्वच कुऱ्हाडवाले काही गोष्टीतल्या लाकूडतोड्यासारखे प्रामाणिक नसतात याची प्रचिती आम्हाला क्षणात आली. म्हातारबोवानी कुर्हाडीचे जे भरपाईमुल्य सांगितले तेव्हढ्या पैशात खरोखर सोन्याची कुर्हाडसुद्धा येईल अशी शंका आम्हाला येऊन गेली पण बाबाजी काही दाद देईना, वर्गणीतही येव्हढे पैसे नव्हते मग घरच्यांना घडला प्रसंग कळविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
1/2
MR

असो, तर लोकांच्या आहार पद्धती या स्थानिक उपलब्ध अन्न पदार्थ, लोकांच्या निकडी, स्थानिक हवामान, लोकांची जीवनपद्धती अश्या एक ना अनेक बाबींशी निगडित असतात. मणिपुरला फार अन्न धान्याचे वैविध्य नसल्यामुळे त्यांना विशषेशत्वाने प्रोटिन्ससाठी मांसाहारावर आणि पर्यायाने मासे खाण्यावर अवलंबुन राहावे लागले. ज्या जाती लढवैय्या आहेत, बलोपासक आहेत त्यांच्यात मांसाहार करण्याची तीव्र वृत्ती सर्वत्र दिसुन येते. आसाममधील लोक वर्षभर सर्वप्रकारचा मांसाहार करतात, 600 वर्ष चाललेल्या आणि एकही मुस्लिम आक्रमकांकडून एकदाही पराभुत न झालेल्या आहोम साम्राज्याचे ते वारस आहेत. आपल्या कोकण किनारपट्टीवर मासे मुबलक उपलब्ध त्यामुळे दैनंदिन आहारात त्याचा समावेश असतोच.
मांसाहार असावा कि शाकाहार ? आहारविषयक सवयी, परंपरा या धर्मावर नाहीत तर वर उल्लेख केलेल्या अनेक घटकांवर अवलंबुन आहेत. आहाराचा आणि धर्माचा, देवाचा काहीही संबंध नाही याची लाखो उदाहरणे आहेत. निव्वळ न आवडणारा, न चालणार आहार शेजाऱ्याने किंवा इमारतीतल्या कोणीतरी बनवला म्हणजे आपला धर्म बुडेल इतका काही कमकुवत हा धर्म नाहीये. अडीच तीन हजार वर्षांपेक्षाही अधिक जुना, अनेक स्थित्यंतरं, संकटं लीलया पार केलेला हा धर्म निव्वळ एक फोडणीच्या वासाने भ्रष्ट होईल असे समजणे निव्वळ मुर्खपणाचे आहे. ज्या देव नावाच्या घटकाने सर्व सृष्टी निर्माण केल्याचे सर्व धर्म सांगतात त्या घटकाला जर मांसाहार पसंत नसता तर त्याने असे प्राणीच बनवले नसते जे मांस खाल्ल्याशिवाय जगुच शकत नाहीत !
डॉ प्रशांत भामरे
2/2




MR

स्मृती मणिपुरच्या :-
सध्या मांसाहार करावा कि करू नये, शाकाहारी सोसायट्यांमध्ये मांसाहारी व्यक्तींना स्थान द्यावे किंवा कसे यावरून वादविवाद सुरु आहेत. मांसाहार केल्याने धर्म भ्रष्ट होतो किंवा कसे ? शाकाहारी लोकांच्या सोसायटीत मांसाहारी लोकं आल्याने आराधनेच्या शुद्धतेवर परिणाम होतो काय ? यासारखे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत त्यावरून समाजात तेढ सुद्धा निर्माण झाली आहे/ होते आहे.
या सर्व वादविवादावरून मला 6 वर्षांपुर्वी मणिपुरला दिलेली भेट आठवली. 2017 साली आम्ही 5-6 मित्र एका मित्राच्या आमंत्रणावरून मणिपुरला गेलो होतो. आमचा हा मित्र चांगला 12-13 वर्ष मणिपुरमध्ये राहिला होता सामाजिक कार्यासाठी. त्यामुळे महाराष्ट्रीयन असुनही त्याचा तिकडे दांडगा जनसंपर्क होता, एव्हढेच नव्हे तर तिथल्या सरकार दरबारीही त्यांचा भयानक दबदबा होता. एव्हढा कि आम्ही इंफाळला लँड होऊन जेमतेम हॉटेलला पोहोचुन स्थिरावतो न स्थिरावतो तेव्हढ्यात त्यांना भेटायला तिथले 10-12 आमदार आणि दोनचार मंत्री येऊन गेलेले ! आम्ही जवळजवळ मणिपुरचे स्टेट गेस्टच ( राज्य अतिथी ) होतो म्हणाना !
त्यामुळे आमचं पर्यटन अतिशय डिस्टिंगविशडं पद्धतीने सुरु होतं. कोणत्याही राज्यात गेलं कि तिथली खाद्यसंस्कृती काय आहे ? तिथले लोक काय खातात ? त्याचा स्वाद कसा आहे ? याबाबत मला फार कुतूहल असते आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी माझी फार धडपड असते. हॉटेल्समध्ये किंवा छोट्या छोट्या ढाबेस्वरूप पारंपरिक फुड जॉइंट्स मध्ये मिळणारे स्थानिक पदार्थ चाखायला खुप आवडतातच पण त्यासोबतच तिथे एखाद्या घरी जेवण करून स्थानिक अन्नाचा स्वाद घेण्यात एक वेगळीच मजा असते म्हणुन तेसुद्धा आवर्जुन करण्याचा प्रयत्न असतो.
त्यामुळे मणिपुरमध्येसुद्धा असं एखाद्या घरी काही निमित्ताने जेऊन तिथली घरगुती खाद्यसंस्कृती अनुभवता येईल का याबाबत मी आमच्या मित्राकडे तगादा लावला. मग आम्हाला एका कुटुंबातल्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं. हा कार्यक्रम त्या कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांच्यापुरता मर्यादित होता.
कार्यक्रम होता त्या कुटुंबातील छोट्या मुलांचं कर्णभेदणाचा, थोडक्यात कान टोचायचा ! आपल्याकडे मुंज, शेंडी, जावळ वगैरे करतात तश्यातला तो कार्यक्रम होता. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. तिथे गेल्यावर समजले कि हा एक ब्राम्हण कुटुंबातील कार्यक्रम आहे. तिथे आम्हाला जे सांगण्यात आलं ते असं कि मणिपूरचा हिंदू समाज हा फार कर्मठ आहे. तिथे अश्या सार्वजनिक कार्यक्रमात भोजन बनविणारे आणि वाढणारे हे फक्त ब्राम्हण असतात, भोजन बनविताना सुद्धा तोंडाला शेला गुंडाळुन भोजन बनवितात व वाढतात वगैरे.
कार्यक्रम पार पडल्यावर भोजनासाठी पंगती बसल्या आम्हालाही मानसन्मानाने बसविण्यात आले. जेव्हा वाढप्यानी वाढायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. आमच्या ताटातले 80 टक्के पदार्थ हे मांसाहारी म्हणजेच माश्यांपासुन बनलेले होते. जो वैष्णव हिंदु समाज स्वतःला इतका कर्मठ समजतो त्याच्या इतक्या महत्वाच्या धार्मिक विधीत मांसाहारी भोजनाची पंगत ? कसं शक्य आहे ?
मग अधिक चौकशी केल्यावर कळलं कि तिथे माश्यांचे मांसाहार समजतच नाहीत. सर्व धार्मिक विधीत माश्यांचे पदार्थ बनवले जातात खाल्ले जातात. प्रत्येक घराच्या मागे छोटे तळे बनवून त्यात मासे वाढवले जातात आणि दररोज स्टेपल फुड म्हणुन खाल्ले जातात. अगदी चतुर्थी, आषाढी, कार्तिकी, एकादशी, सोमवार, गुरुवार, शनिवार अश्या सर्ववारी मासे नित्यनेमाने प्रत्येक जेवणात खाल्ले जातात. माश्यांचे लोणचे बनवले जाते, सुकवले जातात, फर्मान्ट करून साठवले जातात आणि जेव्हा ताजे मासे नसतात तेव्हा जेवणात वापरले जातात. आम्हाला जे जेवण वाढलेलं होतं त्यातसुद्धा ताज्या माश्यांच्या डिशेशसोबतच लोणच्याच्या आणि फार्मांटेड माश्यांच्या एकदोन डिशेश होत्या. फार्मांटेड डिशेशचा वास इतका भयानक होता कि विचारता सोय नाही पण चवीला मात्र एक नंबर !
2/1




MR

@Iasvarshathakur Congratulations and all the best!
English
















