श्रीशंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी विचारांनी अखंड प्रेरणा देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!
“वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे,
पक्षी ही सुस्वरें आळविती…”
निसर्गाशी असलेलं आपलं नातं हे केवळ गरजेचं नाही, तर जिव्हाळ्याचं आहे.
आजच्या या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण सर्वांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचा ठाम संकल्प करूया.
ओम साई मित्र मंडळ आयोजित “ASPL 2026” अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व ४ ची सांगता नगरसेविका सौ. हर्षला आशीष मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडली.
विजेता व उपविजेता संघांचा सन्मान करण्यात आला.
युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरत आहेत.
ओम साई मित्र मंडळ आयोजित “ASPL 2026” अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व ४ चे उद्घाटन नगरसेविका सौ. हर्षला आशीष मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. खेळाडूंना शुभेच्छा देत आयोजकांचे अभिनंदन!
शुभदिन नवचैतन्याचा, आनंद आणि सुख-समृद्धीचा! 🌼✨
अक्षय्य तृतीयेच्या पावन निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
ही मंगल तिथी आपल्या जीवनात अखंड भरभराट, यश आणि समाधान घेऊन येवो, हीच सदिच्छा.
१८ एप्रिल २०२६ रोजी वर्सोवा नाना-नानी पार्क परिसराची कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पावर पाहणी
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व हरित पट्ट्यावर परिणामाची शक्यता
पुलाच्या सावलीमुळे जैवविविधतेला धोका
EIA पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्प येथे नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांनी विविध कार्यक्रमांना भेट देत उत्साहात भीमजयंती साजरी केली.
समता, न्याय व बंधुतेचा संदेश दृढ करण्याचा संकल्प व्यक्त.
काल १३ एप्रिल रोजी माटुंगा लेबर कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे उपस्थित. मध्यरात्री १२ वाजता जयंती जल्लोषात साजरी—समता, न्याय व बंधुतेचा संदेश दृढ. 💙
भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा संदेश देत त्यांनी दिलेली प्रेरणा आजही मार्गदर्शक आहे.
जय भीम! 💙
काल १२ एप्रिल माटुंगा लेबर कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वसंध्येला भव्य सजावटीचे उद्घाटन नगरसेविका हर्षला मोरे यांच्या हस्ते पार पडले. त्यांच्या विचारांना अभिवादन करत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दृढ करण्याचा संकल्प.
भारतीय संगीताची अढळ ध्रुवतारा आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद. त्यांच्या सुरेल आवाजाने पिढ्यान्पिढ्या मंत्रमुग्ध केलं. त्या नसल्या तरी त्यांची गाणी सदैव जिवंत राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
UPSC, MPSC, NDA, CDS व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सत्र उद्या रविवार १२ एप्रिल २०२६,सायं. ४.३०–६.३०, भीमयान बुद्ध विहार, बी वॉर्ड, आंबेडकर गार्डन, माटुंगा लेबर कॅम्प येथे.
प्रा. संजय मोरे सरांकडून दिशा, अभ्यास नियोजन व संधींबाबत मार्गदर्शन.
इस्टर संडे निमित्त माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील चर्चमध्ये भेट देऊन नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांना अभिवादन केले. ख्रिस्ती बांधवांसोबत हा पवित्र सण उत्साहात साजरा करत प्रेम, शांतता आणि ऐक्याचा संदेश दिला.
पुनरुत्थान, आशा आणि नव्या सुरुवातींचा संदेश देणाऱ्या इस्टर संडे निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.
या पवित्र दिवशी प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश नांदो हीच प्रार्थना.
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩
त्यांचा पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा सदैव मार्गदर्शक राहील. 🙏
।। जय श्रीराम ।।
।। जय हनुमान ।। 🚩
हनुमान जयंती निमित्त प्रभागातील विविध ठिकाणी नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांनी पूजांना उपस्थित राहून श्री मारुतीरायाचे दर्शन घेतले.
सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏
अहिंसा, सत्य, संयम व करुणेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांतून मानवतेचा मार्ग उजळतो आणि शांतता, सहअस्तित्व व दयेची प्रेरणा मिळते. 🙏