
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे आयोजित “पथ – २०२६” अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा दि. २३ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा. सह व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील, श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा व श्री. राजेश निघोट यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रम श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अशोक भालकर (मुख्य अभियंता), श्री. विनोद बोद्रे (महा व्यवस्थापक – प्रशासन) व श्री. राहुल वसईकर (अधीक्षक अभियंता) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकात्मता, संघभावना आणि कौशल्यविकास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कर्मचारीवर्गास आपल्या सांस्कृतिक व क्रीडा गुणांचे सादरीकरण करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
The inauguration ceremony of cultural programs and sports competitions under “Path – 2026”, organized by the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC), is being held in an enthusiastic atmosphere from 23rd to 25th April 2026.
The ceremony was inaugurated by the Vice Chairman and Managing Director, Mr. Anilkumar Gaikwad. The event was graced by the presence of Co-Managing Directors Mr. Rajesh Patil, Mr. Lakshminarayan Mishra, and Mr. Rajesh Nighot.
The program was held at the Shree Shiv Chhatrapati Sports Complex, Mahalunge-Balewadi, Pune, on Thursday, 23rd April 2026 at 4:00 PM. Mr. Ashok Bhalkar (Chief Engineer), Mr. Vinod Bodre (General Manager – Administration), and Mr. Rahul Vasaikar (Superintending Engineer) extended valuable support for the successful organization of the event.
This initiative has been organized with the aim of fostering unity, team spirit, and skill development among officers and employees. It has also provided an excellent platform for employees to showcase their cultural and sporting talents.
#MSRDC #Path2026 #TeamSpirit #EmployeeEngagement




MR





















