Navi Mumbai Municipal Corporation

8.7K posts

Navi Mumbai Municipal Corporation banner
Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation

@NMMConline

This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline Instagram: nmmconline

Navi Mumbai Katılım Ocak 2014
61 Takip Edilen31.2K Takipçiler
Navi Mumbai Municipal Corporation
‘नमस्ते दिवस’ म्हणजे स्वच्छताकर्मींच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी - महापौर श्रीम.सुजाता पाटील सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1D7gDx… #nmmcmayor #nmmcdymayor #nmmccommissioner #nmmcsolidwastemanagementdepartment #safaimitra #safaimitrasuraksha #namaste #namastedin #namasteday #nationalactionformechanisedsanitationecosystem @SwachSurvekshan @SwachhBharatGov @sbmvns @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
2
0
3
778
Navi Mumbai Municipal Corporation
🦺 Honouring those who keep Navi Mumbai clean. On the occasion of NAMASTE Day, Navi Mumbai Municipal Corporation organized a PPE Kit Distribution Programme for Safai Mitras, Safai Sakhis and Swachhata Karmis. The initiative reflects NMMC's commitment to the safety, dignity and well-being of our sanitation workforce, whose dedication keeps the city clean, safe and healthy. (NAMASTE Day, PPE Kit Distribution, Safai Mitra, Safai Sakhi, Swachhata Karmi, Sanitation Workers, Worker Safety, PPE Kit, NMMC, Navi Mumbai, Occupational Safety, Public Health) #NAMASTEDay #NMMC #NaviMumbai #PPEDistribution #PPEKit #SafaiMitra #SafaiSakhi #SwachhataKarmi #SanitationWorkers #WorkerSafety #OccupationalSafety #WorkerWelfare #PublicHealth #CleanNaviMumbai #SwachhBharat
English
0
0
0
799
Navi Mumbai Municipal Corporation
🩺 स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या हातांची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. NAMASTE Day निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. दररोज शहर स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वच्छता योद्ध्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक बनते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे स्वच्छ आणि निरोगी नवी मुंबईच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. (NAMASTE Day, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता कर्मचारी, सफाई मित्र, NMMC, Navi Mumbai, Sanitation Workers, Health Camp, Preventive Healthcare, Worker Welfare, Public Health, Occupational Health, Swachh Bharat, Municipal Corporation) #NAMASTEDay #NMMC #NaviMumbai #HealthCamp #SafaiMitra #SanitationWorkers #SwachhataWarriors #WorkerWelfare #PreventiveHealthcare #PublicHealth #OccupationalHealth #SwachhBharat #HealthyWorkers #HealthyCity #GarbageFreeCity #SwachhSurvekshan #CitizenFirst #MunicipalCorporation #SafeCity #HealthyNaviMumbai
MR
0
0
3
844
Navi Mumbai Municipal Corporation
🙏 त्यांच्या श्रमांमुळेच आपलं शहर स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी राहते. पहाटेपासून रात्र होईपर्यंत आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. या NAMASTE Day निमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान करूया आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारीही पार पाडूया. आपण काय करू शकतो? 🗑️ कचरा नेहमी कचरापेटीत टाका. ♻️ ओला आणि सुका कचरा वेगळा करा. 🚫 प्लास्टिकचा वापर कमी करा आणि पर्यावरणाची काळजी घ्या. 🙏 स्वच्छता कर्मचाऱ्यांशी आदराने आणि नम्रतेने वागा. 📞 परिसरात स्वच्छतेसंदर्भातील समस्या आढळल्यास त्वरित महानगरपालिकेला कळवा. एक छोटं धन्यवाद... त्यांच्या मेहनतीचं मोठं प्रेरणास्थान ठरू शकतं! (NAMASTE Day, Sanitation Workers, Swachhata Warriors, Respect Sanitation Workers, Clean Navi Mumbai, NMMC, Waste Segregation, Waste Management, Swachh Bharat Mission, Citizen Responsibility, Public Health, Environmental Awareness, Clean City, Sanitation Awareness) #NAMASTEDay #NMMC #NaviMumbai #SwachhataWarriors #SanitationWorkers #RespectSanitationWorkers #CleanNaviMumbai #WasteManagement #WasteSegregation #SwachhBharat #PublicHealth #CitizenResponsibility #EnvironmentalAwareness #GarbageFreeCity #SwachhSurvekshan #CleanIndia #MyCityMyResponsibility #SustainableCity #ZeroWaste #CommunityParticipation
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
2
4
1.2K
Navi Mumbai Municipal Corporation
रस्ते सुधारणा, मॅनहोलची झाकणे, स्वच्छता, विद्युत अशा विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1EaK9Q…
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
2
1
8
3.1K
Navi Mumbai Municipal Corporation
🧹 स्वच्छता म्हणजे फक्त रस्ते झाडणे नाही... ती आपल्या शहराच्या आरोग्याची जबाबदारी आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम केवळ झाडू मारण्यापुरते मर्यादित नसते. ते कचरा व्यवस्थापन, गटारांची स्वच्छता, वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपले शहर स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी राहते. या NAMASTE Day निमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान करूया आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारीही पार पाडूया. ✔️ कचरा योग्य ठिकाणी टाका. ✔️ ओला आणि सुका कचरा वेगळा करा. ✔️ स्वच्छता कर्मचाऱ्यांशी आदराने वागा. एक छोटं धन्यवाद... त्यांच्या मोठ्या योगदानाची खरी दखल! (NAMASTE Day, Sanitation Workers, Sanitation Awareness, Waste Management, Scientific Waste Disposal, Drain Cleaning, Public Health, Environmental Protection, Clean Navi Mumbai, NMMC, Swachh Bharat Mission, Citizen Awareness, Respect Sanitation Workers, Solid Waste Management) #NAMASTEDay #NMMC #NaviMumbai #SanitationWorkers #WasteManagement #SwachhBharat #CleanNaviMumbai #PublicHealth #EnvironmentalProtection #SolidWasteManagement #CitizenAwareness #RespectSanitationWorkers #SwachhSurvekshan #GarbageFreeCity #SustainableCity #CleanIndia #WasteSegregation #ZeroWaste #UrbanSanitation #MyCityMyResponsibility
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
1
0
1
1.6K
Navi Mumbai Municipal Corporation
पाऊस केवळ ऋतू नाही… तो भविष्यातील जलसमृद्धीची संधी आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून भूजल पुनर्भरणास चालना देणे, ही काळाची गरज आहे. ‘कॅच द रेन’ अभियानाच्या माध्यमातून वर्षाजल संकलनाचा संकल्प करूया आणि पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून जलसुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत नवी मुंबई घडविण्यास हातभार लावूया. ( जलसंवर्धन, वर्षाजल संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण, पाणी बचत, जलसुरक्षा, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, कॅच द रेन अभियान, स्वच्छ नवी मुंबई, नागरिक जनजागृती, Water Conservation, Rainwater Harvesting, Groundwater Recharge, Save Water, Sustainable Development, Environmental Protection, NMMC, Navi Mumbai ) #CatchTheRain #NMMC #नवीमुंबई #नवीमुंबईमहानगरपालिका #जलसंवर्धन #पाणीबचत #RainwaterHarvesting #SaveWater #GroundwaterRecharge #WaterConservation #SwachhNaviMumbai #CitizenAwareness #SustainableDevelopment #EveryDropCounts
MR
4
2
5
2.9K
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबईकरांनो, ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात BLO (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) आपल्या घरी येत आहेत. "मतदार यादींची विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६" मोहिमेतर्गत त्यांच्याकडील गणनापत्रात तुमची योग्य माहिती भरा आणि ते फॉर्म त्यांच्याकडे जमा करा. प्रत्येक मतदारासाठी SIR मॅपिंग अनिवार्य आहे.
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
13
3
17
5.3K
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात एनएमएमटी बससेवेच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होत असलेल्या 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर श्रीम. सुजाता पाटील व उपमहापौर श्री दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत घणसोली आगारात संपन्न झाले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती श्री अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती श्री विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती श्री रविकांत पाटील, प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. ललिता मढवी आणि इतर नगरसेवक, परिवहन समिती सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणपूरक, आधुनिक व प्रवासी सुविधांनी सुसज्ज अशा सीएनजी बसेसचा समावेश एनएमएमटीच्या ताफ्यात झाल्यामुळे परिवहन उपक्रमामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवासी सेवेत मोठी भर पडणार आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 416 बसेस कार्यरत आहेत. उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने एकूण 150 सीएनजी बसेस समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 65 बसेस उपक्रमास प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 85 बसेस नजीकच्या कालावधीत उपक्रमास प्राप्त होणार आहेत. लोकार्पण समारंभप्रसंगी 51 सीएनजी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी नव्या सीएनजी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे याचाही विशेष उल्लेख त्यांनी केला. नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४०० महिलांना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत बसचालक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले, ज्या माध्यमातून एनएमएमटी बसेस चालवण्यासाठी आगामी काळात महिला बस चालक उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकरांना एनएमएमटी मार्फत चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. परिवहन समितीचे सभापती श्री. विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रमाच्या प्रगतीसाठी व उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध निर्णयांची माहिती देत परिवहनच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी परिवहन उपक्रमाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व परिवहन समिती सदस्य तसेच परिवहन व्यवस्थापक श्री उमाकांत जंगले, मुख्या लेखा व वित्त अधिकारी श्री तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता श्री.विवेक अचलकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #NMMT #nmmtbus #cngbuses #ecofriendlyCNGbuses
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
8
2
30
7.4K
Navi Mumbai Municipal Corporation
💧 या पावसाळ्यात प्रत्येक थेंब जपूया... उद्याचं पाणी आजच साठवूया! पाऊस हा केवळ ऋतू नाही, तर जलसंपत्ती जपण्याची संधी आहे. 'कॅच द रेन' अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने पावसाचे पाणी साठवण्याचा संकल्प करूया. आपण काय करू शकतो? 📷 घर, सोसायटी आणि कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा अवलंब करा. 📷 विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करा. 📷 अधिकाधिक वृक्षारोपण करून भूजल पातळी वाढविण्यास हातभार लावा. आज केलेले जलसंवर्धन उद्याच्या पाणी सुरक्षिततेची हमी ठरू शकते. (Catch the Rain, Rain Water Harvesting, Water Conservation, Jal Sanvardhan, Rainwater Recharge, Groundwater Recharge, Water Security, Sustainable Water Management, Navi Mumbai, NMMC, Monsoon Water Conservation, Save Water, Water Harvesting, Climate Resilience, Environment Protection) #CatchTheRain #RainWaterHarvesting #WaterConservation #SaveWater #JalSanvardhan #GroundwaterRecharge #WaterSecurity #NMMC #NaviMumbai #Monsoon #SustainableLiving #ClimateAction #Environment #EveryDropCounts #WaterManagement #Rainwater #GreenNaviMumbai #PublicAwareness #HarGharJal #WaterForFuture @SwachSurvekshan @MoHUA_India @mygovindia
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
8
1
1
3.3K
Navi Mumbai Municipal Corporation
'SIR 2026' मोहिमेतर्गत तुमच्या घरी येणाऱ्या BLO अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करा. तुमच्या माहितीची अचूक पडताळणी करण्यासाठी महापालिकेने दिलेली ही मार्गदर्शिका नक्की पाळा. फॉर्म भरून झाल्यावर, एक भरलेली प्रत तुमच्या BLO अधिकाऱ्यांकडे जमा करा आणि दुसरी प्रत तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
16
2
3
2.8K
Navi Mumbai Municipal Corporation
पावसाळ्याच्या दिवसांत ओलावा आणि पाणी साचल्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका खूप जास्त असतो. अशा वेळी ओल्या हाताने कोणत्याही इलेक्ट्रिक स्विचला स्पर्श करू नका. सतर्क राहा, सुरक्षित राहा! #ElectricalSafety #MonsoonSafety #PublicSafety #NMMC #NaviMumbai
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
5
2
2
3.4K
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1ERprc… #nmmchealthdepartment #malaria #malariaprevention #malariaawareness #dengue #dengueprevention #dengueawareness @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
2
0
3
3K