Pratibha Dhanorkar

1.4K posts

Pratibha Dhanorkar banner
Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar

@PSDhanorkar

Member of Parliament. 13, Chandrapur-Wani-Arni Constituency

Maharashtra Katılım Mayıs 2020
41 Takip Edilen4.4K Takipçiler
Pratibha Dhanorkar retweetledi
Satej (Bunty) D. Patil
कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेसला नवे बळ, जिल्ह्यात ‘संघटन सृजन अभियानाला सुरवात काँग्रेस पक्षाकडून 13 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ जिल्ह्याभरात राबवला जात आहे. आजच्या पहिल्या दिवशी आदरणीय खासदार @ShahuChhatrpati खासदार @PSDhanorkar केंद्रीय निरीक्षक @JSPathak_INC जी, राष्ट्रीय सचिव @sachin_inc @ruturajdyp यांच्यासह कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपस्थित राहीलो. कार्यक्रमादरम्यान संवाद सत्र आणि आढावा बैठक पार पडली. येत्या काळातील संघटनात्मक ध्येयधोरणे, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावळे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, निरिक्षक सुनील मालके, राहुल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, नगरसेवक नगरसेवक राहुल माने, प्रवीण केसरकर, संजय मोहीते, सुभाष बुचडे, सचिन शेंडे, प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, अॅड. तौफिक मुल्लाणी, इचलकरंजी शहराध्यक्ष संजय कांबळे, भारती पवार, वेदवती मोहीते, विनायक घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, एनएसयुआयचे अक्षय शेळके, उदय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार, 13 एप्रिल, 2026 स्थळ- काँग्रेस कमिटी, कोल्हापूर
Satej (Bunty) D. Patil tweet mediaSatej (Bunty) D. Patil tweet mediaSatej (Bunty) D. Patil tweet mediaSatej (Bunty) D. Patil tweet media
MR
0
45
355
5.8K
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
📍 कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी आयोजित पत्रकार परिषद कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी आयोजित पत्रकार परिषद उपस्थित राहून प्रसारमाध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरली. जनसेवेचा हा वारसा असाच अविरतपणे पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (A.I.C.C.) निरीक्षक जयशंकर पाठक, AICC नॅशनल सेक्रेटरी श्री सचिन सावंत , कोल्हापूर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार, विधानपरिषद कोल्हापूर तथा जिल्हा काँग्रेस कमिटी (D.C.C.) अध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, कोल्हापूर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष श्री. सचिन प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक कोल्हापूर तथा विरोधी पक्षनेते (महानगरपालिका) राजेश भरत लाटकर, एम.पी.सी.सी. अध्यक्ष (सोशल मीडिया) पृथ्वीराज पाटील आणि माजी आमदार (कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ) ऋतुराज संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. @ShahuChhatrpati @JSPathak_INC @satejp @sachin_inc @ruturajdyp #MediaConference #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur #kolhapur
Pratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet media
MR
0
0
5
65
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना १३५व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #DrBabasahebAmbedkar #जयभीम #BRAmbedkar
MR
1
0
8
76
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना १३५व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. समता व सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती करून त्यांनी आपल्या देशाच्या लोकशाहीला नवा आयाम दिला. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल संपूर्ण देश कायमच ऋणी राहील. #DrBabasahebAmbedkar #जयभीम #PratibhaDhanorkar
Pratibha Dhanorkar tweet media
MR
0
0
6
57
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
भावपूर्ण श्रद्धांजली! ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शास्त्रीय संगीतापासून ते सुगम संगीतापर्यंत आणि ठुमरीपासून ते पॉप म्युझिकपर्यंत आपल्या जादुई आवाजाने त्यांनी सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. आशाताई सदैव आपल्या स्मरणात राहतील. #AshaBhosale #Ashatai #omshanti
Pratibha Dhanorkar tweet media
MR
0
0
2
91
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
वाढदिवस अभिष्टचिंतन! माजी गृहराज्यमंत्री तथा विधान परिषद आमदार मा. श्री. सतेज पाटील आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपले जनसेवेचे कार्य असेच अखंड सुरू राहो. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,अशी मंगल कामना! @satejp #SatejPatil #PratibhaDhanorkar #Congress#Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet media
MR
1
0
20
607
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
महाराष्ट्राच्या मातीला समतेचा आणि क्रांतीचा विचार देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी केवळ शोषितांना न्याय दिला नाही, तर 'गुलामगिरी' आणि 'शेतकऱ्यांचा आसूड' यांसारख्या साहित्यातून प्रस्थापित अन्यायकारक व्यवस्थेवर प्रहार केला. बहुजन आणि शेतकरी वर्गाचे आधारस्तंभ असलेल्या या महान क्रांतीसूर्याला कोटी-कोटी प्रणाम! #MahatmaJyotibaPhule #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet media
MR
1
4
22
235
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
भारताच्या कृषी इतिहासातील एक सुवर्णपान म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख! केवळ भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून नव्हे, तर जागतिक स्तरावर भारतीय शेतीची मान उंचावणारे ते एक महान द्रष्टे नेते होते. त्यांनी इ.स १९५९ मध्ये दिल्लीत 'जागतिक कृषी प्रदर्शन' भरवून भारतीय शेतीची महती जगाला दाखवून दिली. जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत देश समृद्ध होऊ शकत नाही आणि म्हणूनच ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाकडे आपुलकीने बघत असत. अशा या कृषिरत्नाच्या महान कार्याला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
Pratibha Dhanorkar tweet media
MR
0
0
7
61
Pratibha Dhanorkar retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
चंद्रपूर - वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील "संघटन सृजन अभियान" अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात 'संघटन सृजन अभियान' हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक संतोष कोलकोंडा, खासदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेड आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते.
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
MR
1
8
26
421
Pratibha Dhanorkar retweetledi
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
चंद्रपूर - वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील "संघटन सृजन अभियान" अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात 'संघटन सृजन अभियान' हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक संतोष कोलकोंडा, खासदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेड आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते.
Harshwardhan Sapkal tweet mediaHarshwardhan Sapkal tweet mediaHarshwardhan Sapkal tweet mediaHarshwardhan Sapkal tweet media
MR
0
5
25
458
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
एन.एस.यू.आय. स्थापना दिन..! भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना, 'भारतीय राष्ट्रीय छात्र संघ' (NSUI) च्या स्थापना दिनानिमित्त सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांना आणि तरुण मित्रांना हार्दिक शुभेच्छा! ​दिनांक ९ एप्रिल १९७१ रोजी, विद्यार्थी शक्तीला एक विधायक दिशा देण्यासाठी आदरणीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली NSUI ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ही संघटना "लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समता" या मूल्यांची जोपासना करत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करत आहे. @nsui @INCIndia #NSUI #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet media
MR
1
1
6
93
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
माझा मुलगा मानस बाळूभाऊ धानोरकर याचा आज जन्मदिवस ! ​वडिलांनी शिकवलेली मूल्ये आणि त्यांची तत्त्वे आज तुझ्या वागण्यातून आणि कामातून स्पष्टपणे दिसून येतात. बाळूभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्याच विचारांना प्रमाण मानून तू आज मित्रपरिवार आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जी धडपड करतोयस, ते पाहून समाधान वाटते. सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची तुझी ही वृत्ती आणि नेतृत्व करण्याची पद्धत बाळूभाऊंच्या संस्कारांचीच साक्ष देते. ​तुझ्या कर्तृत्वाचा हा आलेख असाच उंचावत राहो आणि तुझ्या आयुष्यात सुख-समृद्धीचे तेज कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! मानस तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! ​#ManasDhanorkar #PratibhaDhanorkar #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet media
MR
5
2
56
2K
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
📍चंद्रपूर | संघटन सृजन अभियान! वरोरा (भद्रावती) विधानसभा क्षेत्रातील 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत आयोजित कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. वरोरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी संघटनात्मक बांधणी ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. काँग्रेस पक्षाची जनहितकारी ध्येयधोरणे आणि प्रगत विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी एआयसीसी निरीक्षक संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभयजी छाजेड आणि जिल्हाध्यक्ष सुभाषजी धोटे तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, येणाऱ्या काळात जनसेवेचा हा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. @INCIndia @INCMaharashtra #संघटनसृजनअभियान #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet media
MR
0
1
10
139
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
📍चंद्रपूर | संघटन सृजन अभियान..! बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत आयोजित भव्य कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी एआयसीसी निरीक्षक आदरणीय संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष आदरणीय अभयजी छाजेड आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाषजी धोटे हे उपस्थित होते. ​या बैठकीत मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर ब्लॉक मधील पक्ष संघटनेची सद्यस्थिती आणि आगामी निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व मान्यवर पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही संघटनात्मक बांधणी अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला. @INCMaharashtra @INCIndia ​#संघटनसृजनअभियान #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet media
MR
0
5
13
118
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
अभिष्टचिंतन...! महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदरणीय श्री. सुनीलजी केदार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. @SunilKedar1111 #SunilKedar #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
Pratibha Dhanorkar tweet media
MR
1
2
20
291
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
📍​चंद्रपूर संघटन सृजन अभियान ! चंद्रपूर येथे आयोजित 'संघटन सृजन अभियान' बैठकीस उपस्थित राहून आगामी पक्षकार्यावर व संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. ​यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) निरीक्षक श्री. संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभयजी छाजेड, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. सुभाषजी धोटे, ​ चंद्रपूर शहर काँग्रेस शहराध्यक्ष श्री. संतोषजी लहामगे, तसेच चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सविस्तर संवाद कार्यक्रम पार पडला. @INCMaharashtra @INCIndia #Congress #Chandrapur #PratibhaDhanorkar
Pratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet mediaPratibha Dhanorkar tweet media
MR
2
3
10
213
Pratibha Dhanorkar retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
चंद्रपूर काँग्रेसचा "संघटन सृजन अभियान" अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) निरीक्षक श्री. संतोष कोलकोंडा, खासदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, चंद्रपूर शहर काँग्रेस शहराध्यक्ष श्री. संतोष लहामगे, तसेच चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सविस्तर संवाद कार्यक्रम पार पडला.
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
MR
0
9
43
855
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar@PSDhanorkar·
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून माझ्या विनंतीची दखल घेत रेल्वे विभागाने नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसला वर्धा येथे अधिकृत थांबा मंजूर केला आहे. या निर्णयामुळे वर्धा व परिसरातील विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांची प्रवासाची मोठी अडचण आता दूर होणार असून त्यांचा प्रवास सुखकर होईल. यासह एलटीटी-बल्लारशाह एक्सप्रेसला शेगाव, पुणे-नागपूर एक्सप्रेसला उरुळी आणि संपर्क क्रांती एक्सप्रेसला उरुळी येथे थांबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार. ​माननीय रेल्वे मंत्री श्री @AshwiniVaishnaw जी आणि @RailMinIndia, प्रवाशांच्या भावनांचा सन्मान करून या मागण्यांची दखल घेतल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. ​#railway #Wardha #DurontoExpress #PratibhaDhanorkar
Pratibha Dhanorkar tweet media
MR
1
5
14
163