Rohit Pawar

25.7K posts

Rohit Pawar banner
Rohit Pawar

Rohit Pawar

@RRPSpeaks

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS

Maharashtra, India Katılım Kasım 2019
149 Takip Edilen778.8K Takipçiler
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
ही आहे सर्वसामान्य जनतेची भावना! #शक्ती_कायदा आता आणावाच लागेल…आता जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही ….
MR
0
5
17
314
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
पुण्यातील चाकण परिसरात 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांना धाकच राहिलेला दिसत नाही. गुन्हेगारांना धाक का राहिलेला नाही याचा राज्यकर्ते, सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेनं देखील विचार केला पाहिजे. सरकार अजून किती दिवस धृतराष्ट्राचे सोंग घेऊन वाढत्या गुन्हेगारीकडं दुर्लक्ष करणार आहे. त्यामुळे आता सरकारने तत्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलवून शक्ती कायदा पारित करावा.. शक्ती कायदा अमलात आणण्याची हीच ती योग्य वेळ आहे...! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
1
7
96
2.6K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
नसरापूरमध्ये अवघ्या ४ वर्षाच्या चिमुरडीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करुन तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनाला भेट दिली. आरोपीने केलेलं कृत्य हे केवळ एखादं पिसाळलेलं जनावरंच करु शकतं, त्यामुळं आंदोलकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. म्हणूनच या नराधमाला समाजात एक क्षणही जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्यासाठी सरकारने हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवण्याच्या मागणीचं आणि शक्ती कायदा तातडीने लागू करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी प्रशासनाला दिलं आणि नागरिकांच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा केली.. तसंच आम्ही सर्वजण पिडीत कुटुंबियांच्या सोबत असल्याचा विश्वासही यावेळी दिला.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
1
11
77
1.7K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
माझ्या मतदारसंघातील घोड कालव्याचं उन्हाळी आवर्तन सुरु असून सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळं अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि जनावरांसाठीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः बारडगाव सुद्रीक, ताजू, बेलवंडी, जलालपूर, सिद्धटेक या गावांतील शेतकऱ्यांकडून बंधारे आणि तलाव भरुन देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळं सध्याची तीव्र गरज लक्षात घेता घोड कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातून बंधारे आणि तलाव भरुन देण्याची मागणी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडं केली आहे. अपेक्षा आहे की ते यासंदर्भात योग्य निर्णय घेतील.
Rohit Pawar tweet media
MR
0
2
38
1.1K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना अत्यंत भयावह आहे. ही केस तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला कठोरात कठोर अशी फाशीचीच शिक्षा द्यावी, तरच अशा नराधमांना चाप बसेल. या नराधमाने याआधीही दोन तीन चिमुकलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. दर आठवड्यात अशी एकतरी दुर्दैवी घटना समोर येत असून आज राज्यात चिमुकल्या देखील सुरक्षित नाहीत. 2025 मध्ये राज्यात 8643 म्हणजेच दिवसाला 24 तर दर तासाला बलात्काराची घटना घडली हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. या गुन्हेगारांना चाप बसवायचा असेल तर तत्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायला हवी. सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवून तत्काळ शक्ती कायदा लागू करावा, ही विनंती! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
0
26
182
7K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
जगप्रसिद्ध जलतरणपटू आणि भारताचा सुपुत्र आर्यन सिंग दाडियाला याने अखेर ४९ तास ४१ मिनिटे आणि ४ सेकंदात समुद्रातून सलग २१० कि. मी. अंतर पोहून पार करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे करत एक नवा इतिहास लिहिला. ‘कामाचा माणूस’ अशी ओळख असलेल्या अजितदादांना त्याने हे यश समर्पित केलं आहे. त्याने स्वीकारलेलं हे खडतर आव्हान म्हणजे मनाची, जिद्दीची, संयमाची आणि ताकदीची परिक्षा पाहणारं होतं आणि त्याने ते यशस्वीरित्या पूर्ण केलं याचा अभिमान वाटतो! त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.! भविष्यातही त्याने अशीच नेत्रदिपक कामगिरी करावी, यासाठी खूप खूप शुभेच्छा..!
MR
0
4
69
2.8K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
‘रयत’च्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये अद्ययावत अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी लॅब, फॅशन डिझाइनिंग, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरु करण्यात आलेल्या असून या विभागांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी प्रा. नगरकर सर, इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कर्जत-जामखेड परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना व्यवसायासाठी व नोकरीसाठी याचा विशेष लाभ होत असून भविष्यात अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ज्याचा व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा उपयोग होईल.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
1
3
48
1.2K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
‘रयत’च्या कर्जतमधील सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्यामंदिर या शाळेला शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५-२६ चं ‘कर्मवीर पारितोषिक’ जाहीर झालं असून याबद्दल प्राचार्या आणि शिक्षिका यांचं अभिनंदन केलं. भविष्यातही या शाळेसह इतर शाळाही अशीच नेत्रदिपक कामगिरी करुन शिक्षणाचा दर्जा उचावण्यासह ‘रयत’चा नावलौकिकही वाढवतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
1
3
32
786
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
कर्जत तालुक्यासह आजूबाजूच्या भागातूनही कर्जतमधील ‘रयत’च्या दादा पाटील महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षणासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयात २८० सीसीटीव्ही लावण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयाचा परिसर, ग्राऊंड आणि रस्त्याच्या भागाचाही समावेश आहे. यामुळं विद्यार्थ्यांना आणि विशेषतः विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी हे सीसीटीव्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सीसीटीव्हीचं लोकार्पण करुन पाहणी केली. यावेळी प्रा. नगरकर सर यांच्यासह इतर शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
0
1
24
749
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
महाराष्ट्रात होणारी मोठ्या इंफ्राप्रोजेक्टची बहुतांश कामे गुजरात, आंध्रप्रदेश यांसारख्या बाहेरील राज्यातील कंपन्यांनाच दिली जात असल्याची तसेच या कंपन्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या KickBack देखील देत असल्याची चर्चा आहे. विकास प्रकल्पांना विरोध नाही परंतु Cost Escalation करून बाहेरच्या मोठ्या कंत्राटदारांकडून हजारो कोटीची दलाली घेऊन कामे दिली जात असतील, त्यांची बिले वेळच्या वेळी काढली जात असतील आणि दुसरीकडे इथल्या छोट्या-मोठ्या स्थानिक मराठी कंत्राटदारांची बिले काढली जात नसतील तर बाहेरचे मोठे कंत्राटदार तुपाशी आणि इथले स्थानिक मराठी छोटे कंत्राटदार उपाशी ही सरकारची कार्यपद्धती योग्य नाही. आज उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम करणारी ‘नवयुग ग्रुप’ ही कंपनी हैदराबादची असून आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी TDP पक्षाच्या नेत्यांच्या अत्यंत जवळची कंपनी मानली जाते. #VSR कंपनीच्या ताफ्यातले VT-CMR हे विमान देखील याच कंपनीचे असल्याचे सांगितले जाते. हा योगायोग म्हणावा की वेगळे काही? #CostEscalation #KickbackPolitics #Infrastructure #MissingLinkProject #Accountability
MR
34
56
403
14.2K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून अजितदादांनी अनेक वर्षे अत्यंत सक्षमपणे काम केलं. त्यांच्याच स्मरणार्थ कर्जत-जामखेड तालुक्यातील ‘रयत’च्या १५ शाळांना ४० तर जि. प. च्या ११ शाळांना २१ कॉम्प्युटर आणि पिण्याच्या पाण्यासाठी जि. प. च्या ५ शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आलं. हे सर्व साहित्य ‘बारामती ॲग्रो’च्यावतीने देण्यात आलं. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात घेतलेल्या कार्यक्रमात हे साहित्य वितरित करण्यात आलं. संगणकामुळं विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्याची सोय होणार असून वॉटर फिल्टरमुळं पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय होणार आहे. यावेळी प्राचार्य नगरकर सरांसह सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
2
8
108
2.9K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
चार राज्यांचं मतदान संपताच केंद्र सरकारचं देशाला बंपर गिफ्ट…! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९३३ रुपयांची भरघोस वाढ..! आता ४ तारखेला निकाल लागल्यानंतर कदाचित अशाच प्रकारे अजून दुसरं एखादं सरकारी गिफ्ट मिळू शकतं…! moneycontrol.com/news/india/com…
Rohit Pawar tweet media
MR
20
43
321
4.8K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असता आणि तापमान ४२ अंशांच्याही वर गेलं असताना मतदारसंघात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ए.जी. फिडरवर सायंकाळी ६ ते १० दरम्यान वीज बंद केली जात असल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात महावितरणच्या कर्जत येथील कार्यालयापुढं कर्जत-जामखेडकर नागरिकांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाला जाब विचारला. सिंगल फेजसह शेतीसाठी थ्री फेज वीज पुरवठा अखंडीत होत नाही, जळालेले डीपी वेळेत बदलून मिळत नाहीत, कोटेशन भरूनही वीज कनेक्शन मिळत नाहीत, पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही, मागेल त्याला योजनेतील सोलरचं इन्स्टॉलेशन, देखभाल दुरस्तीच्या कामासाठी होत असलेला विलंब आणि चिलवडी व माही जळगाव उपकेंद्राचं प्रलंबित काम अशा अनेक अडचणी आहेत. यापैकी सायंकाळी ६ ते ९ यादरम्यान खंडीत केला जाणारा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं आश्वासन यावेळी अधीक्षक अभियंता श्री पवार यांनी दिलं. तसंच इतर प्रश्नही सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #वीजप्रश्न #loadshedding #महावितरण #कर्जतजामखेड #ठिय्याआंदोलन #ElectricityIssue
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
2
1
61
1.8K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
मतदारसंघातील सामान्य माणसाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कर्जत आणि जामखेड येथे प्रत्येकी १०० खाटांचे आणि मिरजगाव अशा तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये बांधण्यात आली असून त्यातील कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि तिथं उपचार घेणाऱ्या रुग्णांशीही संवाद साधला. येथील डॉक्टर आणि नर्स यांनी कोविडच्या काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले असून त्यांचं हे काम कायम स्मरणात राहील. या डॉक्टर आणि नर्स यांच्याशीही यावेळी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
2
6
61
1.4K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
कर्जतमध्ये देखणं आणि आकर्षक विश्रामगृह बांधण्यात आलं असून याचं काम अंतिम टप्पात आहे. या कामाची पाहणी करुन योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
5
10
196
7.7K