Vijaysinh Pandit

4.4K posts

Vijaysinh Pandit banner
Vijaysinh Pandit

Vijaysinh Pandit

@VijaysinhPandit

MLA, GEORAI

Katılım Kasım 2016
29 Takip Edilen9.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
कधीही न भरून निघणार नुकसान अजित दादा.. अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
MR
3
36
605
15.5K
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कृषीमंत्री मा. ना. दत्तात्रयजी भरणे मामा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! @bharanemamaNCP
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
2
36
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गेवराई येथे विनम्र अभिवादन... लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठ विचार आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज मोंढा नाका, गेवराई येथे त्यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व, त्यांची जनकल्याणाची दृष्टी, न्यायप्रिय प्रशासन आणि सर्वसमावेशक विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, समाजहितासाठी कार्यरत राहणे हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल. या प्रसंगी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराचा सहृदय स्वीकार केला. यावेळी जय भवानी कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी जि.प. सदस्य जालिंदर पिसाळ, फुलचंद बोरकर, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, विनोद सौंदरमल, नगरसेवक शेख खाजा मामू, दादासाहेब घोडके, माजी नगरसेवक शांतीलाल पिसाळ, राधेशाम येवले, विजय सुतार, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, बाजार समितीचे माजी उपसभापती सचिन मोटे, अरुण चाळक, गजानन काळे, दिलीप गंगवाल, पाराजी मोटे, रवी पवार, संदीप मडके, कैलास निकम, उत्तम सोलाणे, मधुकर बारगजे, करण सुतार, शेख हाशम, गजानन पिसाळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
1
2
4
132
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... भारतीय इतिहासातील लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि स्त्रीशक्तीचे तेजस्वी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज बीडच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या समवेत त्यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजहित, जनकल्याण, धर्मस्थळांचे जतन आणि न्यायपूर्ण प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली ठरेल. या प्रसंगी जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजसेवेचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी कार्यातूनच महापुरुषांच्या विचारांना खरे अभिवादन होते. यावेळी माजी आमदार उषाताई दराडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती आरती रंजीत बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे, परशुराम गुरुकुदे, पंचायत समिती सभापती बळीराम आप्पा गवते, पंचायत समिती सदस्य मोहन देवकते, नगरसेवक महेश धांडे, नगरसेवक मनोज गोडसे, नगरसेवक प्रमोद शिंदे, मीनाक्षीताई देवकते, विजय चांदणे, महेश राऊत, राहुल शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
1
2
7
400
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
अभिष्टचिंतन... #ऊर्जास्रोत
Vijaysinh Pandit tweet media
हिन्दी
3
1
12
113
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी विचारांची तेजस्वी परंपरा लाभलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! न्याय, धर्म, सेवा आणि सुशासनाचा आदर्श घालून देणाऱ्या अहिल्यादेवींनी जनकल्याणालाच राजकारभाराचे ध्येय मानले. त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
4
304
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
आज बीड येथील लोकप्रिय सायं. दै. ‘रिपोर्टर’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून संपादक श्री. शेख तय्यब, कार्यकारी संपादक श्री. गणेश सावंत आणि रिपोर्टर परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, गटनेते फारूकभाई पटेल, नगरसेवक शेख निजाम, दिनेश मुंदडा, ज्येष्ठ नगरसेवक जयततुल्ला खान, सादेक अली, रणजित बनसोडे, जकी सौदागर, मनोज गोडसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
2
90
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
मराठा समाजाच्या सर्वसमावेशक मागण्यांच्या संदर्भात, विशेष करून समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वात वेळोवेळी झालेल्या आंदोलनात 'शिवछत्र' परिवार सातत्याने सक्रियपणे सहभागी झालेला आहे. आज पुन्हा एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता ते उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मौजे आंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी जाऊन बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य, माजी मंत्री माननीय श्री. शिवाजीराव दादा पंडित यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
Vijaysinh Pandit tweet media
MR
1
12
59
2.8K
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
सोनारी येथे कुलदैवत श्री कालभैरवनाथ आणि तुळजापूर येथे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी यांचे सहकुटुंब अत्यंत भावपूर्ण दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात नतमस्तक होताना मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मिक शांती मिळाली. या मांगल्याच्या क्षणी आई तुळजाभवानी आणि कालभैरवनाथांच्या चरणी लीन होऊन, आपल्या सर्वांच्या सुखासाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या अखंड प्रगतीसाठी साकडे घातले. कुटुंबासमवेत मिळालेले हे दर्शन आणि ईश्वराचा आशीर्वाद, जनसेवेचा वसा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी नेहमीच नवी प्रेरणा देतो. जनतेचे प्रेम आणि ईश्वरी कृपा अशीच आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना..!
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
0
0
14
327
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
|| राम कृष्ण हरी || धाकटी पंढरी म्हणून नावारूपास असलेल्या परमपवित्र श्रीक्षेत्र नारायणगड येथे आज भक्तीचा अनोखा संगम अनुभवता आला. अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त महंत श्री शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित 'जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह' अत्यंत दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात महंत श्री प्रकाश महाराज बोधले यांच्या अमृततुल्य अशा काल्याच्या कीर्तनाचे श्रवण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून श्री नगद नारायण महाराजांच्या चरणी लीन होत दर्शन व उपस्थित संतांचे शुभाशीर्वाद घेण्याचे सद्भाग्य लाभले. याप्रसंगी संवाद साधताना, नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वैभवासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही सर्व भाविकांसमक्ष दिली. पोखरी ते नवगण राजुरी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, हा रस्ते विकासाचा प्रलंबित प्रश्न लवकरच पूर्णत्वास नेला जाईल. तसेच, गडाच्या विकासासंदर्भात महंत श्री शिवाजी महाराज जे काही दिशादर्शक विचार मांडतील, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासन दरबारी खंबीरपणे पाठपुरावा केला जाईल, असा ठाम विश्वासही याप्रसंगी व्यक्त केला. या मंगल समयी महंत श्री शिवाजी महाराज व महंत श्री प्रकाश महाराज बोधले यांचा सन्मान करण्याचे परमभाग्य लाभले. तसेच, श्री नारायण गड संस्थांच्या वतीने जो आदरपूर्ण सत्कार व सन्मान करण्यात आला, त्याबद्दल गड संस्थान आणि उपस्थित समस्त भाविक भक्तांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता!
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
0
0
4
66
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
अजितदादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प…! लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा बीड यांच्या वतीने आयोजित “अजित स्मृती व्याख्यानमाला” या उपक्रमाच्या चौथ्या पुष्प कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ व्याख्यानमाला नव्हती, तर जनसामान्यांच्या मनात आजही जिवंत असलेल्या अजितदादांच्या विचारांना, कार्यशैलीला आणि जनतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना अजितदादांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. विधानसभेत प्रथमच पोहोचल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली आणि अल्पावधीतच लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले. सभागृहातील अभ्यासपूर्ण मांडणी, निर्णयक्षम नेतृत्व, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता ही माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. पुढील अनेक वर्षे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा होती पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला आणि माझ्या राजकीय प्रवासातील एक मार्गदर्शक गुरु काळाच्या पडद्याआड गेले. आजही त्यांची आठवण मनाला अस्वस्थ करून जाते. राज्याच्या राजकारणात अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा घडणे कठीण आहे; कारण अशा व्यक्तिमत्त्वांना घडण्यासाठी अनेक दशके लागतात. मात्र त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता आपली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाला बळ देत अजितदादांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यांच्या स्मृती केवळ आठवणीत नाहीत, तर आमच्या कार्यातून सदैव जिवंत राहतील. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक मा. श्री. मोईन मास्टर, प्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल बारकुल, धर्मादाय वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राम औटे, संपादक श्री. राजेंद्र होळकर, समाजसेवक श्री. जावेद कुरेशी, अग्रोइनपुट डीलर असो. चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मनमोहन कलंत्री, संपादक श्री. शेख तय्यब, उपअभियंता श्री. महेंद्र निकम, समाजसेविका श्रीमती मंदाकिनी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्व. अजितदादा… तुमचं मार्गदर्शन, तुमचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम सदैव प्रेरणा देत राहील…!
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
1
1
5
103
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
स्व. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाला आज चार महिने पूर्ण होत आहेत. काळ वेगाने पुढे सरकत असला आणि वास्तव स्वीकारले असले तरी, दादांच्या आठवणींचा प्रखर उजाळा आजही मनावर अगदी कालच्यासारखाच कोरलेला आहे. मतदारसंघातील दौरा असो, मंत्रालयातील कामे असोत किंवा जनतेशी निगडित कोणताही प्रश्न असो... जनसेवेच्या प्रत्येक प्रसंगी दादांच्या शिस्तबद्ध आणि धडाडीच्या 'कार्यप्रणालीची' प्रकर्षाने आठवण येते. लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळीने उभे राहणारा "कामाचा माणूस" अशी ओळख त्यांनी केवळ शब्दांतून नाही, तर आपल्या अखंड कृतीतून निर्माण केली होती. आज ते प्रत्यक्ष आपल्यात नसले तरी, समाजासाठी झोकून देऊन काम करण्याची त्यांची शिकवणच आम्हाला प्रत्येक पावलावर निरंतर काम करत राहण्याची प्रेरणा देत आहे. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर न थकता चालत राहणे आणि त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना आमची खरी श्रद्धांजली ठरेल. स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...! 💐 #AjitPawar
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
7
158
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
0
39
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
त्याग, समर्पण आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या ईद-उल-अजहा बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद घेऊन येवो याच सदिच्छा!
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
2
114
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
#अभिष्टचिंतन शिवछत्र परिवाराचे परमस्नेही, श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे माजी विश्वस्त तथा माजी आमदार श्री.जयवंतराव (भाऊ) जाधव यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा...💐
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
1
58
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
बाबासाहेबांच्या कार्यात अखंड साथ देणाऱ्या, असीम त्यागाचे प्रतीक मातोश्री रमाई यांच्या स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
1
5
66
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
1
1
59
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
बीड जिल्ह्याच्या पीक विमा प्रश्नावर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रलंबित नुकसान भरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईतून बीड जिल्हा वगळल्या बाबत, आज राज्याचे कृषीमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सप्टेंबर २०२५ मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार प्रतिहेक्टरी ८,५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. तसेच, रब्बी पेरणीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये व पीक विमाधारक शेतकऱ्यांना किमान १७,५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. या घोषणेनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात नुकसान भरपाईचे वाटप त्वरित व्हावे, यावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ​जुन्या पीक विमा योजनेतील महत्त्वाचे निकष (ट्रिगर्स) वगळण्यात आल्यामुळे, सन २०२५-२६ मधील पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे सन २०२६-२७ च्या पीक विमा योजनेत या जुन्या निकषांचा (ट्रिगर्स) समावेश करण्याची मागणी केली. ​तसेच, मौजे उमापूर महसूल मंडळातील १,५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पीक विमा हप्ता 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या उमापूर शाखेत जमा केला होता. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीमुळे त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही बँकेने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली नाही, या गंभीर प्रश्नावरही आज बैठकीत चर्चा करण्यात आली. मा. कृषीमंत्र्यांनी या विषयावर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत, कृषी संचालकांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ​या बैठकीला कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. @bharanemamaNCP @mahancpspeaks
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
0
0
2
115
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
कुशल प्रशासक, अमोघ वक्ते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
Vijaysinh Pandit tweet media
MR
0
0
0
85
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
आज बीड शहरातील भाजी मंडई परिसरात असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला भेट दिली. येथील निराधार बांधवांशी मनमोकळा संवाद साधताना काहींच्या डोळ्यात वेदना होत्या, तर काहींच्या चेहऱ्यावर आयुष्याशी सुरू असलेला संघर्ष दिसत होता. या प्रत्येकाची एकच अपेक्षा होती, "आम्हालाही हक्काचे घर आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, माणुसकीच्या नात्याने सर्वांनी आम्हाला आधार द्यावा," अशी भावनिक साद त्यांनी घातली. या बेघर आणि निराधारांना भविष्यात हक्काचे घर मिळवून देण्याचा शब्द आजच्या भेटीत दिला. यासाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासन मान्यतेकरिता पाठविण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून उद्यान, बेघर निवारा केंद्रासाठी रुग्णवाहिका व इतर मूलभूत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या. जिव्हाळा बेघर निवारा केंद्रासाठी हक्काचा निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष श्री. विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री. शेख मुजीब, सभापती श्री. शेख निजाम, नगरसेवक ॲड. महेश धांडे, श्री. शेख बिलाल, श्री. भिमराव वाघचौरे, श्री. मनोज गोडसे, श्री. भैय्यासाहेब मोरे, श्री. प्रमोद शिंदे, श्री. भास्कर जाधव, श्री. भागवत तावरे, श्री. शेख इकबाल, श्री. आनंद पवार यांच्यासह मुख्याधिकारी श्री. शैलेश फडसे व न. प. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
1
3
8
148
Vijaysinh Pandit
Vijaysinh Pandit@VijaysinhPandit·
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांनी बीड शहरातील विकासकामांसाठी, विशेषतः रस्त्यांच्या कामांना मोठा निधी मंजूर केला. या निधीतील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, ही बीड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह आमची जबाबदारी आहे. आज सकाळी शहरातील जालना रोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या २०० लक्ष रुपये किमतीच्या रस्ता व नाली बांधकामाची पाहणी करून हे काम दर्जेदार करण्याबाबतच्या सूचना दिल्या. शहरातील अनेक रस्ते खऱ्या अर्थाने वाहतुकीयोग्य राहिले नाहीत, लवकरच उर्वरित रस्त्यांचे दर्जेदार नूतनीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष श्री. विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री. शेख मुजीब, सभापती श्री. शेख निजाम, नगरसेवक ॲड. महेश धांडे, श्री. शेख बिलाल, श्री. भिमराव वाघचौरे, श्री. मनोज गोडसे, श्री. भैय्यासाहेब मोरे, श्री. प्रमोद शिंदे, श्री. भास्कर जाधव, श्री. शेख इकबाल, श्री. आनंद पवार यांच्यासह मुख्याधिकारी श्री. शैलेश फडसे व न. प. अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Vijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet mediaVijaysinh Pandit tweet media
MR
0
4
8
90