
विद्यार्थ्यांच्या हितासाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय!
आज मुंबईतील मंत्रालय येथे आयोजित महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ४६ व्या नियामक परिषदेची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांचे कार्यप्रदर्शन सुधारणे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर वाढवणे या विषयांचा सविस्तर चर्चा करण्यात आली.
उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांची सांगड घालून विद्यार्थ्यांना केवळ पदवीच नव्हे, तर जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विविध सुधारात्मक उपक्रमांना यावेळी मंजुरी दिली. राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि थेट रोजगाराभिमुख करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध असून, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, नियामक परिषदेचे सदस्य भरत अंमळकर यांच्यासह मंडळाचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍१९ मे २०२६ | मुंबई
#TechnicalEducation #SkillDevelopment #MSBTE #DigitalLearning #HigherEducation #तंत्रशिक्षण #महाराष्ट्रशासन #मुंबई
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra




MR




































