Dr. SHUBHAM DHOOT retweetledi
Dr. SHUBHAM DHOOT
538 posts

Dr. SHUBHAM DHOOT
@dhoot_dr
President : Swarajya Vaidyakiya Sangh (Maharashtra) 🇮🇳National Awardee for Individual Excellence & National Youth Awardee Govt.of India.
Pune Katılım Mayıs 2020
214 Takip Edilen82 Takipçiler

सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” मला प्राप्त झाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक क्षणांनी भरलेली बाब आहे.
या पुरस्काराने यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आणि लोकप्रतिनिधी गौरविण्यात आले आहेत. ज्यामध्ये बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. आबा पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा.रे.पाटील, भाऊसाहेब कुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चुभाऊ कडू, नीलमताई गोरे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, नितीनजी गडकरी, भारतीताई पवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. अशा दिग्गज नेत्यांच्या यादीत माझेही नाव जोडले जाणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
समाजवादी विचारांचे अध्वर्यू स्व. आमदार माधवराव लिमये यांचे आयुष्य हे जनतेसाठीच्या संघर्षाचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून पुढेही जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळत आहे.
हा सन्मान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा.ना. अॅड. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वीकारण्याचा योग आला, हीदेखील माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब आहे. नाशिक येथील प.सा. नाट्यमंदिर, टिळक पथ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा मिळाल्याने पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे,आमदार सीमाताई हिरे,महापौर हिमगौरी आडके,प्रा.दिलीपराव फडके,सुनील कुटे,संजय करंजकर,सुरेश गायधने,सचिन महाजन,शोभाताई नेरलिनार उपस्थित होते..!
हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक नसून धाराशिवच्या जनतेचा सन्मान आहे. ज्या शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवले, त्यांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या प्रेमाचा हा गौरव आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना त्या प्रत्येक नागरिकाचे ऋण मी मनापासून मान्य करतो. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या स्वप्नांना संसदेत आवाज देण्याचा माझा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.
या पुरस्कारातून मिळालेली प्रेरणा आणि जनतेचा विश्वास हेच माझ्या कामाची खरी ताकद आहे. या सन्मानाची प्रेरणा घेऊन धाराशिवच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी मी यापुढेही अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करत राहीन.
#OmrajeNimbalkar




MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात “रक्तामृत इन हिमोफिलिया” संशोधन व विकास या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचा माझ्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला..
हे शिबीर क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड, पुणे, सेफ पॅक इंडस्ट्रीज पुणे, मुकुंद माधव ट्रस्ट पुणे आणि इंटास फाउंडेशन यांच्या सहकार्याने तसेच डॉ. एन. एस. गंगासागरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा संशोधक डॉ. शुभम रामनारायण धूत यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आयोजित करण्यात आले आहे..
देशभरातील हिमोफिलिया रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या या जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल १२० हिमोफिलिया रुग्ण सहभागी झाले असून उपचार घेत आहेत..
हिमोफिलिया सारख्या गंभीर आणि दुर्मिळ आजारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचाराचा नवा मार्ग दाखवणारा ऐतिहासिक उपक्रम धाराशिवमध्ये आकार घेत आहे. युवा संशोधक डॉ. शुभम धूत हे जागतिक पातळीवरील संशोधन आपल्या जिल्ह्यात करत असून त्याचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटत आहे..
धाराशिवच्या भूमीतून उभा राहत असलेला हा संशोधन उपक्रम केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर देशातील हजारो हिमोफिलिया रुग्णांसाठी आशेचा नवा दीप ठरणार आहे..
#आयुर्वेदिक #मेडिकल #कॉलेज #हिमोफिलिया #शिबिर #धाराशिव #Dharashiv




MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

Dr Shubam Dhoot, has established an voluntary association of young doctors &provides health services with a selfless social spirit & has introduced an ayurvedic medicine, Raktamrut for blood disorders. He was honored by the President #DraupadiMurmu today.
#NationalDivyangPuraskar

English
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, धाराशिव येथे एम.डी. शिक्षण घेत असलेले डॉ. शुभम धूत यांनी ‘हिमोफिलिया’ या गंभीर आजारासाठी ‘रक्तामृत’ हे जगातील पहिले आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. त्यांच्या या विलक्षण कार्याची दखल घेत भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे विशेष अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित केले होते.
नवी दिल्ली येथून परतल्यानंतर डॉ. शुभम धूत यांना निवासस्थानी बोलावून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमातील अनुभव सांगितले. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या...
#धाराशिव #रक्तामृत #आयुर्वेद #औषध #अभिमानास्पद #Dharashiv


MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

A moment of immense pride and true inspiration🇮🇳
Honoured to interact with the Hon’ble #Primeminister of India Shri. @narendramodi Sir— a living symbol of visionary leadership and unwavering dedication to the nation.
#Pride #Inspiration #NationFirst #Gratitude #BeautyOfDemocracy


English

Truly #blessed to interact with the Hon’ble @rashtrapatibhvn Smt. #droupadimurmu Madam🇮🇳🙏
An #Unforgettable #moment of #nationalpride, profound #Gratitude, and powerful #inspiration to serve society with renewed dedication.
#BeautyOfDemocracy🇮🇳
जय हिंद जय महाराष्ट्र जय आयुर्वेद


Hon’ble @rashtrapatibhvn ,Smt. #droupadimurmu Madam, hosted the '#AthomeReception’ on the occasion of the 79th #Independenceday at #rashtrapatibhavan Cultural Centre on Aug 15, 2025.
Thank you Hon'ble @presidentofindia Smt. #draupadimurmu Mam for Inviting me.
#Humble&honoured.




English
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

स्वातंत्र्य दिन २०२५ निमित्त राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘ॲट होम रिसेप्शन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या कार्यक्रमासाठी धाराशिवच्या डॉ. शुभम रामनारायण धूत यांना मिळालेले विशेष आमंत्रण हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
हिमोफिलिया वरील क्रांतिकारी #धाराशिव_मॉडेल संशोधनामुळे जागतिक स्तरावरही प्रेरणा मिळणार आहे.
आज दिल्लीत त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!




MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

आज संसद भवनामध्ये माननीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत हेमोफिलिया पीडितांना शासकीय नोकरीत आरक्षण मिळावे या विषयावर एक ऐतिहासिक बैठक पार पडली. या बैठकीत माझ्यासोबत हेमोफिलिया विषयावर सातत्याने कार्यरत असलेले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील डॉ. शुभम रामनारायण धूतही उपस्थित होते.
हीमोफिलिया हा केवळ एक आजार नाही, तर ते हजारो कुटुंबांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आहे. शरीरात रक्त साकळत नसल्याने लहानशी जखमही त्या रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकते. एखादं मूल खेळताना पडलं, एखादा तरुणाला थोडीशी दुखापत झाली, तर आपल्याला ही सामान्य गोष्ट वाटते. पण हेमोफिलिया रुग्णांसाठी तीच जखम सतत रक्तस्त्राव करून त्यांचं आयुष्य धोक्यात आणणारी दुर्घटना ठरते.
यासाठी वारंवार महागड्या औषधोपचारांची गरज भासते. हिमोफिलिया रुग्णांना सातत्याने दवाखान्याचे उंबरे झिजवावे लागतात..
रुग्णाचे नातेवाईक अगतिक आणि हतबल होतात..गरिब, दुर्बल कुटुंबांना हा खर्च परवडत नाही. परिणामी अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने ते अंधाराच्या गर्तेत ढकलले जातात. शिक्षण, रोजगार, सामाजिक आयुष्य – सगळं थांबून राहतं. त्या पालकांच्या, त्या आई-वडिलांच्या, त्या मुलांच्या डोळ्यांत आपण सर्वांनी निराशेचे सावट पाहिलं आहे.
आज आपण चर्चा केलेला मुद्दा – हेमोफिलिया रुग्णांना शासकीय नोकरीत आरक्षण – हा केवळ रोजगाराचा नाही, तर त्यांच्या जीवनातील सन्मान, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सरकारच्या माध्यमातून त्यांना आधार, संरक्षण आणि न्याय मिळावा हीच खरी वेळेची गरज आहे.
मी नेहमी मानतो की आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो.
म्हणूनच माझ्या मनातली तळमळ अशी आहे की या आजाराने त्रस्त लोकांसाठी आपण काहीतरी ठोस केलं पाहिजे. त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना नव्या आशेचा किरण दाखवला पाहिजे.
आजची ही बैठक त्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे, आणि मी या कामासाठी मनापासून प्रयत्नशील राहून जेणे करून या ऐतिहासिक मागणीला न्याय मिळावा आणि हेमोफिलिया रुग्णांना त्यांच्या हक्काचं स्थान, समानता आणि सन्मान प्राप्त करता यावा..
हा प्रवास सोपा नाही, पण माझा विश्वास आहे की जेव्हा सरकार आणि समाज संवेदनशीलतेने एकत्र येतात, तेव्हा कुठलीही अडचण मोठी नसते. आपण सर्वजण मिळून नक्कीच या कार्यात यशस्वी होऊ.
@Drvirendrakum13 @rashtrapatibhvn
@socialpwds @MSJEGOI @narendramodi @dhoot_dr


MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

🌿📜 आयुर्वेद शास्त्र राष्ट्रीय शास्त्र व्हावे यासाठी ऐतिहासिक पाऊल...!
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी @SanghSwarajya , महाराष्ट्र तर्फे नवी दिल्ली येथे माननीय @moayush (केंद्रीय आयुष मंत्री) @mpprataprao साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.


MR
Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

President Droupadi Murmu hosted the At-Home reception at Rashtrapati Bhavan on the occasion of the 79th Independence Day. Prime Minister Shri Narendra Modi, Former President Shri Ram Nath Kovind, Chief Justice of India Shri Justice Bhushan Ramkrishna Gavai, Lok Sabha Speaker Shri Om Birla, Union Ministers, diplomats, eminent people from different fields, beneficiaries of welfare schemes of the Government, Divyangjan and representatives from different segments, demonstrating the spirit of inclusion, attended the reception.




English

#honoured to be invited by the @rashtrapatibhvn to the 'At Home Reception' at #rashtrapatibhavan on #IndependenceDay2025 Day.
जय हिंद
जय आयुर्वेद

Dr. SHUBHAM DHOOT retweetledi

स्वातंत्र्य दिन २०२५ निमित्ताने राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘ॲट होम रिसेप्शन’ या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाच्या कार्यक्रमासाठी भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव येथील
डॉ. शुभम रामनारायण धूत यांना प्राप्त झालेले विशेष आमंत्रण ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः धाराशिव जिल्ह्यासाठी, अत्यंत गौरवाची बाब आहे.
संशोधन क्षेत्रात धाराशिवचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या डॉ. धूत यांचे कार्य अभिमानास्पद आहे.
हिमोफिलिया वरील जगातील पहिले क्रांतिकारी संशोधन #धाराशिव_मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
डॉ. @dhoot_dr यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!


MR








