DigitalManse

5.5K posts

DigitalManse banner
DigitalManse

DigitalManse

@DigitalManse

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Mumbai, India Katılım Nisan 2020
110 Takip Edilen2.8K Takipçiler
DigitalManse
DigitalManse@DigitalManse·
श्री.आशिष गावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाअध्यक्ष केंद्रीय समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! 💐💪🚂🚩 . . . . . #ashishgawade #rajthackeray #rajsahebthackeray #amitthackeray #politics #mns #manse #mumbai #maharashtra 🚩🚩 #DigitalManse
DigitalManse tweet media
MR
0
2
10
131
DigitalManse
DigitalManse@DigitalManse·
श्री.प्रदिप वाघमारे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष केंद्रीय समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐💐💪🚂🚩 . . . . . #pradeepwaghmare #rajthackeray #amitthackeray #amitsahebthackeray #politics #mns #manse #mumbai #maharashtra 🚩🚩 #DigitalManse
DigitalManse tweet media
MR
0
1
10
128
DigitalManse retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे तयारी ! मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख राज साहेबांच्या नेतृत्वात पक्ष बांधणी सुरु आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मासाठी नेहमीच तत्पर आणि कृतीशील असणारा मनसैनिक, मुंबई आणि मराठीसाठी नव्या जोमात लढण्यासाठी सज्ज होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी नेते संदीप देशपांडे यांची निवड झाल्याबद्दल आणि इतर प्रमुख नेत्यांना अन्य महत्वाच्या जबाबदारी मिळाल्याबद्दल सर्वांचे मनसे अभिनंदन ! #MaharashtraNavnirmanSean #MNS #Mumbai #Maharashtra
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) tweet media
MR
3
43
413
4.4K
DigitalManse retweetledi
Yogesh J Chile (योगेश चिले)
#पनवेल_मद्धे_मराठीला_ग्रीन_सिग्नल पनवेल मनसेच्या आणि वाहतुक सेनेच्या श्री. सचिन जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमद्धे " मराठीत सिग्नल यंत्रणा " सुरू झाली आहे. पनवेल मनसेचे मनापासुन अभिनंदन... #Traffic #rajthackeray #Maharashtra #MarathiNews @mnsadhikrut
MR
8
28
209
3K
DigitalManse retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे. या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय... राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
182
266
1.5K
45.1K
DigitalManse retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही. प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया... १) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. २) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल ३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे ४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील ५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल. या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं... यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं. राज ठाकरे ।
MR
278
1.4K
6.1K
208.1K
DigitalManse retweetledi
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
या रे या सारे या ... नवी मुंबईकरांना आग्रहाचे निमंत्रण #बेलापुरविधानसभा #नवीमुंबई #आपलाहक्काचागजानन #navimumbai
Gajanan Kale tweet media
MR
4
31
261
4.3K
DigitalManse retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे....
Raj Thackeray tweet media
MR
55
170
1.5K
71.4K
DigitalManse retweetledi
Sandesh Desai
Sandesh Desai@SandeshDesai15·
विधानसभा निवडणुक 2024 वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिल्याबद्दल मा.राजसाहेब ठाकरे,मा.अमीतजी ठाकरे नेते,मा.योगेशजी परूळेकर,मा.@ThakareShalini सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार!!🌺#versovavidhansabha #voteforMNS
Sandesh Desai tweet media
MR
6
13
131
1.9K
DigitalManse retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार !! श्री. अमित राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार माहीम विधानसभा. #MNSAdhikrut #विधानसभा_२०२४
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
43
180
2.2K
48.9K
DigitalManse retweetledi
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
पश्चिम महाराष्ट्र स्नेह मेळावा…! आज सायंकाळी ६.३० वाजता …! नक्की या… !!! वाट पाहतोय … !!! #सातारा #सांगली #कोल्हापूर #सोलापूर #आपलाहक्काचागजानन #बेलापुरविधानसभा #मनसे #नवीमुंबई #navimumbai #mns
Gajanan Kale tweet media
MR
1
19
137
2K
DigitalManse retweetledi
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
नवी मुंबईचे राजकारण नासले ... माकडउड्या ... आता या माकडांना झाडावरून जमिनीवर आणण्याचे काम नवी मुंबईकरांनी येत्या निवडणुकीत करावे ... घराणेशाही बरोबरच गद्दारीला पण गाडा ... #नवीमुंबई #navimumbai
MR
1
28
153
2.5K
DigitalManse retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आपणास दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म
Raj Thackeray tweet media
MR
67
193
2.4K
80.1K
DigitalManse retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या .... #Badlapur
MR
273
721
5K
263.2K