Fisheriesgom

342 posts

Fisheriesgom banner
Fisheriesgom

Fisheriesgom

@fisheriesgom

Katılım Eylül 2024
8 Takip Edilen34 Takipçiler
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
जलीय कृषीतील रोगांच्या धोक्यापासून आता अधिक सुरक्षितता! 🐟 भारत सरकारच्या मत्स्य पालन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (PM-MKSSY) अंतर्गत आता जलीय कृषीसाठी विमा सुविधा उपलब्ध असून प्रीमियममध्येही मोठा दिलासा दिला जात आहे. ✨ या योजनेमुळे मत्स्य शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण, सुरक्षित उत्पादन आणि अधिक सक्षम मत्स्यव्यवसायासाठी मोठी मदत मिळणार आहे. 🌊 #fisheries #PMMSY #matsyavyavsay #PMMKSSY #pradhanmantrimatsyakisansamridhi #BlueRevolution #aquacultureinsurance #FisheryDevelopment #FisheriesIndia #maharashtra #मत्स्यव्यवसाय #प्रधानमंत्रीमत्स्यकिसानसमृद्धियोजना #जलीयकृषी #मत्स्यशेतकरी #मच्छीपालन #मत्स्यविकास #ब्लूइकॉनॉमी #मत्स्यविभाग #पीएमएमएसवाय #महाराष्ट्र #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
33
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
जागतिक परिचारिका दिन! 👩‍⚕️ 💉 सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण म्हणजे परिचारिका. समर्पण व सेवाभावाने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व परिचारिका भगिनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸 #InternationalNursesDay #WorldNursesDay #nursesday #HealthcareForAll #Respect #रुग्णसेवा #आरोग्यसेवा #परिचारिका_दिन #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
35
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #mothersday #happymothersday #मातृदिन #मातृदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
NE
0
0
0
51
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
रायगडमध्ये PMMSY लाभार्थ्यांशी संवाद; शोभिवंत मत्स्यव्यवसायाला नवी दिशा 🐠 महाराष्ट्रातील 📍 रायगड जिल्ह्याच्या भेटीदरम्यान भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी ‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. 🐟 यावेळी शोभिवंत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील वाढ, उपलब्ध संधी, विविध आव्हाने तसेच उपजीविकेवर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा मांडत, PMMSY अंतर्गत मिळालेल्या सहकार्याबद्दल भारत सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच, या योजनेमुळे उत्पन्नवाढ, व्यवसाय विस्तार आणि नव्या बाजारपेठांमध्ये संधी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 🌊 हा उपक्रम मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि नील अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत आहे. #fisheries #PMMSY #matsyavyavsay #OrnamentalFish #Aquaculture #FisheriesDepartment #FisheriesIndia #BlueEconomy #Maharashtra #मत्स्यव्यवसाय #शोभिवंतमत्स्यव्यवसाय #नीलअर्थव्यवस्था #जलसंवर्धन #उद्योजकता #ब्लूइकॉनॉमी #मत्स्यविभाग #मत्स्यपालन #मत्स्यउत्पादन #पीएमएमएसवाय #महाराष्ट्र #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet media
MR
0
0
0
13
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
PMMSY अंतर्गत उभारलेल्या शोभिवंत माशांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सचिवांची भेट 🐠 भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी ८ मे २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील 📍 मंगरूळ गावात भेट देत, श्रीमती यशोदा संजय खंडागळे यांच्या ‘शोभिवंत माशांच्या ब्रूड बँक’ प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) अंतर्गत उभारण्यात आला आहे. 🐟 या भेटीदरम्यान डॉ. लिखी यांनी लाभार्थींशी संवाद साधत, शोभिवंत मत्स्यव्यवसायातील त्यांच्या यशस्वी प्रवासाची माहिती घेतली. भारत सरकारच्या सहकार्यामुळे उत्पन्नवाढ, उपजीविकेतील सुधारणा आणि व्यवसाय विस्ताराला मोठी मदत झाल्याचे यावेळी लाभार्थींनी सांगितले. विशेष म्हणजे, या प्रकल्पामध्ये ७०० हून अधिक टाक्या आणि २५ पेक्षा अधिक प्रकारच्या शोभिवंत माशांचा समावेश असून, हा प्रकल्प देशातील मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या अग्रगण्य ब्रूड बँक प्रकल्पांपैकी एक मानला जातो. 🌊 हा उपक्रम शोभिवंत मत्स्यव्यवसाय, उद्योजकता आणि नील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. #fisheries #PMMSY #matsyavyavsay #ornamentalfish #entrepreneurship #FisheriesDepartment #FisheriesIndia #BlueEconomy #maharashtra #मत्स्यव्यवसाय #नीलअर्थव्यवस्था #जलसंवर्धन #उद्योजकता #ब्लूइकॉनॉमी #मत्स्यविभाग #मत्स्यपालन #मत्स्यउत्पादन #पीएमएमएसवाय #महाराष्ट्र #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet media
MR
0
0
0
12
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते! बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #BuddhaPurnima #Buddhapurnimawishes #बुद्धपौर्णिमा #BuddhaPurnima2026 #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
20
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, ज्ञानोबा-तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान, गती व प्रगतीचा महाराष्ट्र, जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र...! महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! #1stMay #maharashtradin #kamgardin #labourday #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
17
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती।। नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करण्याचा संकल्प करूया आणि पुढील पिढ्यांचा हक्क सुरक्षित ठेवूया! 🌍 जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #InternationalMotherEarthDay #WorldEarthDay #EarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन #वसुंधरा_दिन #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
17
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
आज 'अक्षय्य तृतीया' ✨ 🌸 जीवनातील तुमची सर्व उद्दिष्टे आणि आकांशा तुम्हाला प्राप्त होवोत! 💫 साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🎉 #AkshayTritiya #अक्षय_तृतीया #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
22
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
स्त्री शक्तीच्या सन्मानाचा आणि गौरवाचा दिवस "जागतिक महिला दिन" जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #worldwomensday #internationalwomensday #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
93
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा… धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #Dhulivandan #Wishes #धुळवड #धूलिवंदन #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
1
85
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
चैतन्याची रास घेउनी, सूर्यकिरणे आली दारी... द्वेष-भावना सार्‍या पेटवूनी, चला करू होळी साजरी! होळीच्या हार्दिक शुभेच्छा... #Holi #Holifestival #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
41
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
भारतीय तरुणांना विज्ञान आणि नवसंशोधनात जागतिक नेतृत्वासाठी सक्षम करूया, विकसित भारताच्या दिशेने आगेकूच करूया! मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडविणाऱ्या सर्व अभियंते, शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न सर सी. व्ही. रमन यांना विनम्र अभिवादन! #NationalScienceDay #NationalTechnologyDay #Scientist #राष्ट्रीय_विज्ञान_दिवस #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
15
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त समस्त मराठी बांधव-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा ! ‘ज्ञानपीठ’ या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #Kusumagraj #MarathiBhashaGouravDin #कुसुमाग्रज #कवी_कुसुमाग्रज #विष्णू_वामन_शिरवाडकर #मराठीभाषागौरवदिन #मराठी_भाषा_गौरव_दिन #मराठीभाषा #मराठीभाषादिवस #मराठी_राजभाषा_दिन #राजभाषा #मराठी #marathi #कुसुमाग्रजजन्मदिवस #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
18
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! #ChatrapatiShivajiMaharaj #Jayanti #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
56
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
ओम नम: शिवाय.... "महाशिवरात्रीच्या" आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #MahaShivaratri #LordShiva #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
20
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
महाराष्ट्रातील मच्छिमारांसाठी ०३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम भाटी मच्छिमार सह. सो. लि. येथे आयोजित केले होते. "बोट इंजिनची देखभाल आणि मासेमारी सराव" या विषयावर ११/०२/२०२६ रोजी सुरू झाला आणि CIFNET चेन्नई द्वारे PMMSY योजनेअंतर्गत आयोजित केला गेला होता. दिनांक १३.०२.२०२६ रोजी २५ लाभार्थींना मच्छिमारांना बोट इंजिनची देखभाल, इंजिनमधील दोष, समस्या निवारण आणि मासेमारीच्या विविध पद्धतींबद्दल एस विश्वनाथन, प्रशिक्षक (ME), ई प्रवीण, प्रशिक्षक (ME) आणि अंतोनी रेजाॅन (ME) यांनी सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई उपनगर श्रीमती ऐश्वर्या रणदिवे आणि मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री सचिन भालेराव यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा पार पडला. एस.विश्वनाथन, प्रशिक्षक (ME) अभ्यासक्रम समन्वयक यांनी सर्वांचे आभार मानले आणि सहभागींना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई उपनगर श्रीमती ऐश्वर्या रणदिवे आणि मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री सचिन भालेराव यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आणि कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात १३ मच्छिमार महिला आणि १२ मच्छिमार उपस्थित होते. #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet media
MR
0
0
0
11
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 जय हिंद! 🇮🇳 #PulwamaAttack #PulwamaTerrorAttack #PulwamaAttack2019 #MartyrsDay #BlackDayForIndia #TerrorAttack #Pulwama #CRPF #indianarmy #soldiers #Kashmir #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
28
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
दिनांक ०६ फ्रेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित ‘ॲडव्वांटेज विदर्भ २०२६’ या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र शासनाचे पदुम (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय) विभागाचे मा. सचिव डॉ. रामास्वामी एन. (IAS) यांनी विदर्भ आणि महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाच्या संधी व आव्हाने यावर प्रभावी मार्गदर्शन केले. माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मंच विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरत आहे. ​प्रमुख ठळक मुद्दे: ​1) गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय (Inland Fisheries): डॉ. रामास्वामी एन. सरांनी विदर्भातील जलसंपत्तीचा वापर करून गोड्या पाण्यातील मासेमारीला चालना देण्यावर भर दिला. ​2) शासकीय योजना व उपक्रम: केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विशेषतः पायाभूत सुविधा निर्मिती, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. ​3) भावी प्रगतीचा आराखडा: मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भविष्यातील गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या प्रचंड संधींबाबत त्यांनी सकारात्मकता व्यक्त केली. ​या सत्राला माजी प्रधान सचिव मा.डॉ. अनुप कुमार सर (IAS Retd.) यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून या क्षेत्रातील तांत्रिक बाबींवर मोलाचे विचार मांडले. याप्रसंगी 'ॲडव्वांटेज विदर्भ' मंचातर्फे आमंत्रित वक्ते, मा.प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, नागपूर हे देखील उपस्थित होते. ​"विदर्भातील तलाव आणि जलाशयांमध्ये मत्स्यपालनाची मोठी क्षमता असून, शासनाच्या मदतीने हा भाग मत्स्योत्पादनाचे केंद्र (Hub) म्हणून विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे." ​ #AdvantageVidarbha2026 #FisheriesDevelopment #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Fisheriesgom tweet mediaFisheriesgom tweet media
MR
0
0
0
20
Fisheriesgom
Fisheriesgom@fisheriesgom·
निःशब्द... राज्याचे उपमुख्यमंत्री, अनुभवी व कर्तृत्ववान नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻 💐 #ajitdadapawar #RIP #bhavpurnshraddhanjali #भावपूर्ण_श्रद्धांजली
Fisheriesgom tweet media
MR
0
0
0
25