विधानसभेतील आमचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेशजी पाडवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उत्तम निरोगी, दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सार्वजनिक व राजकीय कार्याला अधिकाधिक यश लाभत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा !
#Birthday #राजेश_पाडवी #RajeshPadvi #जन्मदिवस #BJP
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत श्री. अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, हा विजय त्या विश्वासाची ठोस पावती आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या धोरणांना व कार्यक्षम प्रशासनाला मिळालेली ही व्यापक मान्यता आहे.
हा विजय महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासाला अधिक बळ देणारा ठरून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवे बळ व दिशा देणारा आहे. महायुती सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकास, स्थैर्य आणि जनकल्याणाच्या उद्दिष्टांसाठी अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा ठाम विश्वास आहे.
#महायुती #अभिनंदन #सुनेत्रापवार #अक्षयकर्डिले #पोटनिवडणूक
भाजपाचा ऐतिहासिक, अभूतपूर्व विजय!
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी येथील विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री. अमितजी शहा व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या राजकारणाला जनतेने दिलेला हा स्पष्ट कौल आहे.
हा विजय देशातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक ठरून भविष्यातील विकासयात्रेला अधिक बळ देणारा आहे.
#ऐतिहासिकविजय #जनादेश #BJPVictory #नेतृत्व #विकास #सुशासन #राष्ट्रहित
@AmitShah@narendramodi@NitinNabin
The Lotus blooms in West Bengal!
The 2026 West Bengal Assembly Elections will be remembered forever. People's power has prevailed and BJP's politics of good governance has triumphed. I bow to each and every person of West Bengal.
The people have given a spectacular mandate to BJP and I assure them that our Party will do everything possible to fulfil the dreams and aspirations of the people of West Bengal. We will provide a Government that ensures opportunity and dignity to all sections of society.
@BJP4Bengal
Assam blesses BJP-NDA once again!
The BJP-NDA’s win in the Assam Vidhan Sabha elections illustrates the unwavering support for our Alliance’s emphasis on development and bringing a positive difference in people’s lives. I thank my sisters and brothers of Assam for the resounding mandate. I also assure them that we will keep working for the state’s transformation.
@BJP4Assam
Thank you Puducherry!
Based on our track record of good governance and the work of the Government led by Shri N. Rangasamy, the people of Puducherry have blessed NDA with another term. These blessings will add momentum to our collective efforts to boost good governance.
@BJP4Puducherry
१२ वीच्या यशवंतांना Congratulations!
HSC बोर्डाच्या अर्थात १२ वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या तमाम गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#HSC#Exam#result#Congratulations
आमदार चषक २०२६ अंतर्गत भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती!
📍आचेगाव
आमदार चषक २०२६ अंतर्गत भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेस उपस्थित राहत क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटला.
ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडा कौशल्याला वाव देणारा आणि त्यांच्यातील स्पर्धात्मकता, शिस्त व संघभावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याचे व्यासपीठ मिळत असून, क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असून, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास देखील मदत करतात.
क्रीडा संस्कृतीला चालना देत युवकांना योग्य दिशा देणाऱ्या या उपक्रमाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही अशाच स्पर्धांमधून नवोदित खेळाडू घडत राहोत, याचं सदिच्छा!
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. महेश बिराजदार, श्री. संदिप टेळे, श्री. नेताजी खंडागळे, श्री. विकास बुळ्ळा, श्री. बलवान गोतसुर्वे, श्री. महेश बिराजदार, श्री. सुरज पाटील, श्री. रमेश क्षीरसागर, वृशांती पाटील, श्री. रफिक मुल्ला, श्री. योगीनाथ बाजारमठ, श्री. अनिल बर्वे, श्री. मलकप्पा कोडले, श्री. श्रीशैल दुधगी, श्री. गोविंद वलेकर, श्री. महादेब कोरे, श्री. राजकुमार बाईटपल्ली, श्री. लक्ष्मण हुल्ले, श्री. धानलिंग मिर्जे आदींसह पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#आमदारचषक2026 #युवामंच #क्रिकेटस्पर्धा #क्रीडासंस्कृती #युवकविकास #आचेगाव
महाराष्ट्राच्या गौरवाला केंद्राकडून विशेष सन्मान!
महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांनी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेल्या विशेष पत्रात महाराष्ट्राच्या शौर्य, संस्कृती आणि विकासाचा गौरव करण्यात आला आहे.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा, गडकिल्ल्यांचे युनेस्को मानांकन आणि गडचिरोली विकासकार्य हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक ठरले आहे.
या सन्मानासाठी आदरणीय पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार.
#महाराष्ट्रदिन #MaharashtraPride#Modi#Fadnavis@narendramodi@PMOIndia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Mumbai
महाराष्ट्र दिनानिमित्त आदरणीय पंतप्रधानांचा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजींना विशेष संदेश!
महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी माननीय पंतप्रधानांनी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेल्या विशेष पत्रातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान अधोरेखित झाला आहे.
मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, गडकिल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश आणि गडचिरोलीतील विकास कार्य यामधून महाराष्ट्राबद्दलची आत्मीयता स्पष्ट दिसून येते.
आदरणीय पंतप्रधानांच्या शुभेच्छा व मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार.
#महाराष्ट्रदिन #NarendraModi#DevendraFadnavis#MaharashtraPride@narendramodi@PranitaDeore@PMOIndia@Devendra@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
आजपासून राज्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ हा डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही प्रक्रिया जनगणना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
मी अक्कलकोट मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो की, दिनांक १ मे ते १५ मे या कालावधीत आपण se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची डिजिटल जनगणना पूर्ण करावी. या प्रक्रियेमुळे प्रशासनास माहिती संकलन अधिक सुलभ व वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यास मदत होईल.
स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकास ११ अंकी SE (Self Enumeration) युनिक आयडी प्राप्त होईल. हा आयडी जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील टप्प्यात जेव्हा जनगणना अधिकारी (प्रगणक) घरोघरी भेट देतील, तेव्हा हा युनिक आयडी त्यांना सादर करणे अनिवार्य असेल, ज्यामुळे पडताळणी प्रक्रिया सुलभ व जलद होईल.
दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी भेट देऊन ‘घरगणना’ प्रक्रिया पूर्ण करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती अधिकारी प्रत्यक्ष नोंदवून घेतील.
आपण सर्वांनी या डिजिटल जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, ही विनम्र विनंती.
#राष्ट्रीयजनगणना2026 #स्वगणना #डिजिटलभारत #अक्कलकोट #नागरिकसहभाग #प्रशासनसहकार्य #CensusIndia#DigitalCensus
सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला निर्णायक गती; NH - ४६५ मार्गासाठी ₹७४०.३८ कोटींच्या निधीस मान्यता!
महाराष्ट्र राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६५ (न्हाई६५) अंतर्गत मोहोळ – बसवनगर(तेरा मैल)– वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या उन्नतीकरणासाठी ७४०.३८ कोटींच्या भरीव निधीस मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण परिसराच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरणार आहे.
प्रस्तावित उन्नतीकरणामुळे आधुनिक तांत्रिक मानकांनुसार सुरक्षित, सक्षम व उच्च दर्जाचा रस्ता उपलब्ध होणार असून, प्रवास अधिक सुलभ, वेगवान व सुरक्षित बनेल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासही यामुळे महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. याचबरोबर, शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत जलद व कमी खर्चात वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध होऊन कृषी क्षेत्राला थेट चालना मिळणार आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्याची आणि शेजारील भागांची परस्पर कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होऊन व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्राच्या विस्ताराला नवी संधी प्राप्त होणार आहे.
सदर प्रकल्प हा केवळ रस्ते विकासापुरता मर्यादित नसून, तो प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या दीर्घकालीन सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया घालणारा ठरेल, असा विश्वास आहे.
#सोलापूर #NH465 #रस्तेविकास #पायाभूतसुविधा #कनेक्टिव्हिटी
@Modi@Pmo@devendra@Cmo@Jaykumargore@Bjpmaharashtra
सत्य, अहिंसा, शांती आणि करुणा यांचा महासागर असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन!
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#तथागत #बौध्द_पौर्णिमा #गौतम_बुद्ध #Gautambuddha #भगवान_बुद्ध