Mayuresh Prabhune

2.9K posts

Mayuresh Prabhune banner
Mayuresh Prabhune

Mayuresh Prabhune

@mayureshgp

Science Journalist - विज्ञान पत्रकार | Monsoon, Weather | Astronomy | Space Technology | Citizen Science | मराठी | @satarkindia @projectmeghdoot @scienceccs

Pune, India Katılım Nisan 2013
1.4K Takip Edilen2.7K Takipçiler
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
#Nasa च्या #Artemis2 या मानवी चांद्र मोहिमेचे गुरुवारी (२ एप्रिल) पहाटे केनेडी स्पेस सेंटर येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेद्वारे पाच दशकांनी प्रथमच माणूस पृथ्वीनजीकची कक्षा ओलांडून दूर अवकाशात प्रवास करणार आहे. #SanshodhanUpdate
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
2
77
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
अपोलो १७ मोहिमेनंतर ५३ वर्षांनी माणूस चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी सज्ज ! भारतीय प्रमाणवेळेनुसार २ एप्रिलला पहाटे ३:५४ ला #Artemis2 चे #NASA च्या केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण. #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
1
89
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
३० वर्षांपूर्वी आम्ही शाळेत असताना गुरू ग्रहाला १६; तर शनीला १७ चंद्र असल्याचे पुस्तकांतून शिकलो होतो. आता दोन्ही ग्रहांच्या चंद्राची संख्या अनुक्रमे १०१ आणि २८५ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही संख्या आणखी वाढू शकते. #Jupiter #Saturn #Moons #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
3
17
708
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
३० मार्च २०२६ च्या पहाटे महाराष्ट्रासह दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी सिंह राशीतील मघा ताऱ्याचे पिधान दिसले. तारे आणि ग्रहांना चंद्र का झाकतो, हे अनोखे ग्रहण टेलिस्कोपमधून कसे दिसते याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडीओ. youtu.be/LAWiJ_umcjQ
YouTube video
YouTube
MR
0
1
8
670
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
विदेशी #LPG ला पर्याय ठरणारे #DME इंधन १०० टक्के भारतात तयार करणारे तंत्रज्ञान पुण्याच्या #NCL ने विकसित केले आहे. भारतीय शास्त्रज्ञांना केंद्र आणि राज्य सरकारने पाठिंबा दिल्यास येत्या काही वर्षांत विदेशी इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे संपू शकेल. #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
3
10
45
1.9K
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
@gruhastha इतर वेळेस आकाश धुरकट असेल, तर त्याचे कारण नैसर्गिकच असते. वातावरणात बाष्पाचे प्रमाण जास्त असेल तर आकाश स्वच्छ, निळे दिसत नाही. मोठ्या शहरांमध्ये त्यात धुळीचाही समावेश होतो.
MR
0
0
0
12
गृहस्थ🇮🇳
@mayureshgp मग ज्या वेळी धुरकत असते ते पण नैसर्गिक कां नसते
MR
1
0
0
15
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
राज्यात सध्या निरभ्र आकाश आणि स्वच्छ हवा अनुभवायला मिळत आहे. त्यामागे बांधकामांवरील निर्बंध कारणीभूत नसून, समुद्रावरील जास्त दाब, त्याला अनुसरून वाहणारे वारे आणि बाष्पाचे कमी झालेले प्रमाण कारणीभूत आहे. #Maharashtra #Weather #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
4
12
49
1.7K
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
गुरूत्वीय लहरींच्या संशोधनासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळ उभारण्यात येणाऱ्या #LIGOIndia वेधशाळेच्या उभारणीचे कंत्राट L&T कंपनीला मिळाले आहे. पुढील ४८ महिन्यांत ही वेधशाळा उभारण्यात येईल. #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
4
21
1.6K
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ आणि International Centre for Theoretical Physics (ICTP) या प्रख्यात संस्थेचे संचालक प्रा. अतीश दाभोलकर यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) रानडे इन्स्टिट्यूटला भेट देऊन पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. #AtishDabholkar #ScienceCommunication
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
1
6
162
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स २७ वर्षांच्या सेवेनंतर नासातून निवृत्त झाल्या. त्यांच्या विक्रमी कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख. #sunitawilliams #NASA #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
3
118
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
आपल्यापासून ३००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ताऱ्याला लागलेल्या २०० दिवसांच्या दुर्मीळ ग्रहणाची नोंद खगोलशास्त्रज्ञांनी घेतली आहे. आयुकातील डॉ. सारंग शहा यांच्या पुढाकाराने हे संशोधन पार पडले. #StellarEclipse #IUCAA #Astronomy #NewResearch #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
5
144
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
#LaNina ची स्थिती जाऊन प्रशांत महासागरात लवकरच #Neutral स्थिती तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्टपासून #ElNino विकसित होण्याचाही प्राथमिक अंदाज आहे. तसे झाल्यास आगामी #Monsoon च्या उत्तरार्धावर एल निनोचा प्रभाव राहू शकतो. #Monsoon2026
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
2
4
191
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
Goa State Biodiversity Board आणि Center for Citizen Science यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या MoU नुसार CCS च्या #Satark या उपक्रमांतर्गत गोवा राज्यासाठी तीव्र हवामान, दरडी यांच्याशी संबंधित पूर्वसूचना, प्रशिक्षण, प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येतील.
Mayuresh Prabhune tweet media
MR
1
1
2
245
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
देशात एकीकडे खगोलशास्त्रीय संशोधनासाठी शेकडो कोटींची तरतूद केली जात असताना दुसरीकडे शालेय स्तरावर बहुतेक विद्यार्थ्यांना चंद्र, ग्रह, तारे यांविषयीच्या मूलभूत संकल्पनाही समजलेल्या नाहीत, असे राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातून दिसून आले आहे. #Astronomy #Education #India
Mayuresh Prabhune tweet media
MR
1
2
10
321
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
भारतात १० मीटर व्यासाच्या #NLOT या मोठ्या टेलिस्कोपसह २ मीटर व्यासाच्या #NLST या सोलार टेलिस्कोपच्या निर्मितीची घोषणा यंदाच्या #Budget मध्ये करण्यात आली. भारतात निरीक्षणात्मक खगोलशास्त्राला चालना देण्यासाठी केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचे खगोलशास्त्रज्ञांनी स्वागत केले आहे.
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
1
5
335
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
पुण्यातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (इन्सा); तर डॉ. दिनेश अमळनेरकर यांची महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस्सी) अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. डॉ. मांडे आणि डॉ. अमळनेरकर दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन! #Pune #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
1
3
487
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी (७ जानेवारी २६) रात्री पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. आज (८ जानेवारी) दुपारी ४:०० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉ. गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #DrMadhavGadgil #Pune
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
1
100
Mayuresh Prabhune
Mayuresh Prabhune@mayureshgp·
पृथ्वीच्या वातावरणात दररोज शिरणाऱ्या कित्येक टन वजनाच्या आंतरग्रहीय धूलिकणांची नोंद #ISRO उपकरणाने घेतली आहे. हा प्रयोग आता आगामी #शुक्रयान मोहिमेत समाविष्ट केला जाणार असून, उल्कावर्षाचा शुक्राच्या वातावरणावर होणारा परिणाम प्रथमच अभ्यासण्यात येणार आहे. #महाराष्ट्रटाइम्स
Mayuresh Prabhune tweet media
MR
0
0
2
56