Sada Sarvankar
4.1K posts

Sada Sarvankar
@misadasarvankar
अध्यक्ष - श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास (राज्यमंत्री दर्जा) ● मा. आमदार माहीम विधानसभा ● शिवसेना - उपनेते ● माजी स्थायी समिती अध्यक्ष, बृहन्मुंबई म.न.पा.
Mumbai, India Katılım Ekim 2016
206 Takip Edilen8.1K Takipçiler

संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसेवेला नवी गती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व नवनियुक्त संपर्क प्रमुखांचे मनःपूर्वक अभिनंदन. मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्त खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम (मुंबई उत्तर आणि उत्तर पश्चिम लोकसभा), मा. खासदार राहुल शेवाळे (मुंबई उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य लोकसभा) आणि आमदार निलेश राणे (मुंबई ईशान्य आणि दक्षिण लोकसभा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पक्षीय संघटन अधिक सक्षम करत शिवसैनिकांना सोबत घेऊन जनसेवेचा हाच मार्ग आपण सर्वजण आणखी ताकदीने पुढे न्याल असा ठाम विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या या नव्या जबाबदारीला आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

MR

केंद्र सरकारचा देशवासीयांना दिलासा देणारा निर्णय!
युद्धाच्या सावटातही इंधन दरवाढीची भीती दूर करत, पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रसरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक आभार! 🚩

MR

जय श्री राम! 🚩
मर्यादा, त्याग आणि अढळ कर्तव्याचं जिवंत प्रतीक म्हणजे 'प्रभू श्रीराम'.
रामनवमीच्या या पावन पर्वावर, चला आपणही आपल्या आयुष्यात सत्याचा आणि संयमाचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प करूया. प्रभू रामांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचा सूर्योदय होवो!
सर्वांना रामनवमीच्या मंगलमयी शुभेच्छा! ✨🙏

MR

॥ श्री स्वामी समर्थ ॥
अनंत कृपेचा सागर, भक्तांच्या हाकेला धावून येणारा आधार…
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन 🙏
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या त्यांच्या दिव्य आश्वासनातच आयुष्याला नवी दिशा मिळते…
त्यांच्या चरणी ठेवलेला प्रत्येक विश्वास, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक अश्रू हेच भक्तीचे खरे रूप आहे.
या पवित्र दिवशी, त्यांच्या कृपाछायेत आपले जीवन सदैव शांत, समाधानी आणि मंगलमय होवो हीच प्रार्थना… ✨

MR

नव्या सूर्यकिरणांसोबत नवी आशा उमलू दे,
परंपरांच्या सावलीत आनंद फुलू दे.!
गुढी पाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून आपल्या समृद्ध हिंदू संस्कृतीचा, शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांचा आणि नवचैतन्याचा साजरा करण्याचा दिवस आहे. या मंगलक्षणी आपल्या संस्कृतीच्या मुळांशी पुन्हा एकदा नातं जोडत, अभिमानाने आणि आनंदाने नव्या वर्षाचे स्वागत करूया.
माझ्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना व मातांना गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌼

MR

गुढी पाडवा म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, हा आपल्या हिंदू संस्कृतीच्या गौरवाचा, समृद्ध परंपरांच्या वैभवाचा आणि नवचैतन्याचा उत्सव आहे. या पवित्र पर्वानिमित्त *शिवसेना माहीम विधानसभा* आयोजित भव्य हिंदू नूतन वर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन आपल्या महान परंपरेचा अभिमानाने आणि उत्साहाने उत्सव साजरा करूया.
दि. १९ मार्च, गुरुवार | वेळ : सकाळी ९ वाजता
मार्ग : जाखादेवी मंदिर ते शीतलादेवी मंदिर
सर्व हिंदू बंधू-भगिनी व मातांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शोभायात्रेचे वैभव वाढवावे, ही विनंती. 🌼🚩

MR

लसीकरण ही एक सामाजिक जबाबदारी आहे. ती केवळ आजारांना थांबवण्यासाठी नसून संपूर्ण समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोविड, पोलिओसारख्या अनेक रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवून आज भारत जगासमोर एक सक्षम उदाहरण म्हणून उभा आहे. या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवूया आणि निरोगी समाज घडवण्यासाठी आपला सहभाग नोंदवूया.

MR

दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सुसंस्कृत राजकारण आणि प्रगत महाराष्ट्राची पायाभरणी करणारे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या काळात देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेला ठाम आणि समर्थ नेतृत्व दिले. त्यांचे विचार, कर्तृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा आजही समाजजीवनाला प्रेरणा देत राहते.

MR











