Sanjay Rathod
4.5K posts

Sanjay Rathod
@SanjayDRathods
Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha
Yavatmal, India Katılım Nisan 2020
12 Takip Edilen15.1K Takipçiler

काल नेर तालुक्यातील आजंती येथील पारधी बेड्यावर जाऊन कु. अन्वी अनाडी भोसले (वय ९) हिच्या दुर्दैवी निधनानंतर तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच प्रकरणाचा तातडीने तपास व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि शासनाकडून त्वरित मदतीचे निर्देश दिले. यासोबतच कुटुंबाला वैयक्तिक आर्थिक मदतही केली.




MR

आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशामक दलातील शूर जवानांना मानाचा मुजरा.
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनानिमित्त त्यांच्या धैर्य, समर्पण आणि सेवाभावाला सलाम!
#आंतरराष्ट्रीय_अग्निशामक_दिन #InternationalFirefightersDay

MR

आज सातेफळ येथे रवींद्र राऊत यांची कन्या चि. सौ. का. दिपाली यांच्या तसेच अडगाव खाकी येथे प्रकाश चव्हाण यांचा मुलगा चि. उमेश यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रेमदास डोंगरे यांचा मुलगा चि. नागसेन यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ भेट देऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




MR

आज पल्लवी मंगल कार्यालय यवतमाळ येथे गजाननराव राऊत यांची कन्या राणी, तसेच माँ भवानी मंगल कार्यालय, मांगुळ येथे पुरुषोत्तम राठोड यांचे सुपुत्र तुषार आणि तीर्थरूप मंगल कार्यालय आर्णी येथे पंडित चव्हाण यांचे सुपुत्र मयूर यांच्या शुभविवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवदाम्पत्यांना भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




MR

दर्डा नगर, यवतमाळ येथे मा. भूषण गवई यांच्या समवेत बाबूजी उर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना अभिवादन करत वृक्षारोपणाचा संदेश दिला.
त्यानंतर जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेजमध्ये बाबूजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, मान्यवरांचा गौरव करण्यात आला आणि अमोलकचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
MR

काल यवतमाळ येथील दर्डा नगरमधील प्रेरणा स्थळावर भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या समवेत उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक आदरणीय बाबूजी उर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
त्यानंतर विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचालित जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेज येथे बाबूजी यांच्या पुतळ्याचे अनावरण मा. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी नामांकित वरिष्ठ वकिलांचा तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यानंतर अमोलकचंद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायाधीश वृषाली जोशी, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुंढाटे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मंगुळकर, वरिष्ठ विधिज्ञ फिरदोस मिर्झा, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शिनी उईके तसेच अनेक मान्यवर, प्राचार्य, विद्यार्थी प्रमुख उपस्थित होते.




MR

वैद्यकीय क्षेत्रात आपले स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व NEET परीक्षार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा!
आत्मविश्वास ठेवा, शांत मनाने परीक्षा द्या आणि यश निश्चित तुमच्याच पावलांशी येईल.
उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#NEET #NEETExams

MR

हास्य हे आयुष्यातील सर्वात सुंदर औषध आहे.
मन प्रसन्न ठेवत प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याची ऊर्जा देणारे हास्य जपूया.
विश्व हास्य दिनानिमित्त सर्वांना आनंदी, निरोगी आणि सकारात्मक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 😊
#विश्व_हास्य_दिन #WorldLaughterDay

MR

सत्य मांडण्याचे धैर्य आणि समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पेलणाऱ्या पत्रकारितेला सलाम.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या बळावरच पारदर्शक आणि सजग समाज उभा राहतो.
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पत्रकारांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#जागतिक_पत्रकारिता_स्वातंत्र्य_दिन #worldpressfreedomday

MR

आज दिग्रस येथे चंदन पवार यांचे वडील स्व. रामूजी पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.
तसेच निलेश सुप्रे यांचे वडील स्व. रघुनाथ नारायणराव सप्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेतली.
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.




MR

यवतमाळ येथे आर.ओ. प्लांट लोकार्पण आणि शिवसेना, यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग…
#roplant #drinkingwater #blooddonationcamp #blooddonation #shivsena
MR





















