Adv.SonawaneDB
107 posts



मी स्वतः जन्माने ब्राह्मण. उच्च नाही पण निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. सोशल कॅपिटल मुळे सहजपणे मिळालेले उच्च शिक्षण वगैरे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली कॉलेजच्या दिवसात डाव्या चळवळीशी संबंध आल्यानंतर. सामाजिक / राजकीय ऍक्टिव्हिज मधून ग्रामीण भाग, मुंबईतील झोडपडपट्या यातून फिरणे झाले. त्या टीनएज मध्ये अंतर्बाह्य हादरलो होतो.
वाचनातून , आकडेवारीतून , अभ्यासातून अधिक कळत गेले. देशातील ८० ते ९० टक्के स्त्री, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अशीच जगत आहेत. त्यांना पिढ्यान्पिढया असेच ठेवण्यात आले आहे. त्यांचे दैव/ नशीब वगैरे नाही. हि सिस्टिमॅटिक घडवली गेलेली सिस्टीम आहे. म्हटले तर पुरातन.
अन्न / भौतिक सुविधांचा अभाव एक भाग झाला. पण नेहमी मनात यायचे यांना अशा वंचितवस्थेत जगण्याची, संघर्ष करण्याची, आत्मसम्मानाने जगण्याची, स्वप्ने पाहण्याची ऊर्जा कोठून येत असेल. त्या ऊर्जेचा स्रोत काय असेल ?
________________________
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन संघर्ष , विचार , त्यांची विद्वत्ता , त्यांचा महाकाय कॅनव्हास …. हिमालयासमोर उभे राह्यला नंतर जशी लीनता येते , तशी भावना डॉ बाबासाहेबांचा फोटो , पुतळा, प्रतिमा, नाव बघितल्यावर / मनात आल्यावर येत राहिली आहे. नेहमीच. अजूनही.
मग कळत गेले कि त्या कोट्यवधी प्रौढ स्त्री पुरुष / तरुण तरुणींच्या ऊर्जेचा स्रोत डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना एका जातिसमूहाचे नेते म्हणून प्रोजेक्ट करत राहणे हि डॉ आंबेडकरांच्या मूल्यांचे, राजकीय विचारधारेच्या विरोधकांचे मोठा अजेंडा आहे. पण डॉ आंबेडकर १८० अंशाच्या कोनात त्यांच्यासमोर उभे आहेत. ठाम. अनेक दशके.
__________________________
खरेतर ते ऊर्जा स्रोत आहेत सर्वांचे. सर्व जात , पंथ , वंश, धर्म, भाषा, लिंगाच्या माणसांचे. सर्व मानवजातीचे. आहेत आणि पुढची अनेक शतके राहतील.
कारण त्यांच्या जीवनातून आणि विचारातून मिळणारा मेसेज मनुष्यकेंद्री, वैश्विक आणि सार्वकालिक आणि बराच काही आहे.
हे कळण्यासाठी अभ्यास कमी पडला तरी चालतंय. आपल्याच सारख्या हाडामांसाच्या, तशाच शारीरिक , भावनिक यातना होऊ शकणाऱ्या, आपल्याच सारखी मुले जन्माला घालणाऱ्या, तशीच स्वप्ने असणाऱ्या माणसांप्रती संवेदनशीलता लागते.
त्यासाठी प्रभुत्ववादी विचारासारणीतून येणारा मनातील तुच्छताभाव प्रथम थुंकून टाकावा लागतो.
हे यांना कोण सांगणार ? कुवतीचा प्रश्न आहेच. पण खरेतर त्यांचा यामागे काहीएक हिडन अजेंडा देखील आहे !
______________________________
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, मूल्ये, विचार, अभ्यासूवृत्ती, सातत्य …. तन, मन, धन एकाच ध्येय्यासाठी स्टेकला लावणे, आपल्या लाईफ मिशन साठी पॅशनेट असणे, आणि माणसांप्रती कंपॅशनेट असणे …
ब्राम्हण जातीत जन्मलेल्या माझे…१७ व्या वर्षांपासून आज वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत, इतर अनेक स्रोतांपैकी एक सर्वात मोठे प्रेरणा स्रोत आहेत ! मी मरेपर्यंत राहतील हे नक्की.
आणि हेच त्यांना खुपत आहे. विशिष्ट जातीच्या नव्हे तर विविध जाती, धर्म, पंथ, वंश, लिंगाच्या स्त्री पुरुषांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर वेगाने प्रेरणा स्रोत बनत आहेत. त्यांचे दुखणे हे आहे.
संजीव चांदोरकर (१९ डिसेम्बर २०२४)
MR

माझे मित्र माझे गुरू add @sonawanedb लिखित सात पुस्तकांचे प्रकाशन मागच्या महिन्यात पुण्यात झाले सातही पुस्तके खूप चांगली आणि सामाजिक भान जपणारी आहेत. ॲड सोनवणे सरांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत त्यांच्यात आणि त्यांच्या पुस्तकांत एक समानता आहे एकदा दोस्ती झाली की ती निरंतर असणार


MR

@JainDenesh VERY SHOCKING TO ME I STUDIED IN TISS AND ON OUR ASPISIOUS OCCASIONS OF CONVOCATION IN1980 HE WAS PRESENT AND HE HOUNER US MASTER DEGREE IN " PERSONNEL MANGEMAT AND INDUSTRIAL RELATIONS .AND I MATE IN RATAN TATA TRUST AND TATA HOUSE IN FORT.
NICE MAN
RIP.
English

माझे मित्र माझे गुरू श्री ॲड.@sonawanedb यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दिनांक ०६/१०/२०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता एस एम जोशी कॉन्फरन्स हॉल नवी पेठ येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही त्यांच्या तर्फे माझी विनंती 🙏

MR

@MuktaDabholkar
@niranjan_takle
संशयीत मारेकरी पकडले गेले वृत्त वाहिन्यांनी औपचारिकता म्हणून बातमी दिली वृत्तपत्रांनी ह्या बातमीला कितव्या पानावर दिले माहिती नाही पण सोशल मीडियावर छोट्याशा गोष्टीवरून स्पेस घेणारे ह्या बातमीवर अक्षरशः मूग गिळून गप्प का आहेत कळलं नाही
mukta dabholkar@MuktaDabholkar
MR

दाभोळकर समजायला मला उशीरच झाला हे नक्की 👏👏👏
Dhairyasheel 𑘛𑘺𑘨𑘿𑘧𑘫𑘲𑘩𑘿@Dhairya_Speaks
#नरेंद्र_दाभोलकर यांनी एकदा भाषणात #बुवाबाजी वर सगितलेला किस्सा. "एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
MR

कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा 🤦
दाभोळकर आम्हाला क्षमा करा आम्ही अजूनही सुधारत नाही आहोत आणि सुधारण्याची शक्यताही कमी आहे 🙏
ABP माझा@abpmajhatv
#Latur : अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला आहे. #Police #buck marathi.abplive.com/news/latur/lat…
MR

youtu.be/kOxdMjkMano?fe…
ब्रॅण्ड नाव ठरवताना काय काय काळजी घ्यावी त्याचे योग्य मार्गदर्शन नक्की पहा अजून बाकी खूप माहिती देणारे व्हिडिओ नक्की पाहा
माझे मित्र माझे गुरू ADV. @sonawanedb यांच्या कन्या आहेत या 🙏

YouTube
MR

@JainDenesh मौलिक वैचारिक काम केले आहे. चांगल्या कामाचा प्रसार हा झाला पाहिजे अणि इतरांना त्याचा उपयोग होणे कामी चांगला उपक्रम आहे.
MR
















