ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police

2.2K posts

ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police

ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police

@Thane_R_Police

ठाणे ग्रामीण पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५

Katılım Aralık 2015
6 Takip Edilen33.8K Takipçiler
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
🚔 अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव! ६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये 💻 ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला 🏆 राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान! केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान 👏 AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे ➡️ सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट! 👉 Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना! 👏 संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन! #AkolaPolice #ProjectTrinetra #BestITProject #AIPDM #MaharashtraPolice #PoliceInnovation #ProudMoment #AI
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
25
73
3.8K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सावधान! बनावट नोटांच्या आमिषाला बळी पडू नका. महाराष्ट्र सायबरची इंस्टाग्रामवरील रॅकेटवर मोठी कारवाई! महाराष्ट्र सायबर विभागाद्वारे सोशल मीडियावरील बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर 'Reels' च्या माध्यमातून बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) विकणाऱ्या आणि कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या खात्यांची दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबई, बुलढाणा आणि जळगाव येथे एकूण ४ गुन्हे (FIRs) दाखल केले आहेत. आतापर्यंत राहुल अनिल पवार आणि योगिता हितेश भोसले या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटांचा वापर केवळ आर्थिक गुन्हा नसून तो देशविघातक कारवाया आणि मनी लाँड्रिंगला खतपाणी घालणारा प्रकार आहे. नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी. आम्ही डिजिटल जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. 🇮🇳
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
6
25
56
3.9K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित अँन्टी सबोटेज चेक स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने द्वितीय क्रमांक पटकावत आपली दक्षता सिद्धत्वास आणली. #अखिल_भारतीय_पोलीस _कर्तव्य_मेळावा
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
2
23
60
2.4K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलीस फोटोग्राफी या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन! #अखिल_भारतीय_कर्तव्य_मेळावा
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
3
17
38
2.2K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दलाने शिस्त आणि समन्वय साधत ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित ड्रिल स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
5
27
84
3.4K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा: दिमाखदार समारोप! देशभरातील २९ संघांमधील १३२७ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या पाच दिवसीय मेळाव्यात आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवले. या प्रसंगी मार्गदर्शनासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.  सहभागी सर्व अधिकारी, अंमलदार आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #AIPDM2026 #MaharashtraPolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
22
35
2.3K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा: दिमाखदार समारोप! नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याचा समारोप सोहळा मा. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. नित्यानंद राय @nityanandraibjp आणि मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ०३.०४.२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. #AIPDM2026 #MaharashtraPolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
2
18
58
2.9K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये विविध प्रभागातील अधिकाऱ्यांनी ध्वज संचलन केले. #आपले_मपो #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
MR
8
20
33
2.7K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सर्व भक्तांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील संकटावर मात व्हावी हीच सदिच्छा. #हनुमान_जयंती_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
16
52
277
5.6K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेला ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२५-२०२६ नागपूर येथे मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्यमंत्री @Ashishjaisw3Adv, खासदार @shyamkumarbarve व पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यादरम्यान गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो तसेच केंद्रीय सशक्त पोलीस दल सहभागी होते. या पार्श्वभूमीवर संशोधन, संगणकविषयक जनजागृती यांबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. #आपले_मपो
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
19
33
3K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलिसांतर्फे नागपूर येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन व विकास ब्युरो आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला. #आपले_मपो
MR
3
24
35
2.4K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सेवा, सुरक्षा आणि कर्तव्याचा गौरव करणारा भारतीय पोलीस मेळावा! ६९ वा अखिल भारतीय पोलीस मेळावा २०२५-२६ चा उद्घाटन सोहळा मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २९ मार्च २०२६ रोजी नागपूर येथे पार पडला. या सोहळ्यास राज्यमंत्री @Ashishjaisw3Adv, खासदार @shyamkumarbarve तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, भा. पो. से. श्री. सदानंद दाते उपस्थित होते. #आपले_मपो #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
MR
3
20
31
2.5K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची भूल तुम्हाला फूल बनवू शकते, म्हणून प्रत्येक क्लिकपूर्वी विचार करा. #AprilFoolsDay
MR
4
26
29
2.4K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
संयम, तप आणि अहिंसेचा मार्ग दर्शविणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. #महावीर_जयंती_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
13
49
239
3.8K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
दिनांक ३० मार्च २०२६ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर परिषद मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, @iYogeshRKadam , मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची उपस्थिती होती. #आपले_मपो
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
5
25
77
4.9K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या दिवशी वाईट सवयी विसरून चांगल्या सवयी अंगीकारुया. #रामनवमी_२०२६
MR
23
54
196
9.9K
ठाणे ग्रामीण पोलीस | Thane Rural Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मार्च २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ४८ | राँग नंबर | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine March 2026 | Best Detection Story - 48 youtu.be/O7ZZPVsjJDw?si…
YouTube video
YouTube
4
20
33
3.5K