
🔥 6 एप्रिल 1980 रोजी स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष आज केवळ एक पक्ष नाही, तर भारताच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवणारी शक्ती ठरली आहे! माझ्या मते, भाजपच्या स्थापनेने भारतीय राजकारणात झालेले काही बदल असे :
• काँग्रेसच्या वर्चस्वाला पर्याय! दशकानुदशके चाललेल्या एकपक्षीय वर्चस्वाला भाजपने ठोस पर्याय दिला आणि खऱ्या अर्थाने जनतेला पर्याय व राजकारणात स्पर्धा निर्माण केली.
• विचारधारेवर आधारित राजकारण देशात सुरू झाले! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित राष्ट्रवाद, सांस्कृतिक अस्मिता आणि स्पष्ट विचारधारा, यामुळे 'विचारप्रधान राजकारण' बळकट झाले.
• घराणेशाही-बेस्ड तर खूप पक्ष स्थापन झाले, पण भाजपने कार्यकर्त्यांवर आधारित (केडर-बेस्ड) संघटना उभी करून ग्रासरूट राजकारणाला नवी दिशा दिली.
• शून्यातून सुरुवात करून आज भाजप पंचायत ते पार्लमेंट असा सर्वव्यापी विस्तार साधणारा स्वतंत्र भारतात स्थापन झालेला एकमेव पक्ष ठरला!
• अटल बिहारी वाजपेयी पासून नरेंद्र मोदी पर्यंत नेतृत्वकेंद्रित आणि निर्णायक राजकारणाला चालना मिळाली. फक्त टीम नाही, कॅप्टन पण महत्वाचा!
• मधल्या काळात खिचडी-सरकारांचे पेव फुटले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार करून भाजपने विविध पक्षांना एकत्र आणत स्थिर सरकारची संकल्पना मजबूत केली व भारतीय राजकारणाचा 'खिचडी' ते 'खीर' प्रवास सफल करून दाखवला.
• भाजप एकमेव पक्ष ठरला जो रिपोर्ट-कार्ड च्या भरवश्यावर व विकासाच्या अजेंडा जनतेचा कौल मागतो! हा सकारात्मक बदल भाजपने भारतीय राजकारणात आणला.
• सोशल मीडिया, डिजिटल कॅम्पेन वापरून निवडणुकीच्या पद्धतीत क्रांती घडवली ती भाजपनेच! भारताचा पहिला टेक्नॉलॉजी-फ्रेंडली पक्ष ठरला भाजप.
• भाजपच्या धोरणांमुळे राष्ट्रीय सुरक्षा व प्रखर राष्ट्रवाद हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनला! इतर पक्षांना तो कधी परवडलाच नाही.
थोडक्यात, भाजपची स्थापना हा केवळ एका पक्षाचा जन्म नव्हता... तर भारताच्या राजकारणात स्पर्धा, स्थिरता आणि स्पष्ट दिशेचा नवा युगारंभ होता! भाजप स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!🇮🇳

MR























