
meher bhurunde
116 posts

meher bhurunde
@MBhurunde
Apni Choti si Duniya 🌍 | Shopkeeping & Spirituality 🛒✨ | Bass & Gaming 🔊🎮



IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली! 21 वर्षात 24 बदल्या! प्रशासकीय सेवेतील अत्यंत डॅशिंग, शिस्तप्रिय आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारेअधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. आतापर्यंत कुठे कुठे बदल्या? वाचा सविस्तर news18marathi.com/maharashtra/ia… #news18marathi #TukaramMundhe

तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्याकडं आता मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही तीन खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते, त्यामुळं या विभागाला एकप्रकारे शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं. तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २३ ते २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. याचं मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप मोडून काढणे, थेट आणि कठोर निर्णय घेणे तसंच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेली पावलं कारणीभूत आहेत. ते नेहमीच 'नो-नॉनसेंस' दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळं राजकीय नेत्यांशी अनेकदा त्यांचा संघर्ष झालेला आहे.







दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची माहिती मिळाली. खरं म्हणजे मुंढे सरांसाठी बदली वगैरे हे काही विशेष नाही. मात्र दिव्यांगांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजणारे अनेक राजकारणी त्याचबरोबर अंध अपंगांचं भांडवल करून खिसे भरणाऱ्या अनेक संस्थांना आज निश्चित आनंद झाला असेल. मी स्वतः दिव्यांग सक्षमीकरणाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. मुंढे सरांच्या कार्यपद्धतीवर निश्चितपणाने वैचारिक मतभेद असू शकतात. असं असलं तरी या माणसानं मुळात निष्क्रीय असलेल्या या विभागात अनेक चांगले बदल घडवून आणले. प्रस्थापितांच्या नाकावर टिचून खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, हे अजिबात नाकारता येणार नाही. आज शासन प्रशासनात बहुतांश मंत्री, अधिकारी भ्रष्ट आहेत. त्यातल्या त्यात सरांचं काम त्या तुलनेत निश्चितपणानं सकारात्मक आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या बदली निर्णयाचा मी निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार म्हणून माझी असलेली भूमिका आपल्या गौरव मराठीच्या माध्यमातून लवकरच व्यक्त करेल. गौरव मालक

@RealBacchuKadu #TukaramMunde #MaharashtraPolitics #JusticeForDivyang #StopPoliticalTransfers @CMOMaharashtra @Dev_Fadnavis



@RealBacchuKadu #TukaramMunde #MaharashtraPolitics #JusticeForDivyang #StopPoliticalTransfers @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

Divya Chatbot & Voice Bot – making information accessible, simple, and instant for Divyangjan. Get scheme details, guidance, and support anytime, anywhere with user-friendly and inclusive digital assistance. #सशक्तदिव्यांगजन_समर्थभारत




