Eknath Shinde - एकनाथ शिंदे@mieknathshinde
माहूर (जि. नांदेड) येथील पावन तीर्थक्षेत्र श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीवर विराजमान असलेले, आध्यात्म, सेवा आणि सनातन हिंदू परंपरेचे तेजस्वी प्रतीक परमपूज्य महंत श्री मधुसूदन जी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.
सुमारे ४८ वर्षे त्यांनी संस्थानची जबाबदारी निष्ठेने सांभाळली. दत्तभक्तीचा प्रसार, धर्मसंवर्धन, भक्तांच्या सेवा आणि माहूरगडाच्या गौरवशाली परंपरेचे जतन यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले.
त्यांच्यात साधेपणा, आध्यात्मिक चिंतन आणि अथांग भक्तीभाव यांचा अद्भुत संगम होता. असंख्य भक्तांना त्यांच्या मार्गदर्शनातून आध्यात्मिक दिशा, संस्कार आणि जीवनमूल्ये मिळाली.
महाराजांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात एक दीपस्तंभ हरपला आहे. माहूरगड , मराठवाडा, महाराष्ट्र व संपूर्ण दत्तभक्त परिवाराची मोठी हानी झाली आहे.
दिवंगत महाराजांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि भक्तगणांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.
ॐ शांती... ॐ शांती... ॐ शांती...
#भावपूर्ण_श्रद्धांजली_मालक #माहूरगड