Baarish Vasant Date retweetledi

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबत नुकत्याच झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय वे-फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस आणि ग्राफिक्स बियॉन्डचे सहसंस्थापक बारिश दाते यांनी संपूर्ण आठवडाभर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत सिंहस्थ २०२७ साठी भाविकांच्या हालचालींचे स्वरूप आणि पायाभूत सुविधांचा अभ्यास केला.
कुंभमेळा प्राधिकरण अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींसमवेत या पथकाने प्रमुख भाविक मार्ग, घाट परिसर, पार्किंग क्षेत्रे, ट्रान्झिट पॉइंट्स तसेच साधुग्राम परिसराची पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वैज्ञानिक साईनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. #ntkma #simhastha2027

MR


























