Directorate of Higher Education, Pune

184 posts

Directorate of Higher Education, Pune banner
Directorate of Higher Education, Pune

Directorate of Higher Education, Pune

@DHE_Pune

The Directorate of Higher Education is a State Office functioning under the governance of the Department of Higher and Technical Education, Govt. of Maharashtra

Pune, Maharashra, India Katılım Ocak 2024
12 Takip Edilen360 Takipçiler
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांना सक्षम स्वायत्तता मिळवून देण्यासाठी आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेक अशासकीय अनुदानित महाविद्यालयांकडून खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय सर्व पैलूंचा सखोल विचार करून ठोस धोरण आखणे आवश्यक होते. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभवी अधिकारी सहभागी आहेत. समिती या प्रक्रियेतील सर्व कायदेशीर, शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून शासनाला योग्य शिफारसी सादर करेल. महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाल्यास संशोधनाला चालना मिळेल, जागतिक दर्जाचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. राज्यातील विद्यार्थ्यांचे हित, संस्थांची गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शासनाचे ध्येय आहे. #HigherEducation #MaharashtraEducation #EducationReforms #NewEducationPolicy @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
9
262
314
12.7K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठीच्या 'फी निश्चिती कार्यपद्धती'चा सर्वंकष आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारे ट्युशन फी (शिक्षण शुल्क) आणि शासनाकडून दिले जाणारे अनुदान या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांची पारदर्शकता जपली जावी, यावर आमचा मुख्य भर आहे. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर आणि विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 📍२८ एप्रिल २०२६ | मुंबई #HigherEducation #StudentWelfare #UniversityUpdates #विद्यार्थीहित #मंत्रालय @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
0
269
284
9.4K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये योग्य ती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित चर्चासत्रात सहभागी होत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक व प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असे यावेळी स्पष्ट केले. उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा मला विश्वास आहे. या चर्चासत्रास अपर मुख्य सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सुकाणू समितीचे सदस्य प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📍१६ एप्रिल २०२६ #NEP2020 #MaharashtraEducation #HigherEducation #EducationReform @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
MR
1
173
257
14.3K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आजच्या 'प्रभात' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखातून मी महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र आज 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' च्या अंमलबजावणीत देशात अग्रेसर आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करताना, ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, आमचा केंद्रबिंदू नेहमीच विद्यार्थी राहिला आहे. यंदा पदविका (Diploma) प्रवेशांनी १.०३ लाखांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, जे आमच्या प्रयत्नांचे यश आहे. नवी मुंबईत 'एज्युकेशन सिटी' उभारून जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रातच उपलब्ध करून देत, कौशल्यपूर्ण तरुण पिढी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #MaharashtraEducation #PrabhatNews #HigherAndTechnicalEducation #NEP2020 @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet media
MR
2
218
251
19.2K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आज मंत्रालय, मुंबई येथे माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेतला, तसेच यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, कोल्हापूर विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 📍८ मार्च २०२६ | मुंबई #उच्चवतंत्रशिक्षण #मंत्रालय #शिक्षणभरती #युवाशक्ती #MaharashtraEducation #JobRecruitment @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
2
253
285
19.5K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक नवे आणि क्रांतिकारी पाऊल! राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने आपण आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (Honours & Honours with Research) चौथे वर्ष लागू करण्यास आज शासन मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाची दारे खुली होतील. सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वेही (Guidelines) जारी करण्यात आली आहेत. #NEP2020 #HigherEducation #Maharashtra #EducationReform @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
9
248
358
21.9K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आज माझ्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले छात्रालय (चर्नी रोड, मुंबई) वसतिगृहाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती, कामाची गती तसेच उर्वरित कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विद्यार्थिनींसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त असे हे वसतिगृह उभारले जात असून, त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी कामाची गती वाढवून आवश्यक ती सर्व यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव प्रताप लुबाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 📍७ एप्रिल २०२६ | मुंबई #SavitribaiPhule #StudentHostel #Mumbai #EducationInfrastructure #GirlsEducation #मुंबई @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
0
259
283
9.3K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आज शासकीय निवासस्थान, मुंबई येथे माझ्या अध्यक्षतेखाली अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील पदभरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाविद्यालयनिहाय पदभरती मान्यतेसाठी पत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही त्वरीत करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 📍१८ मार्च २०२६| मुंबई #शिक्षण_विकास #उच्चशिक्षण #पदभरती #EducationReform #HigherEducation #Maharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
5
248
284
10.5K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
राज्यातील लेकींच्या पंखांना आता उच्च शिक्षणाचे बळ! 'महिला सक्षमीकरण' हा केवळ शब्द नसून, आमच्या सरकारचा ध्यास आहे. आज मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांच्या 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले' पुरस्कारांचे वितरण करताना मनाला अत्यंत समाधान वाटले. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील १२ मान्यवर कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली असून, आगामी काळात ती टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा आमचा मानस आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींची ट्युशन आणि परीक्षा फी आता पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पहिल्या वर्षी २८ हजार, तर यावर्षी तब्बल ५७ हजार मुलींनी व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घेतला आहे. वसतिगृह उपलब्ध नसल्यास विद्यार्थिनींना राहण्या-खाण्यासाठी मुंबईसारख्या महानगरात ६००० रुपये, कोल्हापूरसारख्या शहरात ५१०० रुपये आणि तालुकास्तरावर २८०० रुपये भत्ता दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी शिकता-शिकता स्वावलंबी व्हावे, यासाठी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार करून ती ५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुण्याच्या धर्तीवर महिलांसाठी 'लवचिक कामाच्या वेळा' आणि 'अर्धवेळ रोजगार' मॉडेल राज्यभर राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुरस्काराची रक्कम महत्त्वाची असतेच, पण त्यामागील सामाजिक मान्यता अधिक मोलाची आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! यावेळी मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. छगनजी भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, विलास नांदवडेकर तसेच विविध विद्यापीठांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 📍 १७ मार्च २०२६ | मुंबई #HigherEducation #WomenEmpowerment #महिला_सक्षमीकरण #SavitribaiPhuleAwards @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @ChhaganCBhujbal
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
1
254
274
9.9K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Shailendra Deolankar
Shailendra Deolankar@skdeolankar·
उच्च शिक्षण विभागाचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६ पारितोषिक वितरण समारंभ उच्च शिक्षण संचालनालयाला सांघिक विजेतेपद पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६ चा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना .चंद्रकांत दादा पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय म्हणाले की, “माणसाची मानसिक भूक वेळेत भागवली जाणे अत्यावश्यक आहे. केवळ अर्थार्जन करून चालत नाही; जोपर्यंत मनुष्य सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने प्रगल्भ होत नाही.” कविता लेखनाला प्रोत्साहन देण्याचा मनोदय व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “कल्पना केल्याशिवाय कविता सुचत नाही; त्यामुळे सर्जनशीलतेला वाव देणारे उपक्रम वाढवले पाहिजेत.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर , मा.चारुशीला गायके,सहसंचालक डॉ.अर्चना बोऱ्हाडे,सर्व सहसंचालक,उपस्थित होते. कार्यक्रमात क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्स या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना मंत्री महोदयांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुणे,सोलापूर,मुंबई,पनवेल,नागपूर, नांदे ड,जळगाव,अमरावती,उच्च शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी,अधिकारी, विभागीय सहसंचालक यांनी यामध्ये सहभाग घेतला. उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि विभागात स्नेहबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मंत्री महोदयांनी त्यांचे अभिनंदन केले व अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज अधोरेखित केली. या समारंभामुळे क्रीडा व संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला असून, सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Shailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet media
MR
0
1
4
266
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Shailendra Deolankar
Shailendra Deolankar@skdeolankar·
उच्च शिक्षण विभागामार्फत प्रथमच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी नेहमीच प्रशासकीय कामांमध्ये व्यग्र असतात. त्यांच्या दैनंदिन कामकाजात थोडा बदल मिळावा, तसेच त्यांच्यातील कला आणि क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे व त्या गुणांची जपणूक व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये परस्पर संवाद व ऐक्य वाढविण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महोत्सवात उच्च शिक्षण विभागात काम करणाऱ्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर,शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांची उपस्थिती होती. या दोन दिवसीय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विभागातील एकात्मता आणि सकारात्मकता वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
Shailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet media
MR
0
2
6
348
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Shailendra Deolankar
Shailendra Deolankar@skdeolankar·
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या सहयोगाने मॉडर्न महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कार्यशाळा संपन्न पुणे: २०, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग,प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त),शिवाजीनगर पुणे ५, आणि मुस्कान फाउंडेशन,जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा कार्यशाळा मॉडर्न महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी स्वागतपर भाषणात रस्ते सुरक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. सुरक्षित वाहतूक संस्कृती रुजविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्ते सुरक्षा कार्यशाळेच्या प्रास्ताविकात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासोबतच त्यांच्या सुरक्षेलाही उच्च शिक्षण विभाग प्राधान्य देत असल्याचे सांगितले. विविध महाविद्यालयांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणे आणि विद्यार्थी सुरक्षितपणे महाविद्यालयात येणे ही सुद्धा महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. उच्च शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वोतापरी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सर्व महाविद्यालयांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करावी, असे प्रतिपादन केले. विद्यापीठ परिसरात हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना प्रवेश दिला जात नाही, तसेच महाविद्यालयांनीही याबाबत कठोर नियम करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अकरावीपर्यंतच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना दुचाकी चालविण्यास परवानगी देऊ नये आणि ट्रिपल सीट प्रवासावर कडक कारवाई व्हावी, अशीही त्यांनी सूचना केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री.मनोज पाटील यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्या सहकार्यानेच रस्ते सुरक्षा प्रभावी होऊ शकते, असे ते म्हणाले. त्यांनी ‘PTP Traffic App’ इंस्टॉल करून वापरण्याचे आवाहन केले. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे फोटो अपलोड केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री त्यांनी दिली. सार्वजनिक सहभागाशिवाय वाहतूक समस्यांचे निराकरण शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक मा.श्रीधर लोणी यांनी रस्ते सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात महत्त्वाचे विचार व्यक्त केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले. प्रत्येक महाविद्यालयात CPR प्रशिक्षण सक्तीचे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अपघात घडल्यास रुग्णाला त्वरित कोणती प्राथमिक उपचार पद्धती अवलंबावी, कोणती काळजी घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात प्रत्येक संस्थेमध्ये सक्तीचा अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याबाबत त्यांनी उच्च शिक्षण विभागास विनंती केली. मुस्कान फाउंडेशनच्या नेहा खुल्लर आणि समीर नैनावत यांनी रस्ते सुरक्षा नियमांवर प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांनी कार्यक्रमात आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंतीमाला जाधव यांनी केले. कार्यक्रमास प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह मा.प्रा.ज्योत्स्ना एकबोटे ,सचिव प्रा.शामकांत देशमुख, स्टॅलेनटाईन इंडियाचे मा.पुनीत सभरवाल, मा सेबीसाची घोष, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि जबाबदार भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
Shailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet media
MR
0
3
5
349
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. #महाराष्ट्रशासन #HigherEducation #NEP2020 #प्राध्यापकभरती #MahaGovt #शैक्षणिकधोरण @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
1
189
274
12.1K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
अशासकिय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ अध्यापक पद भरती प्रक्रियेस मान्यता! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने राज्यातील अशासकिय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ अध्यापक पद भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. #उच्चशिक्षण #प्राध्यापक_भरती #NEP2020 #AssistantProfessorRecruitment #EducationMatters @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
7
202
307
14K
Directorate of Higher Education, Pune
संकटातून संकल्पाकडे महाराष्ट्रातील महाविद्यालयांचे पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीचे योगदान समाजकार्य करणारे आणि समाजाप्रती संवेदना दाखविणारे घटक म्हणजे महाविद्यालये : मा.ना. चंद्रकांत (दादा) पाटील उच्च शिक्षण संचालनालय, पुणे आणि मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्यावतीने आयोजित पूरग्रस्तांसाठी मदत केलेल्या महाविद्यालयांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. समाजाप्रती सहवेदना दाखवणे हे आपले काम आहे; आणि, याच सामाजिक बांधिलकिने आपण सतत सकारात्मक काम केले पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केले. पूरपरिस्थितीमधे अडकलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक_मित्र योजनेतून २० महाविद्यालयांना या मदतीसाठी नेमून ही मदत पूरग्रस्त भागापर्यंत पोहचवली. या महाविद्यालयांचे कौतुक मंत्रीमहोदयांनी केले. मॉडर्न महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयांनी पूरग्रस्त भागात केलेलं काम हे समाजाप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे, असे ते म्हणाले. यावेळी २० महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्त मदतीवर आधारित तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले. यासाठी डॉ. वैजयंतीमाला जाधव, डॉ. शांतश्री सेनगुप्ता आणि मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शिक्षणाचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. त्याच्या पाठीशी सर्व शैक्षणिक संस्था नेहमीच उभ्या राहतील, असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.प्रा.(डॉ) गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले. पूरग्रस्तांसाठी मदत करण्याची महाविद्यालयाला मिळालेकी संधी ही ईश्वरी संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण समन्वयक डॉ. प्रशांत मगर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह मा.प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना बोऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैजयंती जाधव यांनी केले. यादीवाचन डॉ.शांतश्री सेनगुप्ता यांनी केले.
Directorate of Higher Education, Pune tweet mediaDirectorate of Higher Education, Pune tweet mediaDirectorate of Higher Education, Pune tweet mediaDirectorate of Higher Education, Pune tweet media
MR
0
0
0
180
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
📍 २९ ऑक्टोबर २०२५ | मुंबई नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी), शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “नागपूर पुस्तक महोत्सव – २०२५” या भव्य सोहळ्याच्या पोस्टरचे प्रकाशन आज शासकीय निवासस्थान, मुंबई येथे माझ्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदान, नागपूर येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे. देशभरातील प्रकाशक, लेखक, साहित्यप्रेमी आणि वाचकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असून, हा महोत्सव “पुस्तक संस्कृतीचा उत्सव” म्हणून साजरा होणार आहे. सर्व पुस्तकप्रेमींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले. या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, आणि ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर उपस्थित होते. #NagpurBookFestival2025 #BookCulture #ReadingIndia #पुस्तकमहोत्सव२०२५ #नागपूर_पुस्तक_महोत्सव #साहित्यसंस्कृती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
3
228
238
8.4K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
📍 २८ ऑक्टोबर २०२५ | मुंबई आज मंत्रालय येथे माझ्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांमधील प्राध्यापक पदभरती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान प्राध्यापक पदभरती प्रक्रियेत गती येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते. #विद्यापीठ_विकास #प्राध्यापक_पदभरती #शिक्षण_विभाग #MaharashtraEducation #HigherEducation @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
12
229
250
11K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Shailendra Deolankar
Shailendra Deolankar@skdeolankar·
उच्च शिक्षण सहसंचालकांना प्रशिक्षण उच्च शिक्षण विभागात पहिल्यांदाच राज्यातील नवनियुक्त विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) व सहसंचालक (प्रशासन) या नवनियुक्त अधिकारी यांच्याकरिता दिनांक ०७ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते करण्यात आले. मा. मंत्री महोदयांनी सर्व नवनियुक्त विभागीय सहसंचालक यांचे प्रथम अभिनंदन करून बहुमूल्य असे मार्गदर्शन ही केले. प्रशिक्षण कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सुरुवातीस उच्च शिक्षण प्रणाली, संचालनालयाची रचना व कार्यपद्धती या विषयावर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अमलबजावणी संदर्भात मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले. उद्घाटनपर सत्रानंतर कॅस पदोन्नती, न्यायालयीन प्रकरणे हाताळणी, सहसंचालक स्तरावरील वित्तीय बाबी, वित्तीय नियम, अर्थसंकल्प, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, खाजगी विद्यापीठ कायदा, समूह विद्यापीठ मार्गदर्शक तत्त्वे, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, NPS/UPS/GPF , e-Office कार्यप्रणाली, स्कॉलरशिप, अनुदान निर्धारण अश्या विविध विषयांबाबत त्या त्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी तज्ज्ञ साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रशिक्षण दिवसाच्या शेवटच्या सत्रानंतर दिवसभर च्या विषयांवर आधारित चार ते पाच प्रश्न आधारित प्रशिक्षणार्थी अधिकारी यांची परीक्षा आयोजित करण्यात येत होती. प्रशिक्षणच्या शेवटच्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मा. अपर मुख्य सचिव, मा. उपसचिव, विधी अधिकारी यांनी ही सर्व सहसंचालक प्रशिक्षणार्थी यांना उच्च शिक्षण प्रशासन, दैनंदिन कार्यवाही, न्यायालयीन प्रकरणे संदर्भात मार्गदर्शन केले.
Shailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet mediaShailendra Deolankar tweet media
MR
0
2
7
363
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
📍१४ ऑक्टोबर २०२५ | मुंबई आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ठोस योजना आखण्याचेही आवाहन केले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव श्री. प्रताप लुबाळ, कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. #मुक्तविद्यापीठ #उच्चशिक्षण #DigitalEducation #Mumbai @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
3
216
233
9.3K
Directorate of Higher Education, Pune retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
📍 १४ ऑक्टोबर २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या विषयांवर, प्रलंबित प्रश्नांवर तसेच विभागांच्या महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व विभागांनी अधिवेशनाच्या कामकाजासाठी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त श्री. दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक श्री. विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक श्री. अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव श्री. अशोक मांडे, उपसचिव श्री. प्रताप लुबाळ, सहसचिव श्री. संतोष खोरगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. #हिवाळीअधिवेशन२०२५ #महाराष्ट्रशासन #EducationForAll #HigherEducation #SkillDevelopment #Maharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
8
221
241
9.7K