DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN

32.9K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN banner
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN

@InfoDivKonkan

Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra

NAVI MUMBAI, INDIA Katılım Haziran 2016
235 Takip Edilen10.8K Takipçiler
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
9
2
486
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 काटेवाडी, #बारामती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून #मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी यावेळी केले. #पोटनिवडणूक #मतदान
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
11
21
963
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision ⏩ महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड #बायोगॅसधोरण,२०२६ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शहरांतील कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पध्दतीने लावणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर कचरा साठविण्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या, पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस च्या गरजेनुरूप वापरण्यायोग्य गॅस उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रकल्प पीपीपी आणि हायब्रि़ड अँन्युएटी तत्वावर राबविण्यात येणार आहे. हे धोरण कचऱ्याचे ऊर्जा आणि खतामध्ये रूपांतर करून रोजगार आणि संपत्ती निर्माण करणारे आहे. ⏩ राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन, देण्याचा तसेच या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यासह, आर्थिक तरतुदींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत राज्यात जालना जिल्ह्यात घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्न), #बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), #रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), #हिंगोली (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), #गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), #रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि #सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे (मुंबई विद्यापीठ मुंबई, संलग्न) अशी सात आदर्श महाविद्यालये कार्यरत आहेत. ⏩ #सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२.५५ हेक्टर आर.जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही जमीन एमआयडीसीला शेत जमिनीच्या दराने देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यासह परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी यासाठी मौजे नागेवाडी (ता.सातारा) येथे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. ⏩ महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधिनियम, १९६१ नुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याकरीता अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास व त्यासाठीच्या #महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करणे) नियम, २०२६ ला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या १ लाख ७३ हजार ५६०.४ हे. आर जमिनीशी संबंधित १ लाख ९ हजार ८६८ लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
9
19
1.4K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ​जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संध्या स. साळुंखे यांचे आवाहन. महिलांनी शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यावा. #NariShaktiVandan
MR
0
0
1
54
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
देशाच्या विकासात महिलांचा ५०% सहभाग होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते पण त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ठोस इच्छाशक्ती दाखवली- CMO @Dev_Fadnavis.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN tweet media
MR
0
0
0
49
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
तुमच्या मुलाचा 'स्क्रीन टाइम' आजच कमी करा! 📵 तंत्रज्ञानाच्या युगात आपली मुले मोबाईलमध्ये हरवत चालली आहेत का? या पोषण पंधरवड्यात संकल्प करूया: 👉 मुलांना मोबाईलऐवजी गोष्टी सांगा. 👉 त्यांच्यासोबत खेळ खेळा. 👉 अंगणवाडीतील खेळ आधारित शिक्षणात सहभागी करा. ​#NariShaktiVandan
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN tweet media
MR
0
2
2
175
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
लक्ष द्या! दि.९ ते २३ एप्रिल - ८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा. बालकांचा बौद्धिक विकास आणि योग्य आहार. मुलांचा मोबाईल/टीव्ही वेळ (Screen Time) कमी करा, मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या! चला, सुदृढ आणि बुद्धिमान महाराष्ट्र घडवूया! #NariShaktiVandan
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN tweet media
MR
0
0
0
62
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
प्रमुख आकर्षणे: ३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मेंदू विकास उपक्रम. खेळातून पूर्व शालेय शिक्षण (३ ते ६ वयोगट). मुलांचा 'स्क्रीन टाइम' कमी करण्याचा संकल्प. माता आणि बालकांचे उत्तम पोषण. ​अंगणवाडी केंद्राशी जोडून घ्या आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहभागी व्हा!
MR
0
0
0
59
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
बालकांचा बौद्धिक विकास, हीच राष्ट्राची प्रगती! दि.​९ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरा होत आहे '८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा'. बालकांच्या आयुष्यातील पहिली ६ वर्षे त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. चला, आपण सर्व मिळून सुदृढ पिढी घडवूया!#NariShaktiVandan
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN tweet media
MR
1
0
2
171
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण #पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. @Pankajamunde
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
11
30
2.3K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
“जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा. भीती पोटी आगाऊची खरेदी टाळावी. घरपोच गॅस सिलेंडर पोहचविण्याचे एजन्सींना निर्देश. त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई.” - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद @CMOMaharashtra @cbawankule @airnewsalerts @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR tweet media
MR
0
1
2
110
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय #नाबार्ड च्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या मुलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि रत्नागिरी येथील विविध ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेत नाबार्डचा ९५ टक्के तर राज्याचा हिस्सा ५ टक्के असा असतो. यासाठी नाबार्डकडे सादर झालेल्या प्रस्तावातील काम पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावरील कामांसाठी हा ६१ कोटी २४ लाख रूपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दिवाळे गाव, रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला, दिघी, राजपूरी, नांदगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू, रत्नागिरी जिल्ह्यातील वेलदूर यांसह पाचू बंदर, बोऱ्या आणि चिंबई यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या कामांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. #CabinetDecision
MR
1
1
8
805
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या मंजूर विकास आराखड्यातील मौजे कात्रप येथील स्टेडियमसाठी आरक्षित जमिनीपैकी चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर परिसरातील वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता टाटा पॉवर कंपनीस उपकेंद्र उभारण्यास उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीची शिफारस केली आहे. या ठिकाणी टाटा पॉवर कंपनी ११०/२२ के.व्ही. क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारणार आहे. त्यानुसार मौजे कात्रप येथील स्टेडियमसाठी आरक्षित भूखंडापैकी चार एकर जागा टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. #CabinetDecision
MR
1
2
8
1.1K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. #CabinetDecision
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
26
90
7.3K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. जयंती दिनानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. याचबरोबर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील. एक्स - x.com/mahadgipr फेसबुक - facebook.com/MahaDGIPR यू ट्यूब - youtube.co/MAHARASHTRADGI…
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
4
134
532
9K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. @Dev_Fadnavis #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
17
27
2.1K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. @SunetraA_Pawar #आशाभोसले
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
9
8
606
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या 'पद्मविभूषण', महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता आशाताईंच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणतात. आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, आज प्रत्येक रसिकाच्या मनात एकच आर्त साद उमटत आहे "अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं". आशाताईंनी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं की, त्या कधीतरी आपल्याला सोडून जातील ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांच्या आवाजातील तोच उत्साह आणि तीच तरलता आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही. आशाताई गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे. महाराष्ट्र आणि मराठी मातीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. मराठी भावगीतांना त्यांनी जे वैभव मिळवून दिले, त्यासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. @mieknathshinde #आशाभोसले
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
9
6
585
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२,००० वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. @Dev_Fadnavis #आशाभोसले
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
11
17
695
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
जिल्हा माहिती कार्यालय, पालघर - ई-मेल- diopalghar@gmail.com, राम गोंदके- मो. 7021156414 जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- ई-मेल- dioraigad@gmail.com, विठ्ठल बेंदुगडे- मो. 9527436759 जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी- ई-मेल- ratnagiridio@gmail.com, योगेश मोडसिंग- मो. 9021636913
MR
0
0
0
28
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
विभागीय माहिती कार्यायल,कोंकण भवन,नवी मुंबई ई-मेल आयडी-ddikon12@gmail.com, प्रविण डोंगरदिवे-मो. 869309666 जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे – ई-मेल आयडी- diothane2013@gmail.com, अविनाश सकपाळ- मो. 8369707572
MR
1
0
0
30
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दि. 09एप्रिल, 2026 पासून पुढील 15दिवस 'महिला सक्षमीकरण' मोहिमेअंतर्गत व्यापक प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN tweet media
MR
1
0
1
78