DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
39.7K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
@InfoDivPune
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
पुणे.Pune, India Katılım Haziran 2016
30 Takip Edilen44.5K Takipçiler

विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR) ही मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करुन ती निर्दोष करण्याची प्रक्रिया आहे.
#SIR2026
#Electoralrolls

MR

पुण्यात ४०० कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होणार-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
•राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार

MR

एक पाऊल प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी!
देशाचे जबाबदार नागरिक बनूया, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पाळूया..
#maharashtra

MR

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६ -'चला विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!'
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ मे २०२६
#CMFellowship2026
#YouthEmpowerment

MR

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६
📅 महत्त्वाच्या तारखा चुकवू नका! वेळेत तुमची माहिती पडताळा.
🌐 voter.eci.gov.in

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE retweetledi

‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बदलता महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ‘ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना’
#AMRUT
#SkillDevelopment

MR

'जनगणना २०२७'च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची नोंदणी होत आहे. यादरम्यान आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना योग्य ती माहिती द्या.
आमची जनगणना, आमचा विकास !
#Census2027
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE retweetledi

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ८० टक्के पेट्रोल पंप इंधनटंचाईमुळे बंद असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत अफवा पसरल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी केली. परिणामी पेट्रोल पंपावरील इंधन संपले. तसेच, पुणे जिल्ह्याच्या काही भागांना इंधनपुरवठा करणारे डेपो रविवारी नियमितपणे बंद असल्याने, वाहनधारकांना काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद दिसले आणि काही ठिकाणी इंधनटंचाईचे फलक लावलेले आढळले.
#IOC, #HPCL आणि #BPCL या इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे पेट्रोल डीलर्स संघटनांनी स्पष्ट केले आहे.
#Petrol
#Diesel ⛽

MR

आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या! - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR
आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया; चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन @Dev_Fadnavis #IndiaFirst #VocalForLocal #AtmanirbharBharat
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE retweetledi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध ‘तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती’ची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून #तीर्थक्षेत्रविकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्यसुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकास आराखड्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली तीर्थक्षेत्र :
🔸 ‘श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव’ विकासासाठी ₹ १७२.२२ कोटींची तरतूद
🔸 ‘संत तुकाराम महाराज जन्मस्थाना’च्या संवर्धनासाठी ₹ ४१.७१ कोटींची तरतूद
🔸 ‘किल्ले अजिंक्यतारा’ जतन आणि संवर्धनासाठी ₹ १३४.८० कोटींची तरतूद
🔸 ‘संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ’ संवर्धन प्रकल्पासाठी ₹ १३३ कोटींची तरतूद
🔸 ‘श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास’ आराखडा (वेरुळ)साठी ₹ २१०.४५ कोटी तरतूद
🔸 ‘श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर’ परिसर विकासासाठी ₹ ३०१.५४ कोटींची तरतूद
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar



MR

दुसऱ्या ‘#पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’चे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते पारितोषिक वितरण. शेती अधिक शाश्वत करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत- मुख्यमंत्री
MR








