
D'Jay Shinde
26 posts



Caught red-handed! First in queue at railway counter, OTP verified twice, yet ticket given to a broker. Staff arguing when confronted. Tatkal scam still thriving.

आमरस with मेदु वडा deadly combination 🔥












#Thread वेदश्री - नम्रपणे मी महात्मा फुले बद्दल काही माहिती दिली आहे. त्यात कोणतेही खोटं नाही. सर्व बाबी पुरावेबद्ध आहेत. आशा आहे तू वाचशील. सत्यशोधक समाजाच्या सदस्य नोंदणी अथवा दीक्षा - खंडोबाची तळी उचलून, कपाळी भंडारा व गुलाल लावून होते. फुले अवैदिक होते. नास्तिक नव्हते. बळीराजा, म्हसोबा, खंडोबा, जोतिबा, बाणाई , भवानी, अंबाबाई ही सगळे खरेखुरे असून ते बहुजनाचे पूर्वज आहे, दैवत आहेत. असं त्यानी गुलामगिरी ग्रंथात मांडल आहे. आजही आपण जेव्हा देवाचे टाक बनवतो त्यात पूर्वजाचे टाक असतात. ही सर्व दैवत आपले पितर - पूर्वज आहेत. [ ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात साध्य हे पितरच पहिले देव असल्याचे म्हटले आहे – ‘यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः’ ॥ १०.९०.१६॥ ] महात्मा फुले ईश्वर मानत, त्याला ते निर्मिक म्हणत. फुले एकेश्वरवादी होते. ते म्हणत हे जग बनवणारा तो निर्मिक एकच आहे. त्यानी सुंदर सृष्टी बनवली, त्यात आपण स्त्रीपुरुष भेदभाव , जातीभेद, धर्मभेद पाळला नाही पाहिजे. सर्वानी प्रेमाने राहील पाहिजे. फुले त्यांच्या कवितेत म्हणतात - धर्म राज्य भेद मानवा नसावे । सत्याने वागावें । ईशासाठीं ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशीं । बंधुपरी निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठीं ? ॥ महात्मा फुलेंनी पहिला - ज्या विधवेचा पुनर्विवाह लावून दिला - तो शेणवी ब्राह्मण या महिलेचा होता. फुल्यानी काशिबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेऊन, त्याचा सांभाळ केला, त्याला डॉ बनवले. सावित्रीबाई फुले यांनी काव्यफूले पुस्तकात - हिंदूंचे दैवत शिवशंकर पार्वती वर सुंदर कविता केल्या आहेत, त्यापैकी एक --- नमन तुला । शंकरा । श्रीधरा ॥ धृ ॥ नीलकंठ शिवशंभू सदाशिव तुजिया चरणी आमचा भाव अज्ञानी लेकरा । उद्धरा ॥ आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो दैन्यासुर संहारा । श्रीधरा ॥ फुले जोडप्याने नेहमी माणुसकी प्रेमासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. दुष्काळात त्यानी अन्नछत्र चालवली, अनाथआश्रम, विधवासाठी आश्रम, मुलींसाठी शाळा, बहुजन मुलासाठी शाळा काढल्या. फुलेंनी जेव्हा मुलीची शाळा काढली तेव्हा त्यात फक्त बहुजन मुली नव्हत्या , त्यांची नावसहित यादी अन्नपूर्णा जोशी (वय पाच वर्षे), सुमती मोकाशी (४ वर्षे), दुर्गा देशमुख (६ वर्षे), माधवी थत्ते (६ वर्षे), सोनू पवार (४ वर्षे), जनी कर्डिले (५ वर्षे) या सहा ब्राह्मणा-धनगर-मराठा मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला होता. फुले दांपत्य इंग्रजाचे हस्तक होते असा आरोप होतो, पण त्यानी शेतकऱ्याचा आसूड मधे इंग्रजावर भयानक टीका केली आहे. हे पुस्तक छापण्यासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी मोठी मदत केली होती. टिळक आगरकर या देशभक्त क्रांतिकारकानी इंग्रजा विरोधात आंदोलन केले तेव्हा त्याना अटक झाली, त्यावेळी त्यानी आपल्या मित्राकरवी पैसे भरून जामीन केला होता. आगरकर यांनी केसरी मध्ये त्याची दखल घेतली आहे. फुले आणि न्यायमूर्ती रानडे यानी स्वामी दयानंद सरस्वती जेव्हा पुण्यात येणार कळले की त्याना पुण्यात प्रतिगामी लोककडून मोठा विरोध झाला, तेव्हा फुले रानडेनी दयानंद सरस्वती यांची यशस्वी मिरवणूक काढली. भिडे या सत्यशोधक ब्राह्मण गृहस्थानी शाळेसाठी जागा दिल्याचे सर्वांना माहीत आहे. पण त्यानी जागा सोबत त्याकाळी 100 रुपये मदतही केली होती. जोतीराव फुले ब्राह्मण विरोधी , हिंदू विरोधी असते तर त्याना या ब्राह्मण लोकानी मदत केली नसती. रानडे आगरकर हे फुलेंना समकालीन होते त्यानी कधिही लिहल नाही की फुले ब्राह्मण विरोधी आहेत. ही त्यांची बदनामी आहे. जी प्रतिगामी लोकानी केली आहे. फुलेंना विरोध करणारे बहुजना मधलेही अनेक प्रतिगामी होते. हे नवीन सांगण्याची गोष्ट नाही. परंतु नंतरच्या काळात सत्यशोधक चळवळ - ब्राह्मणेतर चळवळ झाली व त्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी उभी फळी पडली. महात्मा फुले - सावित्रीबाई फुले कधीही नास्तिक नव्हते. एवढंच काय तर बहुजनाचे जवळपास सगळे महापुरुष हे आस्तिक होते. फरक इतकाच की ते वैदिक नव्हते. संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत तुकडोजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील. ताराबाई शिंदे, किंवा संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखा मेळा यापैकी कुणी नास्तिक नव्हते. ( पंजाबराव देशमुख त्यानी ऑक्सफर्ड मधून ‘द ओरिजिन ॲण्ड डेव्हलपमेन्ट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’ महर्षि शिंदेंनी - तुलनात्मक धर्म म्हणून ऑक्सफर्ड मधून डॉ मिळवली होती) पुरोगामी म्हणजे नास्तिक असतो, असा त्याचा अर्थ होत नाही. धन्यवाद 🙏


फोटो, दिवा , फुले अर्पण 🫠 जोतीराव फुले यांनी काही केलं असेल नसेल एका मोठ्या प्रवाहाला Identity Crisis मध्ये मात्र नक्की ढकललं आहे !








