Kailas V Bilonikar
290 posts


@dr_prashantsb लग्न लागल्यानंतर गावात गावात नवरा नवरी आले की निघते ती वरात.. आख्खे गांव शुभेच्छा.. आशीर्वाद द्यायचे
MR

पूर्वीच्या काळी ७-८ दिवस लग्नकार्य चालत असे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण त्या लग्नात वर वधूंची तीनवेळा मिरवणूक निघत असे हे मला आज पहिल्यांदा कळले. लग्न लागण्याच्या वेळी निघते त्याला वरात म्हणतात हे सर्वांनाच माहिती आहे मग हळद लागल्यानंतर नवरानवरी यांची जी मिरवणूक काढली जायची त्याला काय म्हणायचे ? आणि लग्न लागल्यानंतर रात्री आणखी एक वाजतगाजत गावातून मिरवणूक काढायचे त्याला काय म्हणायचे ? कोणी सांगू शकेल काय ?
MR

“तुम्ही कमकुवत व्यक्ती आहात का?” हे ओळखण्यासाठी १२ लक्षणे
1.कशालाही आणि कोणालाही “नाही” म्हणायची भीती वाटते, नाही म्हणण्याची तीव्र ईच्छा असतानाही होकार देणे.
2.अश्लील सामग्रीचे (पोर्नचे) व्यसन.
3.स्वतःला नेहमी बळी (Victim), अन्यायग्रस्त ( आणि हतबल, दुर्बल) समजण्याची मानसिकता.
4.स्वतःच्या व्यसनांचे गुलाम बनणे.
5.कायम इतरांबद्दल गॉसिप/चहाडी करणे.
6.टीका नीटपणे स्वीकारता न येणे.
7. इतरांच्या प्रभावाखाली सहज येणे.
8.निर्धार केल्यावर कृती करण्यासाठी शिस्तीचा अभाव, कृती करण्यात अपयश.
9.स्वतःच्या दुःखी आयुष्याला इतरांना दोष देणे.
10.सर्वकाहीपेक्षा सुखालाच (pleasure) प्राधान्य देणे, सुखलोलुप वृत्ती.
11.स्वतःच्या कृतींची जबाबदारी न घेणे.
12.कमी आत्मसन्मान आणि कमी आत्मविश्वास.
अधिक लोकं इंटरेस्टेड आहेत असे दिसल्यास यावर मात करण्याचे सोपे सोपे आणि सहज अनुकरणीय उपाय पोस्ट करतो.
डॉ प्रशांत भामरे.
MR

@dr_prashantsb Very good... Iam also planning Vipasyana in January
English

रविवार दिनांक ७ डिसेंबर पासुन छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत ज्या मार्गाने प्रवास केला होता त्याच मार्गाने बाय रोड प्रवास करून त्या सर्व स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रम काही मित्रमंडळींसोबत आखला आहे. अगदी वेळेचे काटेकोर बंधन न ठेवता ते क्षण, तो इतिहास अभ्यासण्याचा अनुभवण्याचा मानस आहे त्यामुळे १० ते १५ दिवसांचे नियोजन केले आहे.
MR

आपल्याकडे घरात तसेच समारंभांमध्ये जेवणात पनीरची भाजी वापरण्याचा खूप जास्त प्रघात निर्माण झाला आहे. सर्रास प्रत्येक सार्वजनिक जीवनात दोन भाज्यांपैकी एक भाजी पनीर मसाला ही असते. आपल्याकडे 80% पेक्षा जास्त पनीर हे अनलॉग पनीर असते म्हणजे ते खरोखर दुधापासून बनलेले नसते. अशा परिस्थितीत जर आपण पनीर ऐवजी सोयाबीन पासून बनलेले टोफू वापरायला सुरुवात केली तर आपला भेसळयुक्त अन्नापासून बचाव होईल, पौष्टिक प्रथिने युक्त अन्न मिळेल तसेच सोयाबीनची मागणी वाढून सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
MR

सिनिअर सिटीझन्स पालकांचे एकाकीपण
७० रिच्या दशकात बहुतांश कुटुंबांनी फॅमिली प्लॅनिंगचा स्वीकार केला. परिणामी सर्रास बहुतांश कुटुंबे ही चौकोनी म्हणजे आई वडील मुलगा मुलगी अशा स्वरूपातली आहेत. पण त्याचे वेगळेच सामाजिक परिणाम आता दिसू लागलेले आहेत. अशा चौकोनी कुटुंबातील मुले एकतर कॉस्मोपॉलिटन किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित होऊन स्थायिक झालेली आहेत. मुली लग्न होऊन किंवा नोकरी निमित्त किंवा दोन्ही मुळे इतर शहरांमध्ये स्थायिक झालेले आहेत.
आता मूळ गावांमध्ये साठी पार केलेले आई-वडील असे दोघेच शिल्लक आहेत. मुला-मुलींच्या शहरांमध्ये त्यांचे फारसे मन रमत नाही कारण एक तर त्यांची इकोसिस्टीम, सोशल वॉटरिंग होल्स, मित्रमंडळी, नातेवाईक हे सर्व लहान शहरे अथवा गावांमध्ये आहेत आणि मुले स्थायिक झालेल्या शहरांमध्ये त्यांच्या ओळखी पाळखिचे कोणी नसल्यामुळे ते आणखीनच जास्त एकटे पडतात किंवा निव्वळ घरात कोंडून पडतात म्हणून ते जास्त काळ त्या अनोळख्या ठिकाणी राहू शकत नाहीत.
पण यातून एक मोठी समस्या निर्माण होते. या आई-वडिलां जवळ किंवा त्यांच्या सोबत राहायला कोणीही अपत्य नाही. गाव खेड्यात राहणाऱ्या अशा वयोवृद्ध पालकांची अवस्था तरी जरा बरी आहे कारण गाव खेड्यामध्ये एकमेकांशी संपर्क व स्नेहबंध थोडा अधिक घट्ट असतो. तसेच तुलनेत अतिशय जवळचे नातेवाईकच किंवा भाऊबंद आजूबाजूला राहत असतात त्यामुळे अगदी टोकाचा एकाकीपणा नसतो. पण टू थ्री टायर शहरांमध्ये नोकरी करून निवृत्त झालेल्या किंवा तिथे स्थायिक असलेल्या वयोवृद्ध पालकांच्या बाबतीत मात्र हा एकाकीपणा अतिशय जास्त आहे, टोकाचा आहे. मित्रमंडळी किंवा संबंधित जरी त्या गावांमध्ये असले शहरांमध्ये असले तरी घरात व कुटुंबात असलेले सदस्य व त्यांच्याशी इंटरॅक्शन, भावविश्व यांचे वेगळे मूल्य आहे. त्यामुळे बाहेर कितीही परिचित लोक असले तरी घरी आल्यावर फक्त नवरा-बायको दोघेच असणे हे भयानक मानसिक तणाव निर्माण करणारे असते. आणि तसेही दिवसाच्या उपलब्ध वेळापेकी बाहेर व्यतीत होणारा वेळ कमी असतो त्या तुलनेने दिवसाचा बहुतांश भाग हा घरातच जातो.
एकाकीकपणाची भावना निराशा, असमाधान निर्माण करते. बहुतांश वेळ घरातच जात असल्यामुळे त्याचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जातो. जुनी माणसे सोशिक व समजदार असल्यामुळे तसे दिसू देत नाहीत किंवा जाणवू देत नाहीत. पण त्यांना त्या गोष्टीचा भयानक त्रास होत असतो. कारण कितीही योग्य असले तरी आपली लाडाकोडाची सख्या रक्ताची माणसे आपल्या सोबत नाहीत ही भावना जाचक असते. एकेकाळी नांदती गोकुळे पाहिलेल्या नजरेला ते अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसातून दहा वेळा केलेले फोन अथवा व्हिडिओ कॉल ती कमतरता भरून काढू शकत नाहीत. या समस्येवर कसे समाधान शोधावे हा खरोखर गहन गंभीर प्रश्न आहे.
मला माझ्या घरात सुद्धा अशीच परिस्थिती निदर्शनास आली. या दिवाळीत आमच्या घरी बहीण मेव्हणे भाचे मी माझी सहचरणी दोन्ही मुले यासह आलो. दिवाळीचे चार-पाच दिवस अगदी गजबजलेले, उत्सव, आनंदाचे वातावरण होते. दिवसभर खाणे पिणे खेळ एकत्रित चित्रपट पाहणे हास्यविनोद असा भरगच्च कार्यक्रम होता. पण शुक्रवारपासून हळूहळू प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघून गेला. मी उद्या निघून जाईल. पण मी काल परवापासून आई वडिलांच्या चेहऱ्यावर त्या भावना त्या एकाकीपणाच्या छटा स्पष्ट वाचू शकतो. मी म्हणालो की चला आमच्याबरोबर मुंबईला काही दिवस राहून परत या. तर ते आमच्या नात्यात या महिन्यात एक लग्न आहे ते आटोपून आम्ही नातवाच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील वाढदिवसाला येतो म्हणून आत्ता नको असे म्हणत आहेत. पण हे सुद्धा तात्पुरते समाधान आहे. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ते आल्यानंतर पंधरा-वीस दिवस फार फार तर महिना आमच्याकडे राहतील. पण परत त्यांना तिथेही फारसे करमत नाही. पंधरा दिवसानंतर त्यांना गावाकडे परत येण्याची ओढ लागते. पण इकडे आल्यावर परत तोच एकाकीपणा निर्माण होतो.
हळूहळू ही मोठी समस्या निर्माण होणार आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. आपणही वरील प्रमाणे कुटुंब व्यवस्थेचा भाग असाल तर बारकाईने पाहिल्यास आपल्याही कुटुंबात ही समस्या आपल्या लक्षात येईल.
डॉ प्रशांत भामरे.
MR

अनपेक्षित घटना आणि आपण -
आयुष्य हे अनपेक्षित घटनांनी भरलेले आहे. आपल्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडतात किंवा घडलेल्या घटना आपल्या अपेक्षेनुरूप नसतात. आणि हे आपल्या आयुष्यात कमीजास्त प्रमाणात पावलोपावली क्षणोक्षणी घडत असते. हे कधीतरी एकदाच घडते असे नव्हे. अशावेळी आपली मानसिकता अतिशय विचित्र गोंधळलेली असते. आपण आयुष्यात आनंदी नसण्याचे हे एक अत्यंत प्रमुख कारण असते.
पण अशा प्रसंगात दोनच प्रतिसाद अस्तित्वात असतात. आपण कोणता निवडतो यावर आपली क्वालिटी ऑफ लाईफ अवलंबून असते.
१) साधारण, सर्वसामान्य प्रतिसाद
नशिबाला दोष देणे, चिडचिड, रागराग, निराशा, कमीपणाची भावना, व्यसनाधिनता, इतरांना दोष देणे. कर्मकांडाच्या नादी लागणे. पलायनवादी भुमिका घेणे, हतबल होणे.
यामुळे आपल्या त्रासात वाढ होते, अपेक्षित बदल होत नाहीत. म्हणून वारंवार अपयश, कमी यश, निराशा, अगतिकता या दुष्टचक्रात अडकावे लागते. कायम व्हिक्टीम, दुःखी, काष्टी मानसिकता असते. योग्य मार्ग दिसत नाही, सापडत नाही.
२) असाधारण, असामान्य प्रतिसाद
झालेल्या बाबीची पुर्ण व कारणविरहित जबाबदारी स्वीकारणे.
आपण काय करायला पाहिजे होते किंवा करायला नको होते हे कबुल करून त्याचीसुद्धा संपुर्ण जबाबदारी स्वीकारणे.
त्यासाठी सुद्धा कोणतेही कारण, सबब देऊ नये.
म्हणजे मी मेडिटिशन, व्यायाम करायला पाहिजे होता तो मी केला नाही हे माझे चुकलेच पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणुन जमले नाही असे म्हणायचे नाही. तर मी ते केले नाही याची संपुर्ण जबाबदारी माझी आहे असे म्हणावे.
आता या दोन्ही जबाबदारी स्वीकारल्याचा पार्श्वभूमीवर त्या क्षणापासून पुढे काय करणार आहात ते जाहीर करणे.
जी नवीन भुमिका जाहीर केली आहे त्यासाठीच कृती निश्चित करून वेळापत्रकासह लिहून काढणे.
यामुळे निराशा अपराधीपणा दुःख भावना नष्ट होऊन पुढे काय करावे याचा स्वच्छ मार्ग दिसतो.
आपण जबाबदारी स्वीकारल्याने आपणच त्यानुरूप आपल्या पुढच्या कृती निश्चित केल्याने आत्मविश्वास वाढतो.
त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केल्याने क्षमतासुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागतात.
परिणामी अनुरूप अनुकूल परिणाम दिसायला लागतात.
परिणामी अधिक आनंदी, समाधानी, आत्मविश्वास वाटायला सुरुवात होते.
आपण निवडत असलेल्या विचार व कृतींवर आपल्याला मिळणारे परिणाम अवलंबुन असतात. त्याव्यतिरिक्त कशावरही नाही.
म्हणुन योग्य विचार आणि कृती निवडणे हेच आपल्या हातात आहे.
डॉ प्रशांत भामरे.
MR

@3_suhani वाह! आजकाल सर्व भाज्या एकत्रच मिळतात. तुम्ही वेगवेगळ्या केल्या का?
MR

@3_suhani आदल्या दिवशी खान्देमळण......मग दिवसभर चरायला सोडणे.... पावसामुळे हिरवे रान... मग रंग रंगोटी... भेंडी कापून नक्षी काढणे... असं सांग्रसंगीत कार्यक्रम.. दोन दिवस बैलांना पूर्ण विश्रांती
MR

पोळ्याची खरी मज्जा गावाकडे!
सकाळी उठायचं गरम पोळ्या गूळ तूप घालून मोठेमोठे मलिदा लाडू करायचे बैलांना खाऊ घालायचे मग त्यांना तळ्यावर अंघोळीला न्यायचं संपवायचं छान सांज्याच्या पोळ्या खाऊ घालायच्या. मग छान मिरवणूक काढायची. संध्याकाळी मग चारीठाव स्वयंपाक करून पुरणपोळीचा बेत मग दिवे लावून ओवाळायचं ...भारी आहे सगळं ... दरवेळी पोळ्याला असंच असतं!!
#बैलपोळा
MR





